महावीर सांगलीकर
Senior Numerologist, Graphologist
Phone Number 8149128895
अंकशास्त्रातील कोअर नंबर्स
कोअर नंबर्स: अंकशास्त्राचा अभ्यास आणि प्रॅक्टिस करणाऱ्यांना कोअर नंबर्सची माहिती असणे ही गोष्ट फार महत्वाची आहे.
आपल्याकडे अंकाशास्त्रानुसार सल्ला देणारे बहुतेक लोक फक्त जन्मांकाचा आणि फार तर नामांकाचा विचार करतात. चाल्डियन अंकशास्त्रात तर केवळ नामांकाचा विचार केला जातो.
पण केवळ नामांकावरून अथवा जन्मांकावरून एखाद्या व्यक्तीचे नीट आकलन होऊ शकत नाही. खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीशी वेगवेगळे असे 20 हून जास्त अंक संबंधीत असतात. त्या सर्व अंकांशी संबंधित असे गुणदोष त्या-त्या व्यक्तीमध्ये कमी-जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यापैकी 6 अंक अतिशय महत्वाचे असतात. त्यांना कोअर नंबर्स असे म्हंटले जाते. मॉडर्न वेस्टर्न न्यूमरॉलॉजीमध्ये (जी पायथॅगोरिअन न्यूमरॉलॉजीचे विकसित रूप आहे) या कोअर नंबर्सचा प्रामुख्याने विचार केला जातो, तसेच इतरही कांही अंकांचा विचार केला जातो.
या लेखात मी या कोअर नंबर्सची माहिती देत आहे, जी अंकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना उपयोगी ठरेल. इथे मी प्रकारानुसार या नंबर्सना असलेली इंग्रजी नावेच वापरली आहेत, ज्यामुळे विषय समजायला सोपा होईल. (यातील अनेक नंबर्सना मराठीत पर्यायी नावे नाहीत, कारण आपल्या इथे त्यांचा विचारच केला जात नाही).
सहा कोअर नंबर्सची अंकशास्त्रीय नावे पुढीलप्रमाणे आहेत: लाईफ पाथ नंबर, ऍटिट्यूड नंबर, बर्थ नंबर, एक्स्प्रेशन नंबर, हार्ट’स डिझायर नंबर आणि पर्सनॅलिटी नंबर. यातील लाईफ पाथ नंबर, ऍटिट्यूड नंबर, बर्थ नंबर हे जन्मतारखेवरून काढले जातात तर एक्स्प्रेशन नंबर, हार्ट’स डिझायर नंबर आणि पर्सनॅलिटी नंबर नावावरून काढले जातात.
जन्मतारखेतून निघणारे 3 कोअर नंबर्स
लाईफ पाथ नंबर
पूर्ण जन्मतारखेतील सर्व अंकांची बेरीज केल्यावर जो अंक येतो तो म्हणजे लाईफ पाथ नंबर. उदा. 15.03.1989 = 1+5+0+3+1+9+8+9 = 36 = 3+6 = 9. इथे 9 हा लाईफ पाथ नंबर आहे. लाईफ पाथ नंबर व्यक्तीच्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव टाकतो. या नंबरवरून संबंधित व्यक्ती कशा प्रकारचे जीवन व्यतीत करेल हे सांगता येते.
ऍटिट्यूड नंबर
ज्या दिवशी जन्म झाला टी तारीख आणि महिना यातील अंकांची बेरीज म्हणजे ऍटिट्यूड नंबर. उदा. 25 मार्च म्हणजे 25.03 = 2+5+0+3 =10=1+0=1, म्हणून 25 मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तीचा ऍटिट्यूड नंबर 1. ऍटिट्यूड नंबर कोअर नंबर्समध्ये धरला जात नाही, पण तो कोअर नंबर्सएवढाच महत्वाचा असतो.
बर्थ नंबर
तुमच्या जन्म महिन्याच्या ज्या तारखेस झाला त्या तारखेची एक अंकी बेरीज म्हणजे बर्थ नंबर. उदा. तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 25 तारखेस झाला असेल तर 25 = 2+5 = 7 हा तुमचा बर्थ नंबर. या नंबरवरून व्यक्तीचा स्वभाव, गुणदोष वगैरे सांगता येते.
