न्यूमरॉलॉजी | मिसिंग नंबर्स

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist & Face Reader
Cell Phone Number 8149128895

आपण जेंव्हा एखाद्या व्यक्तीचा न्यूमरॉलॉजी चार्ट पाहतो, तेंव्हा त्या चार्टमध्ये 1 ते 9 हे सगळेच अंक त्यात असण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्या व्यक्तीचे 6 कोअर नंबर्स, इयर नंबर, मंथ नंबर, फर्स्ट नेम नंबर, नावातील अक्षरे या सर्वांचा विचार करता चार्टमध्ये 1 ते 9 हे सगळेच अंक असण्याची जास्तीत जास्त शक्यता साहजिकच आहे.

पण क्वचित कांही व्यक्तींच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 1 ते 9 या अंकांपैकी एखादा अंक नसतो. अशा ‘नसलेल्या’ अंकाला मिसिंग नंबर म्हणून ओळखले जाते. मिसिंग नंबरवरून संबंधित व्यक्तीमध्ये त्या अंकांची एनर्जी मिसिंग आहे हे कळते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण चार्टमध्ये 6 हा अंक कोठेही नसेल, तर त्या चार्टमधून 6 हा अंक मिसिंग आहे, आणि त्या व्यक्तीमध्ये 6 या अंकाच्या गुणांची कमतरता आहे.

मिसिंग नंबर्स

एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण चार्टमधून एखादा अंक मिसिंग असेल तर त्याचा अर्थ काय असतो ते आता पाहू:

मिसिंग 1:
1 हा अंक नेतृत्वक्षमता, आत्मविश्वास, महत्वाकांक्षा, दृढनिश्चय, व्यवस्थापन कौशल्य यांच्याशी संबंधित आहे. एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 1 हा अंक नसेल तर त्या व्यक्तीमध्ये हे गुण असणार नाहीत. अपवाद: एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमधून 1 हा अंक मिसिंग आहे, पण त्या व्यक्तीच्या कोअर नंबर्समध्ये 9किंवा 8 हे अंक असतील, तर त्या व्यक्तीमध्ये वरीलपैकी अनेक गुण असतील.

मिसिंग 2:
2 हा अंक संवादकौशल्य, मुत्सद्देगिरी, सेल्समनशिप, असिस्टन्स, रोमान्स, आर्ट यांच्याशी संबंधित आहे. एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 2 हा अंक नसेल तर त्या व्यक्तीमध्ये हे गुण असणार नाहीत. अपवाद: एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमधून २ हा अंक मिसिंग आहे, पण त्या व्यक्तीच्या कोअर नंबर्समध्ये 3 किंवा 5 हे अंक असतील, तर त्या व्यक्तीमध्ये वरीलपैकी अनेक गुण असतील.

मिसिंग 3:
3हा अंक क्रिएटिव्हिटी, परफॉर्मिंग आर्टस्, मनोरंजन, मैत्रीपूर्ण व्यवहार, सकारात्मक विचार आणि व्यवहार, चार्मिंग पर्सनॅलिटी यांच्याशी संबंधित आहे. एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 3 हा अंक नसेल तर त्या व्यक्तीमध्ये हे गुण असणार नाहीत. अशी व्यक्ती ‘सिरिअस’ या सदरात मोडणारी असेल. अपवाद: एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमधून 3 हा अंक मिसिंग आहे, पण त्या व्यक्तीच्या कोअर नंबर्समध्ये 2 किंवा 5 हे अंक असतील, तर त्या व्यक्तीमध्ये वरीलपैकी अनेक गुण असतील.

मिसिंग 4:
4 हा अंक तर्कनिष्ठ विचार, स्पष्टवक्तेपणा, व्यावहारिकता, हार्ड वर्क, वक्तशीरपणा, कामातील सातत्य, विद्रोही विचार यांच्याशी संबंधित आहे. एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 4 हा अंक नसेल तर त्या व्यक्तीमध्ये हे गुण असणार नाहीत.

मिसिंग नंबर्स

मिसिंग 5:
5 हा अंक स्वातंत्र्याची आवड, कुतूहल, संशोधन, धाडस, बहुआयामी जीवन, मल्टि टॅलेंट, संबंधित आहे. एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 5 हा अंक नसेल तर त्या व्यक्तीमध्ये हे गुण असणार नाहीत. अपवाद: एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमधून 5 हा अंक मिसिंग आहे, पण त्या व्यक्तीच्या कोअर नंबर्समध्ये 2, 3 किंवा 9 हे अंक असतील, तर त्या व्यक्तीमध्ये वरीलपैकी अनेक गुण असतील.

मिसिंग 6:
6 हा अंक कुटुंबत्सलाता, जबाबदारी, समंजसपणा, सर्वांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती यांच्याशी संबंधित आहे. एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 6 हा अंक नसेल तर त्या व्यक्तीमध्ये हे गुण असणार नाहीत. अशी व्यक्ति कौटुम्बिक जीवनात फारसी रमणार नाही, विशेषत: त्या व्यक्तीच्या कोअर नंबर्समध्ये 3, 5 किंवा 7 हे अंक असतील तर.

मिसिंग 7:
7 हा अंक निरीक्षण आणि विश्लेषण करण्याची क्षमता, अंतर्मुखता, संशोधक वृत्ती, अमूर्त विचार करण्याची क्षमता, स्पिरिच्युअलीटी यांच्याशी संबंधित आहे. या व्यक्तींना समाजापासून अलिप्त राहणे आवडते. एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 7 हा अंक नसेल तर त्या व्यक्तीमध्ये हे गुण असणार नाहीत. अशी व्यक्ती सखोल विचार करण्यात कमी पडू शकते. अपवाद: एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमधून 7 हा अंक मिसिंग आहे, पण त्या व्यक्तीच्या कोअर नंबर्समध्ये 9 हा अंक असेल तर त्या व्यक्तीमध्ये वरीलपैकी अनेक गुण असतील.

मिसिंग 8:
8 हा अंक धन, संपत्ती, सत्ता, व्यवस्थापन कौशल्य, भौतिक यश, मनी मॅनेजमेंट यांच्याशी संबंधित आहे. एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 8 हा अंक नसेल तर ती व्यक्ती आर्थिक व्यवस्थापन आणि भौतिक यशामध्ये कमी पडू शकते. अपवाद: एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमधून 8 हा अंक मिसिंग आहे, पण त्या व्यक्तीच्या कोअर नंबर्समध्ये 1, 6 किंवा 9 हे अंक असतील, तर त्या व्यक्तीमध्ये वरीलपैकी अनेक गुण असतील.

मिसिंग 9:
9 हा अंक करुणा, मानवतावाद, सहिष्णुता, हायर स्पिरिच्युअलीटी, विज्ञान यांच्याशी संबंधित आहे. एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 9 हा अंक नसेल तर त्या व्यक्तीमध्ये हे गुण असणार नाहीत. अपवाद: एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमधून 9 हा अंक मिसिंग आहे, पण त्या व्यक्तीच्या कोअर नंबर्समध्ये 6 हा अंक असेल तर त्या व्यक्तीमध्ये वरीलपैकी अनेक गुण असतील.

मिसिंग नंबर्स: एखादा नंबर मिसिंग असल्यास काय करावे?

कांही लोक आपल्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये मिसिंग नंबर यावा यासाठी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये फेरफार करतात. या फेरफाराला ते नेम करेक्शन म्हणतात. पण अशा तथाकथित नेम करेक्शनचा कांहीच उपयोग होत नाही. कारण नेम करेक्शनच्या नावावर ‘नेम करप्शन’ केले जाते. ज्यांनी आपल्या नावाला असे करप्ट केले आहे, त्यांना ‘लेने के देने’ पडले, तर त्यात नवल नाही. (याविषयी माझा नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा! हा लेख अवश्य वाचावा).

खरं म्हणजे तुमच्या चार्टमधून एखादा नंबर मिसिंग असल्याने तुमचं कांही बिघडत नाही, आणि कृत्रिमरित्या तुमच्या चार्टमध्ये एखादा नंबर ऍड केल्याने तुमचा कांही फायदा होत नाही. तुमच्या चार्टमधून एखादा नंबर मिसिंग असल्यास त्यासाठी तुमच्या नावाचे स्पेलिंग बदलणे हा उपाय नव्हे. त्यापेक्षा सोपे, व्यावहारिक आणि प्रभावी असे अनेक उपाय असतात, त्यांच्याविषयी मी एका वेगळ्या लेखात माहिती देईन.

हेही वाचा…..

Numerology: कोअर नंबर्स

Numerology: नंबर कम्पॅटिबिलिटी

अंकशास्त्र: मास्टर नंबर्स

वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 132
Please follow and like us:
Pin Share

3 thoughts on “न्यूमरॉलॉजी | मिसिंग नंबर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *