न्यूमरॉलॉजी: तुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष

अंकशास्त्र: कोणता जन्मांक चांगला?
Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist & Graphologist
Mobile Phone: 8149128895

अंकशास्त्र | जन्मांक म्हणजे काय?

प्रत्येक व्यक्तीमध्ये कांही विशिष्ट स्वभावदोष असतात. या स्वभावदोषांमुळे प्रत्येकाकडून विशिष्ट प्रकारच्या चुका वारंवार घडत राहतात. यामुळे मोठे नुकसान होत रहाते.

आपले नेमके काय स्वभावदोष काय आहेत हे बहुतेकांना माहीत नसते. दुसऱ्या कोणी ते दाखवले तरी आपल्याला आवडत नसते. अशावेळी आपले नेमके स्वभावदोष काय आहेत हे आपल्या जन्मांकावरून आपल्याला कळू शकते. आपला स्वभाव बदलणे सोपे नसले तरी आपल्याला आपले स्वभावदोष कळले, त्यांच्यामुळे आपला काय तोटा होतो ते कळले तर आपण प्रयत्नपूर्वक आपल्या स्वभावदोषांना नियंत्रित करू शकतो.

प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याच्या जन्मांकाशी संबंधित दोष उघड किंवा सुप्त अवस्थेत असू शकतात. कांही लोकांच्या बाबतीत हे दोष तीव्र प्रमाणात पाहायला मिळतात तर कांही लोकांच्या बाबतीत ते क्वचित किंवा कमी प्रमाणात दिसतात. दोषांची तीव्रता इतर कोअर नंबर्स कोणते आहेत यावर अवलंबून असतं.

पुढे प्रत्येक जन्मांकानुसार कोणते विशिष्ट स्वभावदोष असतात याची थोडक्यात माहिती दिली आहे:

जन्मांक 1

तुमची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 असेल तर तुमचा जन्मांक 1 आहे. 1 हा लीडरशिप आणि व्यवस्थापन कौशल्याचा अंक आहे. या जन्मांकाच्या लोकांमध्ये हुकुमशाही वृत्ती, अरेरावी, बॉसिंग करण्याची वृत्ती अशा गोष्टी येऊ शकतात. त्यामुळे त्यांना अनेक उघड आणि गुप्त शत्रू तयार होऊ शकतात. या शत्रूंच्याकडून यांच्याविरुद्ध गुप्त कारस्थानं आखली जातात, यांना ट्रॅप केलं जाऊ शकतं आणि अडचणीत आणलं जाऊ शकतं.

जन्मांक 1 बद्दल अधिक माहिती पुढील लिंकवर वाचावी: अंकशास्त्र: जन्मांक 1: जन्मतारीख 1, 10, 19, 28

Number 28: औद्योगिक यशाचा नंबर

जन्मांक 2

तुमची जन्मतारीख 2, 11, 22 किंवा 29 असेल तर तुमचा जन्मांक 2 आहे. या अंकाचे मुख्य स्वभावदोष म्हणजे चंचलता, मूड स्विंग आणि धरसोड वृत्ती. या जन्मांकाच्या व्यक्तींना डिप्रेशन येण्याची शक्यता असते. यांच्यात विरुद्धलिंगी व्यक्तिंच्याबद्दल मोठया प्रमाणात आकर्षण निर्माण होऊ शकतं, त्यामुळे त्यांचे अनैतिक आणि विवाहबाह्य संबंध तयार होऊ शकतात.

जन्मांक 2 बद्दल अधिक माहिती पुढील लिंकवर वाचावी: अंकशास्त्र: जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29

जन्मांक 3

तुमची जन्मतारीख 3, 12, 21 किंवा 30 असेल तर तुमचा जन्मांक 3 आहे. या जन्मांकाच्या लोकांना वारेमाप खर्च करण्याची, अनावश्यक महागड्या, चैनीच्या वस्तू खरेदी करण्याची सवय असू शकते. पैशांची उधळपट्टी करण्याच्या सवयीमुळे हे लोक आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता असते. यांचा दुसरा स्वभावदोष म्हणजे उत्साहाच्या आणि भावनेच्या भरात एखादे काम सुरु करणे आणि नंतर ते अर्धवट सोडून देणे. एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करणे आणि ते चिकाटीने पूर्ण करणे याबाबतीत या जन्मांकाचे लोक कमी पडतात. आर्थिक साक्षरता आणि आर्थिक नियोजन या बाबतीत ही हे लोक कमी पडतात. यांच्या वागण्या-बोलण्यात बालिशपणा येऊ शकतो. यांच्यातही विरुद्धलिंगी व्यक्तिंच्याबद्दल मोठया प्रमाणात आकर्षण निर्माण होऊ शकतं, त्यामुळे त्यांचे अनैतिक आणि विवाहबाह्य संबंध तयार होऊ शकतात.

