
महावीर सांगलीकर
Senior Numerologist & Graphologist
Phone Number 8149703595
नातेसंबध
आई-मुलगी, आई-मुलगा, वडील-मुलगा, वडील-मुलगी, भाऊ-भाऊ, बहीण-बहीण, भाऊ-बहीण, काका-पुतण्या, मामा-भाचा, पती-पत्नी, सासू-सून, नंणद-भावजय अशी आणि इतर कितीतरी कौटुंबिक नाती असतात. अशा नात्यांमध्ये काही जोड्यांमध्ये चांगलेच सख्य असते, तर काही जोड्यांमध्ये सतत वादविवाद, कुरबुरी, मत्सर अशा गोष्टी पाहायला मिळतात. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची एकमेकांशी असणारी आपुलकी, प्रेम सारख्याच प्रमाणात नसते. उदाहरणार्थ, एकाच आईचे आपल्या एका मुलावर जास्त प्रेम असते तर दुसऱ्यावर कमी असते.
कुणाचे कुणाशी पटेल अथवा पटणार नाही?
कुणाचे कुणाशी पटेल अथवा पटत असेल, आणि कुणाशी पटणार नाही, हे त्या दोन व्यक्तींच्या जन्मतारखांवरून सांगता येते. हे पटणे अथवा न पटणे ओळखण्यासाठी त्या दोन्ही व्यक्तींचा जन्मांक, ऍटिट्यूड नंबर आणि भाग्यांक यांचा विचार करावा लागतो.
जर त्या दोन्ही व्यक्तींचा जन्मांक समान असेल, तर त्यांच्यात मैत्रीचे संबंध असतात. उदाहरणार्थ, एखाद्या सासूचा जन्मांक 1 आहे आणि सुनेचाही जन्मांक 1 आहे, तर त्या सासू-सुनेमध्ये मैत्रीचे संबंध असतात.
याशिवाय, जर त्या दोन्ही व्यक्तींचा जन्मांक समान नाही, पण त्यातील एका व्यक्तीचा ऍटिट्यूड नंबर हा दुसऱ्या व्यक्तीचा जन्मांक, भाग्यांक किंवा ऍटिट्यूड नंबर असेल, तर अशा अवस्थेत देखील त्या दोन्ही व्यक्तींमध्ये मैत्रीचे संबंध असतील.
जर दोन्ही व्यक्तींचा जन्मांक समान नाही, पण त्यांच्या चार्टमध्ये समान नंबर्स आहेत, अशांचीही चांगली मैत्री असते. उदाहरणार्थ, एकाचा जन्मांक 2 आणि भाग्यांक 3 आहे, आणि दुसऱ्याचा जन्मांक 3 आणि भाग्यांक 2 आहे, अशा अवस्थेत त्या दोघांचे चांगले पटेल. पण जर चार्टमध्ये एखादा समान नंबर आहे, पण दोघांचे जन्मांक विसंगत (incompatible) आहे, अशा स्थितीत त्या दोघांचे पटेलच असे नाही.
समान नंबर्सशिवाय सुसंगत नंबर्स असणाऱ्या व्यक्तींचीही एकमेकांशी चांगली मैत्री होऊ शकते.
नातेसंबध
जन्मांक विसंगत असणाऱ्या व्यक्तींचे एकमेकांशी सहसा जमणार नाही, त्यांच्यातील संबंध खेळीमेळीचे असणार नाहीत आणि त्यांच्यात दुरावा असेल. ज्या सासू-सुनेचे जन्मांक विसंगत असतात, त्यांचे पटत नसते. हीच गोष्ट घरातील इतर नात्यांनादेखील लागू होते.
कुणाच्याही जन्मतारखेतुन मिळणाऱ्या जन्मांक, ऍटिट्यूड नंबर, भाग्यांक या गोष्टी बदलता येत नाहीत. शिवाय एखाद्या घरातील सगळ्यांचेच नंबर्स सुसंगत असणे ही गोष्ट दुर्मिळ आहे.
जन्मांक= जन्मतारखेतील अंकांची बेरीज (D+D) (अंकशास्त्र | जन्मांक म्हणजे काय?)
ऍटिट्यूड नंबर= जन्मतारीख आणि जन्म महिना यातील अंकांची बेरीज (D+D+M+M)
भाग्यांक= पूर्ण जन्म तारखेतील अंकांची बेरीज (D+D+M+M+Y+Y+Y+Y)
एका घरातील सर्व सदस्यांचे नंबर्स सुसंगत असणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणूनच, नातेसंबंध सुधारण्यासाठी केवळ अंकशास्त्रावर अवलंबून राहता येत नाही. परस्पर संवाद, सहनशीलता आणि आदर यांना प्राधान्य दिल्यास कोणतेही नाते अधिक चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकते.
सुसंगत आणि विसंगत अंक कोणते याची माहिती पुढील लेखात वाचावी: Numerology: नंबर कम्पॅटिबिलिटी
हेही वाचा …..
न्यूमरॉलॉजी: तुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष
Numerology: नंबर कम्पॅटिबिलिटी
Number 24: शांती, सुसंवाद आणि सुबत्ता यांचा अंक
महिलांची मानसिकता, स्वभाव आणि समस्या
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
https://t.me/numerologymarathi
TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)
One thought on “कौटुंबिक नातेसंबध आणि अंकशास्त्र”