अंकशास्त्र: जन्मांक 9 जन्मतारीख 9, 18, 27

अंकशास्त्र: जन्मांक 9 जन्मतारीख 9, 18, 27
Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist
Phone Number 8149703595

अंकशास्त्र | जन्मांक म्हणजे काय?

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो, त्यामुळे जन्मांकाचे गुणदोष कमी-जास्त होऊ शकतात. जन्मांक म्हणजे सर्व काही नव्हे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. या लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. एखाद्या व्यक्तीचे सम्यक विश्लेषण करण्यासाठी आणि परफेक्ट लकी नंबर्स, लकी करिअर्स निवडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या पूर्ण न्यूमरॉलॉजी चार्टचा विचार करायला लागतो).

कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो.

जन्मांक 9 असणाऱ्या व्यक्तीमध्ये जन्मांक 1 चे अनेक गुण दिसून येतात. जन्मांक 1 सारखेच प्रचंड आत्मविश्वास, आक्रमकता, साहसीपणा, लढाऊपणा हे गुण जन्मांक 9 मध्ये दिसून येतात. पण व्यक्तिंना जन्मांक 1 असणा-या व्यक्तिंसारखे झटपट यश मिळत नाही तर उशीरा मिळत असते. याचे कारण म्हणजे हा अंक उशीर लावणारा अंक आहे. पण हळूहळू का होईना, या व्यक्ती जीवनात मोठी प्रगती करू शकतात.

यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो.

यांचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे या जन्मांक 9 असणाऱ्या व्यक्ति मानवतावादी, दयाळू आणि क्षमाशील असतात. त्यांच्याकडे समाजाच्या भल्यासाठी लागणारी दूरदृष्टी आणि आदर्श असतात. या व्यक्ति नम्र आणि निस्वार्थी असतात. इतरांच्या भल्यासाठी त्याग करण्याची वृत्ती त्यांच्यात असते. ते उदारहृदयी असतात आणि आपल्याकडे जे कांही आहे ते इतरांना देण्याची त्यांची वृत्ती असते. आपल्या भोवतालच्या लोकांबद्दल त्यांना प्रचंड प्रेम असते आणि त्यांची काळजी वाहण्याची या व्यक्तींची प्रवृत्ती असते.

जन्मांक 9 जन्मतारीख 9, 18, 27

यांच्याकडे प्रचंड सहनशक्ती असते. तसेच त्यांच्याकडे कल्पनाशक्ती आणि नवनिर्मिती हे गुणही असतात.

यांच्या कोअर नंबर्समध्ये चार्टमध्ये 7, 8, 11 यापैकी एखादा अंक आला असेल किंवा 9 या अंकाचे रिपीटिशन झाले असेल तर हे जास्तच आध्यात्मिक असतात. त्याचप्रमाणे यांचा ऑकल्ट सायन्सेस (गूढ विद्या) कडे ओढा असतो.

जन्मांक असणाऱ्या लोकांचे इतरांपेक्षा जास्त प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसतात. त्यामुळे या लोकांनी वाहने जपून चालवली पाहिजेत, व इतर ठिकाणीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

मोठे प्रोजेक्ट, मोठ्या व अवजड उद्योगात, जमिनीशी संबंधित उद्योगात यांना मोठे यश मिळते. या व्यक्ति कला, साहित्य, संगीत इत्यादी क्षेत्रातही आपला ठसा उमटवू शकतात.

जन्मांक 9 साठी लकी नंबर्स

लकी नंबर्स
9 हा एक आणि ज्यातील अंकांची बेरीज 9 येते असे नंबर्स. (उदा. 3456= 3+4+5+6= 18=1+8= 9, म्हणून 3456 हा जन्मांक 9 असणाऱ्या व्यक्तींसाठी एक लकी नंबर आहे).

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
3, 6, 9, 2, 5, 7

विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
4, 8

लकी वेहिकल नंबर 1008

जन्मांक 9 साठी लकी करिअर्स

सैन्य अधिकारी, आर्किटेक्चर, फॅशन डिझायनिंग, मोठा व्यवसाय, इंजिनिअरिंग, मेडिको, रियल इस्टेट (कन्स्ट्रक्शन,इन्व्हेस्टमेंट)

जन्मांक 9 असणाऱ्या कांही प्रसिद्ध व्यक्ति

राम कृष्ण परमहंस
राम कृष्ण परमहंस

राम कृष्ण परमहंस, नेल्सन मंडेला, लिओ टॉलस्टॉय, कार्ल सॅगन, आचार्य आनंद ऋषि, गॅलिलिओ, बर्ट्रांड रसेल, टॉम हॅन्क्स, ब्रॅड पिट.

हेही वाचा …..

अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

अंकशास्त्र: जन्मांक 1: जन्मतारीख 1, 10, 19, 28

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!

वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

Views: 265
Please follow and like us:
Pin Share