महावीर सांगलीकर
Numerologist, Graphologist
Phone Number 8149128895
साडेसातीपासून मुक्तीचा सोपा उपाय!
तुम्हाला कुणी सांगितलं की तुम्हाला साडेसाती चालू आहे, किंवा सुरु होणार आहे, तर तुम्ही काळजी करण्याचं घाबरून जायचं अजिबात कारण नाही. तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागेल, ते म्हणजे तुम्ही साडेसाती या प्रकारावर, किंबहुना ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रानुसार देण्यात येणाऱ्या भविष्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही पाहिजे. अंधश्रद्धाळू लोकांसाठी ही एक अवघड गोष्ट आहे, पण त्यांना तथाकथित साडेसातीपासून सुटका करून घ्यायची असेल, तर तिच्यावर अजिबात विश्वास न ठेवणे हाच एकमेव आणि जालीम उपाय आहे.
जे लोक साडेसाती या प्रकारावर विश्वास ठेवतात, त्यांना त्यांच्या तथाकथित साडेसातीच्या काळात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात आर्थिक समस्या, कौटुंबिक कलह, अपयश, डिप्रेशन अशा अनेक प्रकारच्या समस्या असतात. यामध्ये ग्रहगोलांचा काहीच संबंध नसतो, तर लॉ ऑफ ऍट्रॅक्शनमुळे हे घडते. म्हणजे तथाकथित साडेसातीवर विश्वास ठेवल्याने असे लोक ती ओढावून घेतात.
या तथाकथित साडेसातीच्या काळात हे लोक काहीच नवीन कामधंदा करत नाहीत, कारण नवीन काही सुरु केल्यास त्यात यश मिळणार नाही असा त्यांचा विश्वास असतो. काही लोकांनी नवीन काही सुरु केले तरी त्यात त्यांना यश मिळत नाही. (कसे मिळेल, पुन्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन!)
साडेसाती या प्रकारावर विश्वास असणारे लोक आपल्या आयुष्यातील अक्षरश: साडेसात वर्षे वाया घालवतात. या काळात ते आत्मविश्वास हरवतात, खचतात. मग तथाकथित साडेसाती संपल्यावर देखील ते परत उभारी घेत नाहीत.
तुमच्या परिचयात अशा अनेक केसेस दिसतील.
तुम्हाला साडेसाती या प्रकारापासून वाचायचं असेल तर आधी तुम्ही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं बंद करा, आणि लॉ ऑफ ऍट्रॅक्शनचा अभ्यास करा. त्याचा तुम्हाला तुमच्या जीवनात मोठा फायदा होईल आणि साडेसातीसारखे प्रकार तुमच्याकडे फिरकणारही नाहीत!
साडेसाती
हेही वाचा:
Numerology: 13 हा नंबर अनलकी आहे का?
काळा रंग: काळ्या रंगाचं आकर्षण
Vastudosh: वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?
अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi
TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)
One thought on “साडेसातीपासून मुक्तीचा सोपा उपाय!”