महावीर सांगलीकर
Senior Numerologist, Graphologist
Phone Number 8149703595
अंकशास्त्र | जन्मांक म्हणजे काय?
(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो, त्यामुळे जन्मांकाचे गुणदोष कमी-जास्त होऊ शकतात. जन्मांक म्हणजे सर्व काही नव्हे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. या लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. एखाद्या व्यक्तीचे सम्यक विश्लेषण करण्यासाठी आणि परफेक्ट लकी नंबर्स, लकी करिअर्स निवडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या पूर्ण न्यूमरॉलॉजी चार्टचा विचार करायला लागतो).
कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म्हणजे या व्यक्तिंच्याकडे दुर्गुण किंवा दोष फार कमी असतात. या व्यक्ति समाजात चांगल्या आणि जबाबदार व्यक्ति म्हणून ओळखल्या जातात.
कुटुंबवत्सलता हा जन्मांक 6 चा सगळ्यात मोठा गुण आहे. हा जन्मांक असणाऱ्या व्यक्ति आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडतात. त्यांचे कुटुंब हाच त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो. त्याचबरोबर ते उपजीविकेसाठी जे कांही काम करतात तेही प्रामाणिकपणे आणि मन लावून करतात.
या व्यक्ति अतिशय मनमिळावू, प्रेमळ, मृदुभाषी, इतरांची काळजी घेणाऱ्या, आणि इतरांना मदत करणाऱ्या असतात. त्याचबरोबर या व्यक्ति भौतिक सुखांचा आणि जीवनाचा उपभोग घेणाऱ्या असतात.
त्यांची दृष्टी कलात्मक असते. त्यामुळे कलेशी संबधीत व्यवसाय, डिझायनिंग, फॅशन इंडस्ट्री, संगीत यात यशस्वी झालेले दिसतात.
6 हा राजकीय लीडरशिपचा अंक नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रात या व्यक्ती कमी प्रमाणात दिसतात. या उलट आर्थिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात जन्मांक 6 असणाऱ्या व्यक्तींना मोठे यश मिळते.
जन्मांक 6 साठी लकी नंबर्स
लकी नंबर्स
6 हा अंक व आणि ज्या नंबरमधील अंकांची बेरीज 6 येते असे नंबर्स. (उदा. 123= 1+2+3= 6, म्हणून 123 हा त्यांच्यासाठी एक लकी नंबर आहे).
सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
6, 9, 2, 4
विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
1, 5, 7
जन्मांक 6 साठी लकी करिअर्स
कमर्शिअल आर्ट, डिझायनिंग, फायनान्स, शिक्षणक्षेत्र यांच्याशी संबंधित व्यवसाय
जन्मांक 6 असणाऱ्या कांही प्रसिद्ध व्यक्ति
श्री अरविंदो, मायकेल एंजोलो, ए पी जे अब्दुल कलाम, अझीम प्रेमजी, सचिन तेंडुलकर, गौतम अदानी, शांतीलाल मुथ्था, संजय नहार, पी.जी. वुडहाउस वगैरे.
हेही वाचा …..
Vastudosh: वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?
अंकशास्त्र: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23
अंकशास्त्र: जन्मांक 7 जन्मतारीख 7, 16, 25
Numerology: जॉब करावा की व्यवसाय?
Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi
3 thoughts on “अंकशास्त्र: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24”