नावातून निघणारे 3 कोअर नंबर्स
मॉडर्न वेस्टर्न न्यूमरॉलॉजीमध्ये नावावरून नंबर काढण्याची पायथॉगोरिअन मेथडचा उपयोग केला जातो. ही मेथड अतिशय सोपी आणि लॉजिकल आहे, तिथे कन्फ्यूजन आणि अव्यस्थितपणाला थारा नाही. नावाच्या स्पेलिंग वरून नावाची अंकातील किंमत काढण्यासाठी या मेथडमध्ये प्रत्येक अक्षराचे इंग्रजी अल्फा बिट्समध्ये जे स्थान आहे, तीच त्या त्या अक्षराची अंकातील किंमत असते. उदा. A हे अक्षर पहिल्या स्थानावर आहे म्हणून त्याची किंमत 1 आहे. त्याचप्रमाणे B= 2, C=3, D =4 ….. H =8, I = 9 ….. X = 24 = 6, Y = 25 =7, Z = 26 =8. (10 ते 26 या स्थानावरील अक्षरांची किंमत दोन अंकी असते. सामान्य रीडींगसाठी दोन अंकी नंबर्सला त्या अंकांची बेरीज करून एक अंकी बनवले जाते).
पूर्ण नावातून निघणारे 3 कोअर नंबर्स पुढीलप्रमाणे आहेत:
एक्स्प्रेशन नंबर
पूर्ण नावातील सर्व अक्षरांच्या अंकातील किमतींची बेरीज म्हणजे एक्स्प्रेशन नंबर. याला डेस्टिनी नंबर असेही म्हणतात. या नंबरमुळे संबधित व्यक्तीच्या उपजत गुणदोषांची, कौशल्यांची माहिती मिळते, तसेच सदर व्यक्तीच्या आयुष्याची दिशाही कळते.
हार्ट’स डिझायर नंबर
हार्ट’स डिझायर नंबर हा पूर्ण नावातील स्वरांच्या (A, E, I, O, U) किमतींची बेरीज करून काढला जातो. याला सोल अर्ज नंबर असेही म्हंटले जाते. या नंबरमुळे संबंधित व्यक्तीच्या आंतरिक इच्छा-आकांक्षा, पॅशन्स वगैरे कळतात.
पर्सनॅलिटी नंबर
पूर्ण नावातील व्यंजनांच्या अंकातील किमतींची बेरीज म्हणजे पर्सनॅलिटी नंबर. या नंबरवरून त्या व्यक्तीची समाजात कशी इमेज आहे (Public Image) हे कळते.
एखाद्या व्यक्तीच्या कोअर चार्टमध्ये कोणकोणते अंक आले आहेत, त्या अंकांची एकमेकांशी कम्पॅटिबिलिटी किती आहे, कोणते अंक रिपीट झाले आहेत, यावरून संबंधित व्यक्तीचे सखोल विश्लेषण करता येते.
कोअर नंबर्सची कॉम्बिनेशन्स
अशा या सहा कोअर नंबर्सची कॉम्बिनेशन्स किती होत असतील? तर ती चक्क 531441 इतकी होतात! पण ही कॉम्बिनेशन्स आपण अंक 1 ते 9 असे धरले तर होतात. या ऐवजी आपण तारखेच्या बाबतीत 1 ते 31 आणि अक्षरांच्या बाबतीत 1 ते 100 असे अंक धरले तर ही कॉम्बिनेशन्स अब्जावधी होतात! (पूर्ण नावातून येणारा नामांक साधारणपणे 100 पर्यंत अथवा त्याहून मोठा असू शकतो).
मॉडर्न वेस्टर्न न्यूमरॉलॉजीमध्ये कोअर नंबर्स शिवाय इतरही अनेक नंबर्स असतात. त्या सगळ्यांचा विचार केला तर ‘सेम टू सेम न्यूमरॉलॉजी चार्ट’ असणाऱ्या दोन व्यक्ती सापडणे जवळ जवळ अशक्य आहे!
हेही वाचा:
अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!
वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?
Name Correction – नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi
TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)
One thought on “Numerology: कोअर नंबर्स”