नावात काय आहे? नावात बरंच कांही आहे! What is in the Name?

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist & Graphologist
Phone Number 8149703595

नावात काय आहे? असं शेक्सपियरनं म्हंटलं होतं. पण त्याचं हे म्हणणं विशिष्ट संदर्भात होतं. प्रत्यक्षात नावात बरंच कांही आहे आणि असतं.

नावात काय आहे? हे आहे नावाचं महत्व….

नावात काय आहे? तर नाव ही त्या-त्या व्यक्तिची पहिली आणि सगळ्यात महत्वाची ओळख आहे. नाव नसणारी एखादी व्यक्ती अस्तित्वात असू शकत नाही. नाव हा त्या व्यक्तीचा ब्रॅंड असतो. अगदी पाळीव प्राण्यांनाही नावे असतात!

नावावरून ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे हे तिला न पहाताही कळतं. (अर्थात कांही नावे याला अपवाद असू शकतात… उदा. किरण, कमल, मंगल वगैरे).

नावात कांही नसतं तर नामांकित, नावाजलेले, नावलौकिक, असे शब्द आणि नाव कमावणे, नाव काढणे, नाव धुळीला मिळवणे असे शब्दप्रयोग अस्तित्वात आले नसते. अपवाद वगळता प्रत्येकाला आपल्या नावाचा अभिमान असतो. कोणी आपल्या नावाचा उच्चार चुकीचा केला तर आपल्याला ते आवडत नसते.

प्रत्येकाच्या नावाचा विशिष्ट अर्थ असतो. त्या नावाला पार्श्वभूमीही असते. कांही नावं ऐकायला गोड वाटतात, तर कांही नावं ऐकायला नकोशी वाटतात. नावावरून त्या व्यक्तिची बरीच माहिती उघड होवू शकते, जसं त्याचा भाषिक समूह, प्रांत, जात, सामाजिक दर्जा, आणि बऱ्याचदा धर्म देखील. नाव आणि आडनावावरून जात शोधण्याचा प्रकार तर भारतात फारच मोठ्या प्रमाणावर चालतो.

आपलं नाव आकर्षक, ऐकायला गोड वाटणारं असणं हे फार महत्वाचं असतं. तुमच्या नावातले स्वर आणि व्यंजनं, त्यांची संख्या आणि प्रमाण यावर तुमच्या नावाचा गोडवा अवलंबून असतो.

नावात कांही नसतं तर लोकांनी आपल्या मुलांची नावं विचारपूर्वक ठेवली नसती. तुम्हाला राम, कृष्ण, भीम, महावीर, गौतम, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी, तानाजी अशी नावे समाजात मोठ्या प्रमाणावर आढळतील, पण शकुनी, कंस, धृतराष्ट्र, रावण, बकासुर अशी नावे दिसतात का?

कांही विशिष्ट नावाच्या लोकांना आयुष्यात प्रचंड धन-संपत्ती आणि सुबत्ता मिळत असल्याचे दिसते, तर इतर कांही विशिष्ट नावाच्या व्यक्तींना नातेसंबंधात समस्या निर्माण होत असल्याचे दिसते.

कंपन्यांची, बिझनेस हाऊसेसची नाव विचारपूर्वक ठेवलेली असतात. ती अपीलिंग असावीत याची दक्षता घेतली जाते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणाऱ्या एखाद्या अभिनेत्याचे अथवा अभिनेत्रीचे नाव अपीलिंग वाटत नसेल तर ते बदलले जाते आणि त्या कलाकाराला एखादे वेगळे नाव दिले जाते.

नावात काय आहे? नाव आणि न्यूमरॉलॉजी

न्युमरालॉजी (अंकशास्त्र) मध्ये नावाला जन्मतारखेसारखंच महत्व आहे. न्यूमरालॉजीचे डेट न्यूमरॉलॉजी आणि नेम न्यूमरॉलॉजी असे दोन विभाग आहेत, आणि दोन्ही सारखेच महत्वाचे आहेत. नावाच्या अंकातील किंमतीवरून त्या नावाचे गुणदोष कळतात. व्यक्तीच्या पूर्ण नावातून तुम्हाला तीन वेगवेगळे महत्वाचे अंक (Core Numbers) मिळतात, त्यावरून त्या व्यक्तीविषयी बरेच निष्कर्ष काढता येतात.

नावाप्रमाणेच तुमचं आडनाव काय आहे याचेही फयदे-तोटे होत असतात. हे फायदे-तोटे त्या नावाच्या अंकातील किमतीनुसार आपल्याला कळू शकतात. तसेच आपल्या आडनावाचे कांही सामाजिक फायदे-तोटेही असतात.

कांही न्यूमरॉलॉजिस्ट तुमच्या नावात दोष आहे असे सांगून तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करायला सांगतात. पण प्रत्यक्षात त्याचा कांही उपयोग होत नाही, आणि असा बदल करणं व्यावहारिकही नसतं. शिवाय नावाच्या स्पेलिंगमध्ये एखादं अक्षर वाढवून ते नाव करप्ट करायचा उद्योग तुमच्या अंगलट येऊ शकतो. त्यामुळं नावाचं स्पेलिंग बदलायच्या भानगडीत ना पडलेलं बरं! (याविषयीचा माझा नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा! हा लेख अवश्य वाचावा).

तर नावात काय आहे हे विचारण्यापेक्षा काय नाही हे विचारणं जास्त योग्य ठरेल!

हेही वाचा:

बाळासाठी अंकशास्त्रानुसार लकी नावाचे कांही निकष

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव

बाळाचे नाव…. नावरस नाव म्हणजे काय?

Numerology Name Correction: Does It Really Work?

Views: 20
Please follow and like us:
Pin Share

8 thoughts on “नावात काय आहे? नावात बरंच कांही आहे! What is in the Name?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *