वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

वास्तुदोष
Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist, Graphologist
Phone Number 91 8149128895

वास्तुदोष : वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

एखाद्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना खूप त्रास होत असेल, त्या घरात खूप समस्या असतील, शांती नसेल तर बऱ्याचदा त्यांना कुणी तरी सांगतं किंवा त्यांना वाटतं की त्या घरात कांहीतरी दोष आहे. याला वास्तुदोष म्हंटलं जातं.

मग हे दोष दूर करण्यासाठी एखाद्या वास्तुशास्त्रीला बोलावलं जातं. तो वातुशास्त्री त्या घरात असणारे गूढ दोष सांगतो आणि ते दोष नाहीसे करण्यासाठी कांही उपाय सुचवतो. हे उपाय अगदी त्या घराच्या बांधकामाची मोडतोड करण्यापर्यंत असू शकतात.

वास्तूची पाहणी करण्यासाठी, दोष शोधण्यासाठी, त्यावर उपाय सुचवण्यासाठी व्यावसायिक वास्तुशास्त्री प्रचंड फी आकारतात. ही फी काही हजारापासून अगदी लाखो रुपयांपर्यंत असू शकते.

पण असं दिसून येतं की वास्तुशास्त्र्याने सुचवलेले सगळे उपाय करूनही, त्यासाठी प्रचंड पैसे खर्च करूनही फारसा कांही उपयोग होत नाही. फारतर संबंधित घरातील लोकांना कांही दिवस मानसिक शांतता लाभते. पण पुढे त्या घरात पुन्हा समस्या निर्माण व्हायला सुरवात होते. याची अनेक उदाहरणे मी पाहिली आहेत, तुम्हालाही माहीत असतीलच.

वास्तुदोष

तेंव्हा प्रश्न असा आहे की वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

खरं म्हणजे ज्या वास्तूमध्ये आपण राहतो, त्या वास्तूने आपल्याला आश्रय दिलेला असतो. ती वास्तू आपल्याला ऊन-वारा-पाऊस आणि इतर अनेक गोष्टींपासून संरक्षण देते. मग ती वास्तू म्हणजे झोपडी असो की बंगला असो. अशा त्या वास्तूमध्ये दोष शोधणं म्हणजे त्या वास्तूशी प्रतारणा करणं होय. हे म्हणजे आपल्यावर उपकार करणाऱ्या त्या वास्तूबद्दल कृतज्ञ राहण्याऐवजी कृतघ्न होणं आहे.

वास्तुदोष: दोष वास्तूमध्ये नव्हे, माणसामध्ये!

आता प्रश्न हा उरतो की वास्तुमध्ये जर दोष नसतो तर एखाद्या घरात समस्या का असतात?

याचं उत्तर असं आहे की एखाद्या घरात ज्या समस्या निर्माण होत असतात त्याची खरी कारणं वेगळीच असतात. त्यातलं एक मोठं कारण त्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांमध्ये बेबनाव असतो, अथवा घरातील एखाद्या व्यक्तीच्या विचित्र अथवा विक्षिप्त स्वभावामुळे त्या घरातील इतरांना सतत त्रास होत असतो आणि त्यातून मोठ्या समस्या निर्माण होतात.

अशा कुटुंबातील व्यक्तींमध्ये सतत विवाद होत राहतात. त्यातून त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासारखी मोठी समस्या दुसरी काय असणार? या समस्येतून आणखी अनेक समस्यांचा जन्म होतो.

घरात निर्माण होणाऱ्या समस्यांचं मूळ आणि खरं कारण माहीत असूनही ते मान्य करण्याचे धाडस बहुतेकांच्याकडे नसतं. स्वतःमध्ये असणारा दोष मान्य करणं लोकांना मान्य नसतं. त्यामुळे कांही लोकांना आपल्या वास्तुमध्ये दोष दिसायला लागतात! मग हे तथाकथित वास्तुदोष कन्फर्म करण्यासाठी ‘तज्ज्ञाची’ (अर्थातच वास्तुशास्त्र्याची) मदत घेतली जाते. माफ करा, पण सत्य हेच असतं आणि ते कटू असतं!

तुम्ही जेंव्हा स्वतःचे दोष पाहायला शिकता, तेंव्हा तुम्हाला तुमच्या घरातील समस्यांची खरी कारणं कळायला लागतात. खरी कारणं दूर केली की तुमच्या घरातल्या समस्यांही दूर व्हायला लागतात. तेंव्हा तथाकथित वास्तुदोष दूर करायचा असेल तर तुमच्यातले आणि तुमच्या कुटुंबातील इतरांचे दोष दूर केले पाहिजेत!

तुमच्या घरात काही समस्या असतील तर त्या कशा दूर करायच्या यांच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही मला 8149128895 किंवा 8149703595 या नंबरवर सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत फोन करावा.

हेही वाचा:

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!

लकी नंबर 8

लग्नानंतर नाव बदलताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

अंकशास्त्र शिका
Views: 2,264
Please follow and like us:
Pin Share

11 thoughts on “वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email