जन्मांक 3 बद्दल अधिक माहिती पुढील लिंकवर वाचावी: अंकशास्त्र: जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

अंकशास्त्र आणि मनोरंजन | अंक 3 आणि 5

जन्मांक 4

तुमची जन्मतारीख 4, 13, 22 किंवा 31 असेल तर तुमचा जन्मांक 4 आहे. या जन्मांकाचे लोक स्पष्टवक्ते असतात. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा फटकळपणाचे रूप मुत्सद्दीपणे बोलणे यांना जमत नाही. यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे लोक दुखावले जाऊ शकतात. यांच्या नातेसंबधात समस्या निर्माण होऊ शकतात. यांची मते त्यांच्या लॉजिकल विचारातून तयार झालेली असतात आणि ते सहसा आपली मते बदलत नाहीत. या ठामपणामुळेही इतर लोक दुखावले जाण्याची शक्यता असते. यांच्यात इतरांचे दोष दाखवण्याची, इतरांवर सतत टीका करण्याची प्रवृत्ती येऊ शकते.

जन्मांक 4 बद्दल अधिक माहिती पुढील लिंकवर वाचावी: अंकशास्त्र: जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31

Numerology: 13 हा नंबर अनलकी आहे का?

जन्मांक आणि स्वभावदोष

जन्मांक 5

तुमचा जन्म 5, 14 किंवा 23 या तारखेला झाला असले तर तुमचा जन्मांक 5आहे. या जन्मांकाच्या व्यक्तींना छोट्या-छोट्या कारणांमुळं डिप्रेशन येऊ शकतं. झटपट पैसे मिळवण्याचा, हेराफेरी करण्याचा मोह होऊ शकतो. यातून ते अडचणीत येऊ शकतात, कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. यांचे विवाहबाह्य आणि अनैतिक संबध तयार होऊ शकतात.

जन्मांक 5 बद्दल अधिक माहिती पुढील लिंकवर वाचावी: अंकशास्त्र: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

जन्मांक 6

कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेस जन्म झालेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाच्या व्यक्तींमध्ये फारसे स्वभावदोष नसतात.

जन्मांक 6 बद्दल अधिक माहिती पुढील लिंकवर वाचावी: अंकशास्त्र: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24

जन्मांक 7

कोणत्याही महिन्याच्या 7, 16, किंवा 25 तारखेस जन्म झालेल्या व्यक्तीचा जन्मांक 7 असतो. या जन्मांकाच्या व्यक्ती स्वकेंद्रित, सिक्रेटीव्ह, रिझर्व माइंडेड आणि बेचैन असण्याची शक्यता असते. हे लोक फारसे सोशल नसतात. फारसे कुणात मिसळत नाहीत. खरं म्हणजे या गोष्टींना दोष म्हणता येणार नाही, कारण यांच्या या स्वभावाचा इतरांना कांही त्रास होण्याचा प्रश्न येत नाही.

जन्मांक 7 बद्दल अधिक माहिती पुढील लिंकवर वाचावी: अंकशास्त्र: जन्मांक 7 जन्मतारीख 7, 16, 25

जन्मांक 8

कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेस जन्म झालेल्या व्यक्तीचा जन्मांक 8 असतो. या जन्मांकाच्या व्यक्तींकडून त्यांच्या पदाचा आणि सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. यांच्यामध्ये झटपट निर्णय घेण्याची क्षमता नसते, त्यामुळे यांच्याकडून मोठ्या संध्या गमावल्या जातात. यांना कामे पुढे ढकलण्याची सवय असते. यांच्यामध्ये हुकूमशाही प्रवृत्ती, हेकेखोरपणा येऊ शकते. यांच्या नातेसंबंधात तणाव आणि दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते.

जन्मांक 8 बद्दल अधिक माहिती पुढील लिंकवर वाचावी: अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

Numerology: 8 हा अंक अनलकी नाही…

जन्मतारीख 26 आणि वैवाहिक जीवन

जन्मांक 9

कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 9 असतो. या जन्मांकचे लोक सहसा आक्रमक वृत्तीचे आणि हाय टेंपर असतात. त्यामुळे यांची नेहमी भांडणे व्हायची शक्यता असते. यांच्यातही झटपट निर्णय घेण्याची क्षमता नसते. यांच्या विशिष्ट स्वभावामुळे यांच्या आयुष्यात सतत अडथळे येत रहातात आणि लग्न आदी अनेक गोष्टी उशीरा घडण्याची शक्यता असते.

जन्मांक 9 बद्दल अधिक माहिती पुढील लिंकवर वाचावी: अंकशास्त्र: जन्मांक 9 जन्मतारीख 9, 18, 27

Numerology: लकी वेहिकल नंबर 1008

वैयक्तिक मार्गदर्शनासाठी संपर्क साधा: फोन: 8149703595 (महावीर सांगलीकर, Senior Numerologist & Graphologist)

जन्मांक आणि स्वभावदोष

हेही वाचा…..

अंकशास्त्र: कोणता जन्मांक चांगला?

Name Correction – नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

साडेसातीपासून मुक्तीचा सोपा उपाय!

Vastudosh: वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

TheyWon Marathi
मराठी लघुकथा, लेख आणि कविता

Views: 378
Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email