Number 28: औद्योगिक यशाचा नंबर

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist & Graphologist
8149128895

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 28 तारखेस झाला असेल, किंवा तुमच्या पूर्ण जन्मतारखेतील (DDMMYYYY) अंकांची बेरीज 28 येत असेल तर तुमच्यामध्ये व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रात खूप मोठे यश मिळवण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता तुमच्यामध्ये उघड अथवा सुप्त अवस्थेत असू शकते.

28 या नंबरचे गुणधर्म

28 या नंबरमध्ये 1, 2 आणि 8 या तीन वेगवेगळ्या अंकांशी संबंधित गुणधर्म असतात. (2+8=10=1+0=1)

1 या अंकाचे गुण: पुढाकार, नेतृत्व, व्यवस्थापन, नवीन कांही करण्याची प्रवृत्ती, भौतिक यश

2 या अंकाचे गुण: सेल्समनशिप, संवादकौशल्य, मुत्सद्दीपणा, डिप्लोमसी, डील्स घडवून आणण्याची क्षमता

8 या अंकाचे गुण: व्यवस्थापन व ऍडमिनिस्ट्रेशन, फंड मॅनेजमेंट, धन मिळवण्याची व संपत्ती निर्माण करण्याची क्षमता, भौतिक यश

अर्थातच ज्यांची जन्मतारीख 28 असते किंवा ज्यांच्या पूर्ण जन्मतारखेतील अंकांची बेरीज 28 येते, त्यांच्यामध्ये वरील सर्व गुणधर्म उघड अथवा सुप्त अवस्थेत असतात.

यशस्वी उद्योगपती आणि नंबर 28

यशस्वी उद्योगपतींमध्ये आणि मोठ्या व्यावसायिकांमध्ये 28 तारखेस जन्म झालेल्यांची किंवा ज्यांच्या पूर्ण तारखेतील अंकांची बेरीज 28 येते अशांची संख्या इतर कोणत्याही तारखेस जन्म झालेल्यांच्या किंवा पूर्ण तारखेतील अंकांची बेरीज दुसरी एखादी येणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. प्रॉबेबलिटीच्या नियमानुसार दर 30 किंवा 31 उद्योगपतींमध्ये 28 तारखेला जन्मलेल्या उद्योगपतींची संख्या केवळ 1 पाहिजे (सुमारे 3.22 ते 3.33%), पण प्रत्यक्षात त्यांची संख्या 4 ते 5 असते! (सुमारे 13.33 ते 16.66%).

28 तारखेस जन्म झालेल्या प्रसिद्ध उद्योगपतींमध्ये पुढील नावे उल्लेखनीय आहेत: शंतनुराव किर्लोस्कर, धीरूभाई अंबानी, रतन टाटा, बिल गेट्स, इलॉन मस्क, कार्लोस स्लिम, ऑस्कर शिंडलर, इंद्र नुयी, भाविश आगरवाल, संजय घोडावत.

ज्यांच्या जन्मतारखेतील अंकांची बेरीज 28 येते अशा प्रसिद्ध उद्योगपती व मोठ्या व्यावसायिकांमध्ये पुढील नावे उल्लेखनीयआहेत: जमशेदजी टाटा, शंतनुराव किर्लोस्कर, धीरूभाई अंबानी, राहुल बजाज, ओम प्रकाश जिंदल, राकेश झुनझुनवाला, बी. जी. शिर्के, राजीव बजाज

विशेष म्हणजे शंतनुराव किर्लोस्कर आणि धीरूभाई अंबानी यांची जन्मतारीख 28 आणि पूर्ण जन्मतारखेतील अंकांची बेरीजही 28आहे!

उद्योगपती राहुल बजाज
Photo by Richter Frank-Jurgen (Wikimedia Commons)

उद्योगपती व्हायचे नसेल तर …..

याचा अर्थ असा नव्हे की 28 तारखेला जन्मलेल्या किंवा पूर्ण जन्मतारखेतील असणकांची बेरीज 28 असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने उद्योगपतीच व्हायला पाहिजे. तुमच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये असणारा 28 हा नंबर हे दाखवतो की तुमच्यामध्ये उद्योगपती व्हायच्या मोठ्या क्षमता आहेत. पण याऐवजी तुम्ही जर वेगळे क्षेत्र निवडाल आणि तिथे तुम्ही व्यावसायिक दृष्टीकोन ठेवला तर तिथेही तुम्हाला मोठे यश मिळू शकते, विशेषकरून ते क्षेत्र जर तुमच्या इतर कोअर नंबर्सपैकी एखाद्या नंबरला अनुकूल असेल तर.

उदाहरणार्थ, प्रसिद्ध गायक आणि संगीतकार रवींद्र जैन यांची जन्मतारीख 28.02.1944 ही होती. त्यानुसार त्यांचा ऍटिट्यूड नंबर 3 आणि भाग्यांकही 3 होता. त्यांनी आपल्या करिअरसाठी उद्योग क्षेत्र निवडण्याऐवजी गायन आणि संगीत क्षेत्र निवडले. हे क्षेत्र त्यांच्या ऍटिट्यूड नंबर आणि भाग्यांक असलेल्या 3 या अंकाला अनुकूल असे होते. त्यामुळे त्यांनी वरील क्षेत्रात प्रचंड यश मिळवले. (ऍटिट्यूड नंबर म्हणजे तारीख आणि महिना यातील अंकांची बेरीज, तर भाग्यांक म्हणजे पूर्ण तारखेतील अंकांची बेरीज).

हेही वाचा….

जॉब करावा की व्यवसाय?

लकी मोबाईल फोन नंबर

लकी नंबर 8

अंकशास्त्र आणि मनोरंजन | अंक 3 आणि 5

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 92
Please follow and like us:
Pin Share

2 thoughts on “Number 28: औद्योगिक यशाचा नंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *