तुमच्या सहीचं रहस्य | Graphology

Please follow and like us:
Pin Share

© महावीर सांगलीकर

Senior Numerologist, Graphologist
Phone Number 91 8149128895

तुमच्या सहीचं रहस्य: Signature Analysis in Marathi

आपली सही हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. सही ही प्रामुख्याने आपल्या सुप्त मनात तयार होत असते. आपल्या सुप्त व उघड मनोवृत्तीनुसार आपली सही बनत असते. प्रत्येकाची मनोवृत्ती वेगवेगळी असते, म्हणून सहीदेखील वेगवेगळी असते. दोन व्यक्तिंच्या सह्या एकसारख्या नसतात, आणि अगदी कॉपी केली तरी हुबेहूब सही करणे ही फार अवघड गोष्ट असते. त्यामुळे आज जगभर सही ही प्रत्येक व्यक्तिची ओळख झाली आहे.

एखाद्याच्या सहीवरून त्या व्यक्तिविषयी, त्या व्यक्तिच्या मनोवृत्तीविषयी बरेच कांही सांगता येते. एखाद्याची सही गिचमिड असेल तर त्या व्यक्तिचा स्वभावही क्लिष्ट, लपवा-छपवी करणारा असणार आणि ज्याची सही स्पष्ट, बऱ्यापैकी वाचता येणारी असेल तर ती व्यक्ति पारदर्शक स्वभावाची असणार यात शंका नाही.

तुमच्या सहीमध्ये दोष असतील आणि तुम्ही ते काढून टाकले, सही योग्य प्रकारे केली तर तुमच्या मनोवृत्तीतही नक्कीच बदल होतो. योग्य प्रकारे केलेल्या सहीमुळे तुमच्या प्रगतीला हातभार लागतो. याउलट चुकीच्या पद्धतीने केलेली सही तुम्हाला अडचणीत आणू शकते.

सहीबाबत दिला जाणारा चुकीचा सल्ला ….

आपल्या इथे सहीमध्ये बदल करायचा सल्ला देणारे अनेकजण बऱ्याचदा चुकीचा सल्ला देतात. म्हणजे सही वरती चढत जाणारी, तिरपी असावी, तिच्याखाली आडवी रेघ ओढावी आणि त्या रेघेखाली दोन टिंबे द्यावीत वगैरे. अशा सल्ल्यामुळे अलीकडे या प्रकारच्या सह्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

खरं म्हणजे अशा प्रकारे सह्या करणं सगळ्यांना फायदेशीर ठरत नाही. जसं, एखादी व्यक्ति हेकेखोर, ठाम मनोवृत्तीची असेल आणि ती व्यक्ति आपल्या सहीला अंडरलाईन देत असेल, टिंबे देत असेल तर त्या व्यक्तिला त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होण्याचीच जास्त शक्यता असते. याउलट एखादी व्यक्ति चंचल स्वभावाची असेल आणि तिने सहीला अंडरलाईन दिली तर त्याचा तिला नक्कीच फायदा होईल.

तिरपी, वर चढत जाणारी सही सरसकट सगळ्यांना चांगली ठरू शकत नाही. जास्त तिरपी सही तुम्हाला अडचणीत आणू शकते.

तुमच्या सहीचं रहस्य

सहीमध्ये असणारे मुख्य दोष आणि त्यांचा अर्थ

तुम्ही खूप कष्ट करूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर नक्कीच तुमच्या सहीमध्ये मोठे दोष असणार. चुकीच्या पद्धतीने केलेली सही ही तुमच्या यशात मोठा अडथळा ठरू शकते.

ज्यांना खूप मोठ्या समस्या असतात, सतत अपयश येत असतात, कामे होत नाहीत, आर्थिक फटके बसतात, लग्न होत नाही, नोकरी मिळत नाही, कुणाशी पटत नाही, कौटुंबिक जीवनात सतत कलह होतो अशा सर्वांच्या सह्या अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेल्या असतात.

पुढील दोष पहा:

  • गिचमिड सही असेल तर ती त्या व्यक्तीला रिझर्व्ह माईंडेड, अनावश्यक गुप्तता बाळगणारी बनवते. अशा व्यक्तीला मोठे अडथळे येऊ शकतात.
  • सहीवर काट मारली असेल, सही खोडल्यासारखी असेल तर ती व्यक्ती सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह (स्वत:च स्वत:चे नुकसान करणारी) असते. अशा व्यक्तीला डिप्रेशन येत असते. अशा व्यक्तीची मजल आत्महत्या करण्यापर्यंत देखील जाऊ शकते.
  • सहीमध्ये क्रॉसेस (फुल्या) काढणारी व्यक्ति कलहप्रिय, फटकळ, सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह असते.

अभिनेत्री कंगना रानौत यांची क्रॉसेस युक्त सही

  • सहीच्या शेवटी मागे जाणारी अंडरलाईन ओढली असेल तर अशी व्यक्ती भूतकाळातील दुःखद घटनांचे ओझे घेऊन जगत असते. अशा व्यक्तीलाही सातत्याने विविध प्रकारच्या समस्या येत रहातात.

तुमच्या सहीचं रहस्य

  • सहीच्या वरच्या भागात अक्षरांची टोके मागच्या दिशेला झेपावत असतील तर अशा व्यक्तीला लपवाछपवी करण्याची सवय असू शकते.
  • कांही लोक आपल्या सहीची सुरवात वर्तुळाकारातून करतात, किंवा सहीच्या पहिल्या अक्षराभोवती वर्तुळ काढून मग पुढे जातात. अशा व्यक्ती एका विशिष्ट परिस्थितीत अडकून पडतात, ज्यातून बाहेर पडणे त्यांना अवघड होऊन जाते.
  • उतरती सही हे डिप्रेशनचे लक्षण असते. अशी सही करणारे लोक प्रगतीकडे नव्हे तर अधोगतीकडे वाटचाल करत असतात.

अभिनेता राजेश खन्ना यांची उतरती सही

  • आपल्या सहीला मोठी अंडरलाईन देणारी व्यक्ति अनावश्यक ठामपणा दाखवत असते. अशा व्यक्ती लवचिक धोरण स्वीकारत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तिंचे व्यवहार आणि नातेसंबंध बिघडतात.
  • ज्यांचा सहीचा बेस वरखाली झालेला असतो, एका लेव्हलमध्ये नसतो त्यांचे जीवन खाचखळग्यांनी भरलेले आणि डळमळीत असते.
  • सहीची सुरवात मोठी असेल आणि सही जसजशी पुढे जाते तसतसे अक्षरे लहान होत गेली असतील तर ती व्यक्ति आरंभशूर असते.
  • तुमच्या सहीमध्ये वरीलपैकी कोणतेही दोष असतील तर ते तुम्ही त्वरित काढून टाकायला पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या समस्या निश्चितच सुटतील.

तुमच्या सहीमध्ये दोष असतील तर जाणकार व्यक्तिचा सल्ला घेऊन सहीमध्ये योग्य बदल करायला पाहिजे.

वैयक्तिक मार्गदर्शनासाठी फोन करा: महावीर सांगलीकर 8149128895 (11AM to 7.30PM)

हेही वाचा:

अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 203
Please follow and like us:
Pin Share

3 thoughts on “तुमच्या सहीचं रहस्य | Graphology

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *