Name Correction – नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

Please follow and like us:
Pin Share

© महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist
Cell Phone Number 8149128895

Name Correction: नावाचं स्पेलिंग बदलण्याचं फॅड

अलिकडं समाजात अंकशास्त्रानुसार आपल्या नावाचं स्पेलिंग बदलण्याचं फॅड आलं आहे. स्पेलिंग बदलून नामांक बदलता येतो हे बरोबर आहे, पण त्यानं खरंच कांही फरक पडतो का? आणि असा बदल करणं व्यावहारिक आणि फायदेशीर आहे का? या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.

याबाबतीत तुम्ही सर्वात महत्वाची ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही नावाचं स्पेलिंग बदललं, किंवा आख्खं नाव जरी बदललं तरी तुमच्या मूळ नावाचा, स्पेलिंगचा तुमच्यावर असणारा प्रभाव नष्ट होत नसतो, तो शेवटपर्यंत टिकून रहातो. तुमच्या नवीन नावाचा किंवा स्पेलिंगचा प्रभाव हा अधिकचा (Additional) प्रभाव म्हणता येईल, पण तोही लगेच लागू होत नसतो, त्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात. (ज्यांना लगेच फरक पडला असं वाटतं ते केवळ मानसशास्त्रीय कारणानं असतं).

Name Correction: नेम करेक्शन नव्हे, हे तर नेम करप्शन आहे!

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्पेलिंगमधील बदलानं नावाचा उच्चार वेगळा होत असेल, अर्थ बदलत असेल तर स्पेलिंग बदलाचा तुम्हाला फायदा होण्याऐवजी तोटाच होईल.

समजा तुमचं नाव Kiran आहे. तुम्ही ते बदलून Kirran किंवा Kkirran, Kirron केलं तर मूळ किरण या नावाचा उच्चार बदलेल, अर्थही नाहीसा होईल, त्यामुळं तुम्हाला Kiran या नावाचे मिळणारे फायदे हळूहळू कमी होत जातील. शिवाय याप्रकारे बदललेल्या नावाचा कांही फायदाही होणार नाही. उलट स्पेलिंग बदलण्याच्या नादात तुमचं नाव विकृत होईल आणि त्याचा तुम्हाला मोठा फटका बसू शकेल.

Kiran या नावाचे Kirran/Kirron असे, Yash या नावाचे Yasshh, Yasshh असे किंवा Om या नावाचे Omm असे स्पेलिंग करणे म्हणजे नेम करेक्शन नसून नेम करप्शन आहे! या प्रकारची भ्रष्ट आणि विकृत नावे तुम्हाला नक्कीच अडचणीत आणू शकतात.

नावाचं स्पेलिंग बदलायचा सल्ला देणारे अनेक न्यूमरॉलॉजिस्ट (जे अंकशास्त्राची सखोल माहिती नसणारे पोथीवादी हवेसे-नवसे-गवसे असतात), अतिशय चुकीचा, हास्यास्पद आणि कॉमन सेन्स व लॉजिक यांची वाट लावणारा सल्ला देत असल्याचे दिसते.

मोठमोठे उद्योगपती, शास्त्रज्ञ, नेते यांच्या नावांची यादी पहा. ते आपल्या कर्तृत्वाने आणि बुद्धीने मोठे झाले, नावाचे स्पेलिंग बदलायचा वेडगळपणा त्यांनी केला नाही.

त्यांचे आशीर्वाद नष्ट करू नका!

वास्तविक पहाता तुमचं नाव जेंव्हा ठेवलं गेलं त्यावेळी तुमची आई, आजी, मावशी, काकू, आत्या असा मोठा गोतावळा हजर होता. त्या सर्वांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्या नावामागे आहेत. शिवाय तुमचे नाव तुम्ही आत्तापर्यंत दुसऱ्यांच्या तोंडून कित्येक वेळा ऐकत आला आहात. त्यातून मिळालेले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स हा तुमच्याकडील मोठा ठेवा आहे. मग तुमचे नाव करप्ट करून हे व्हायब्रेशन्स मिळवायचे तुम्ही बंद का करता?

आपले नाव त्याचे स्पेलिंग बदलून विकृत करणे म्हणजे एक वेडपटपणा आहे. हा वेडपटपणा भारतातच, तो ही सामान्य मध्यमवर्गीय लोकांच्यात आणि कलाकारांच्यामध्ये दिसून येतो.

Name Correctin व्यावहारिक नाही!

नावात किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करणं हे प्रॅक्टिकलही नाही. म्हणजे तुम्ही कागदोपत्री कुठं-कुठं बदल करणार? आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट, लाईट बिल, मतदार यादी, पासपोर्ट, सातबारा, इंडेक्स वगैरे…. या सगळ्या ठिकाणी बदल करणं तुम्हाला शक्य आहे का? तुमचं बर्थ सर्टिफिकेट, तुमची शैक्षणिक सर्टिफिकिटं या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव किंवा नावाचं स्पेलिंग कसं काय बदलू शकाल? आणि एवढं सगळं केलं तरी तुमच्या मूळ नावापासून, त्याच्या प्रभावापासून मुक्त होऊ शकणार आहात काय?

महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या नावात एका अक्षराचा जरी फरक केलात तर तुम्हाला अनेक कायदेशीर अडचणी येऊ शकतात…. म्हणजे तुमच्या नावाचं नवं स्पेलिंग कायदेशीररित्या कुठेच चालू शकत नाही.

नावात किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये नंतर बदल करण्यापेक्षा मुळात नाव ठेवतानाच योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. तरीही तुम्हाला स्पेलिंगमध्ये बदल करायचाच असेल तर वरील सर्व बाबींचा विचार करायला पाहिजे! खरं म्हणजे एखाद्या नावाचं स्पेलिंग मुळातच चुकीचं लिहिलं गेलं असेल तर ते दुरुस्त करायला हरकत नाही, पण उगीचच नावाचां स्पेलिंग बदलून ते विकृत करायचं टाळलं पाहिजे.

समस्या सोडवण्याचा Name Correction हा मार्ग नव्हे

नावाचं स्पेलिंग बदलल्यानं आपल्या समस्या सुटतात असं कांही जणांना वाटतं, कारण धंदेवाईक न्यूमरॉलॉजिस्टसनी तसा समज प्रिंट आणि सोशल मेडियातनं पद्धतशीरपाने पसरवला आहे. अनेक लोक त्याला बळी पडतात. पण वर सांगितल्याप्रमाणं स्पेलिंग बदलून नाव करप्ट केल्यास लेने के देने पडतात. तुमचे पैसे तर जातीलच पण तुम्हाला मोठा फटका बसेल.

तुम्हाला काही समस्या असल्यास तुमचं नाव करप्ट करण्याऐवजी प्रॅक्टिकल सोल्युशन्स शोधा! त्यातच तुमचं हित आहे.

हेही वाचा:

नावात बदल करण्याची कायदेशीर प्रक्रिया | Name Change Marathi

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

गौरी आणि फेस रीडर (लघुकथा)

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Numerology Solutions Consultation Charges

Views: 103
Please follow and like us:
Pin Share