महावीर सांगलीकर
Senior Numerologist, Graphologist
Cell Phone Number 8149128895
जॉब करावा की व्यवसाय?
बऱ्याच युवकांना आणि युवतींना आपण जॉब करावा की व्यवसाय करावा असा प्रश्न पडतो.
तुम्ही जॉब करावा की व्यवसाय? जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा? स्वत:चा व्यवसाय करायचा असल्यास कोणता व्यवसाय करावा? या संदर्भात अंकशास्त्रानुसार योग्य मार्गदर्शन करता येते.
जन्मांक/भाग्यांक/ऍटिट्यूड नंबर 24 किंवा 28: जॉब करावा की व्यवसाय?
काही विशिष्ट्य तारखांना जन्मलेले लोक नोकरी करण्यासाठी नव्हे तर स्वत:चा एखादा व्यवसाय करण्यासाठी जन्मलेले असतात. अशा तारखांमध्ये 28 आणि 24 या तारखा मुख्य आहेत. तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 24 अथवा 28 तारखेस झाला असेल, तर तुमच्यामध्ये एक मोठा आणि यशस्वी व्यावसायिक अथवा उद्योजक होण्याची मोठी क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही नोकरी करण्याच्या फंदात पडूच नये.
तुमची जन्मतारीख 24 किंवा 28 नाही, पण तुमच्या पूर्ण जन्मतारखेतील अंकांची बेरीज 24 किंवा 28 येत असेल, तर तुमच्यामध्येही एक मोठा आणि यशस्वी व्यावसायिक अथवा उद्योजक होण्याची मोठी क्षमता आहे.
तुमची जन्मतारीख 24 किंवा 28 नाही, आणि तुमच्या पूर्ण जन्मतारखेतील अंकांची बेरीजही 24 किंवा 28 येत नाही, पण तुमचा ऍटिट्यूड नंबर 24 किंवा 28 आहे, तर तुमच्यामध्येही एक मोठा आणि यशस्वी व्यावसायिक अथवा उद्योजक होण्याची मोठी क्षमता आहे. उदाहरणासाठी, तुमची जन्मतारीख 15 सप्टेंबर असेल तर तर तुमचा ऍटिट्यूड नंबर 15+9 =24 आहे.
Number 28: औद्योगिक यशाचा नंबर
जन्मांक/भाग्यांक/ऍटिट्यूड नंबर 1 किंवा 6
समजा तुमच्या डेट न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 24 किंवा 28 हा नंबर नाही, पण तुमचा जन्म पुढीलपैकी एखाद्या तारखेस झाला आहे, तरीदेखील तुमच्यामध्ये एक यशस्वी उद्योजक होण्याची मोठी क्षमता आहे: 1, 6, 10, 15, 19.
याशिवाय तुमच्या पूर्ण जन्मतारखेतील अंकांची अथवा तुमची जन्मतारीख आणि जन्ममहिना यातील अंकांची एक अंकी बेरीज 1 किंवा 6 येत असेल तर (म्हणजे तुमचा भाग्यांक किंवा ऍटिट्यूड नंबर 1 किंवा 6 असेल तर) तुमच्यामध्येही एक मोठा आणि यशस्वी व्यावसायिक अथवा उद्योजक होण्याची मोठी क्षमता आहे.
उदाहरणासाठी, तुमची जन्मतारीख 14 जानेवारी 2002 असेल तर तर यातील अंकांची एक अंकी बेरीज 1 येते: 14.01.2002 = 1+4+0+1+2+0+0+2=10=1+0=1 (भाग्यांक 1), तसेच तुमची जन्मतारीख 12 मार्च असेल तर यातील अंकांची एक बेरीज 6 येते: 12.03= 12.03=1+2+0+3=6 (ऍटिट्यूड नंबर).
याप्रमाणे तुमचा भाग्यांक व ऍटिट्यूड नंबर तपासून पहावा.
जॉब करावा की व्यवसाय?: इतर तारखांचे काय?
तुमची जन्मतारीख वर दिलेल्या प्रमाणे असेल, तर तुमच्याकडे बिझनेसमध्ये खूप मोठे यश मिळवण्याची क्षमता आहे. पण याचा अर्थ असा नव्हे इतर जन्मतारीख असणारे लोक बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत.
तुमची जन्मतारीख कोणतीही असो, तुमच्याकडे एखादा व्यवसाय करण्याची क्षमता असते. तरीही ज्यांचा जन्मांक /ऍटिट्यूड नंबर/ भाग्यांक 2, 5, 8, 9 यापैकी एखादा आहे, त्यांना बिझनेसमध्ये चांगले यश मिळू शकते.
अर्थातच, विशिष्ट अंक असलेल्या लोकांना विशिष्ट क्षेत्रातच मोठे यश मिळू शकते. उदाहरणासाठी, ज्यांचा जन्मांक/ ऍटिट्यूड नंबर किंवा भाग्यांक 2 आहे, त्यांनी सेल्समनशिप, मार्केटिंग, डिझायनिंग, आर्ट, आर्किटेक्चर, वैद्यकीय अशा क्षेत्रात व्यवसाय केला तर त्यात त्यांना मोठे यश मिळेल.
नोकरी करायची असेल तर …
कोणत्याही जन्मांक/ऍटिट्यूड नंबर/ भाग्यांकाचे लोक नोकरीही करू शकतात. त्यांनी कोणत्या क्षेत्रात नोकरी केल्यास त्यांना मोठे यश मिळेल हे त्यांचे नंबर्स काय आहेत यावरून सांगता येते.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही मला 8149128895 या किंवा 8149703595 या नंबरवर सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत फोन करावा.
हेही वाचा ……
अंकशास्त्र आणि मनोरंजन | अंक 3 आणि 5
तुमच्या सहीचं रहस्य | Graphology
वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?
Name Correction – नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi
TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)
3 thoughts on “Numerology: जॉब करावा की व्यवसाय?”