Numerology: लकी वेहिकल नंबर 1008

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist & Face Reader
Cell Phone Number 8149128895

लकी वेहिकल नंबर 1008

तुम्ही 1008 हा वेहिकल नंबर असणारी एखादी आलिशान कार पाहिली असेल. हा नंबर मिळण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात, कारण या नंबरला मागणी मात्र खूप जास्त असते. त्यामुळे या नंबरसाठी जास्त पैसे मोजावे लागतात यात नवल नाही.

लकी वेहिकल नंबर 1008 चे धार्मिक महत्व

पण 1008 या नंबरला जास्त मागणी का असते? तर त्याचं कारण 1008 हा नंबर हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मात एक पवित्र अंक मानला गेला आहे. त्यामुळे या तिन्ही धर्मातील धार्मिक प्रवृत्तीचे श्रीमंत लोक हा नंबर मिळावा यासाठी प्रयत्न करतात.

जैन धर्मामध्ये तीर्थंकरांना 1008 ही उपाधी असते. यात तीर्थंकरांच्या शरीरावर 1008 शुभचिन्हे असतात, तीर्थंकरांच्याकडे 1008 शुभ गुण असतात, अशी जैन धर्मात मान्यता आहे. याशिवाय तीर्थंकरांना 1008 विविध नावे असतात.

हिंदू धर्मात (अर्थातच शैव आणि वैष्णव परंपरेत) कांही संत-महंतांना 1008 ही उपाधी असते. त्यामुळे जे संत-महंत कार वापरतात, त्यातील अनेकजण आपल्या कारसाठी 1008 या नंबरला प्राथमिकता देतात.

लकी वेहिकल नंबर 1008

अंकशास्त्रानुसार लकी वेहिकल नंबर 1008

आता आपण 1008 या नंबरचा अंकशास्त्रानुसार विचार करू.

1008 या नंबरमधील अंकांची बेरीज 9 येते. 9 हा अंक अध्यात्म, मानवता, करुणा, चिंतन, मनन, लढाऊ वृत्ती यांच्याशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे 1008 या नंबरमधील 1 हा अंक नेतृत्वगुण, पुढाकार घेणे, व्यवस्थापन कौशल्य, लोकसंग्रह आदी गोष्टींशी संबंधित आहे, तर 8 हा अंक धन, संपत्ती, सत्ता, व्यवस्थापन कौशल्य यांच्याशी संबंधित आहे.

अर्थातच 1008 या नंबरमध्ये 9, 1 आणि 8 या तीनही अंकांशी संबंधित गुण असतात. वरील सर्व गुण पाहता असे दिसून येते कि यातील कांही गुण अध्यात्म आणि वैराग्य यांच्याशी संबंधित आहेत, तर कांही गुण भौतिकतेशी संबंधित आहेत. त्यामुळे 1008 हा नंबर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे.

अंकशास्त्रानुसार 9, 1 आणि 8 हे तिन्ही अंक अतिशय बलशाली (स्ट्रॉन्ग) असतात.

लकी वेहिकल नंबर 1008

1008 हा नंबर कोणी वापरावा?

तुम्ही 1008 हा नंबर आपला लकी नंबर म्हणून वापरल्यास या अंकाशी संबंधित व्हायब्रेशन्स आणि एनर्जी तुम्हाला मिळेल, विशेष करून जर तुमचा जन्मांक, भाग्यांक किंवा ऍटिट्यूड नंबर 9 किंवा 7 असेल तर. याशिवाय तुमचा जन्मांक, भाग्यांक किंवा ऍटिट्यूड नंबर 6, 1, 2, 5 यापैकी एखादा असेल तरीही तुम्हाला 1008 या नंबरच्या व्हायब्रेशन्सचा फायदा मिळेल.

आध्यात्मिक प्रवृत्तीच्या बहुतेक लोकांच्या डेट नंबर्समध्ये 9 किंवा 7 हा अंक असतोच. तसेच बहुतेकांच्या डेट नंबर्समध्ये 6, 7, 1, 2, 5 पैकी एखादा अंक असण्याची शक्यता मोठी असते. त्यामुळे 1008 हा नंबर बहुतेकांसाठी लकी नंबर असतो.

फोटो सौजन्य: Abhinandan (house Of Number Plates) in Borivali East, Mumbai

तुमच्या गाडीसाठी १००८ हा नंबर मिळणे तसे अवघडच, शिवाय त्यासाठी तुम्हाला पैसेही जास्त मोजावे लागतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गाडीसाठी हा नंबर मिळाला नाही, तर तुम्ही त्या ऐवजी तुमच्या गाडीत या नंबरची एखादी इमेज लावली तरी तुम्हाला या नंबरचे व्हायब्रेशन्स आणि एनर्जी मिळत राहील.

हेही वाचा:

वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

तुमच्या सहीचं रहस्य | Graphology

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 107
Please follow and like us:
Pin Share

One thought on “Numerology: लकी वेहिकल नंबर 1008

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *