महावीर सांगलीकर
Senior Numerologist & Graphologist
Cell Phone 8149128895
नंबर कम्पॅटिबिलिटी: अंकांची सुसंगतता व विसंगतता
न्यूमरॉलॉजीनुसार प्रत्येक अंकांचे कांही विशेष गुण असतात तर कांही विशेष दोष असतात. एखाद्या अंकाचे कांही गुणदोष दुसऱ्या एखाद्या अंकांत नसतील असे नाही, आणि असतील असेही नाही. एखाद्या अंकाचे कांही गुणदोष दुसऱ्या एखाद्या अंकाच्या कांही गुणदोषांशी अगदी विपरीत असे असू शकतात, तर एखाद्या अंकाचे कांही गुणदोष दुसऱ्या एखाद्या अंकाच्या कांही गुणदोषांसारखे असू शकतात. या सगळ्या गोष्टींवरून कोणत्याही दोन अंकातील सुसंगतता अथवा विसंगतता ठरते. याला नंबर कम्पॅटिबिलिटी/ इनकम्पॅटिबिलिटी (Compatibility/incompatibility) असे म्हणतात.
कांही लोक कम्पॅटिबल अंकांना ‘मित्र अंक’ आणि इनकम्पॅटिबल अंकांना ‘शत्रू अंक’ असे म्हणतात. पण असे म्हणणे एकदम चुकीचे आहे, कारण कम्पॅटिबिलिटी म्हणजे मैत्री नव्हे, आणि इकम्पॅटिबिलिटी म्हणजे शत्रुत्व नव्हे!

नंबर कम्पॅटिबिलिटी
प्रत्येक अंक त्याच अंकाशी पूर्णपणे कम्पॅटिबल असतो. म्हणजे 1 आणि 1, 2 आणि 2 …. 9 आणि 9 हे अंक एकमेकांशी पूर्णपणे कम्पॅटिबल असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक अंक दुसऱ्या एखाद्या अंकाशी पूर्णपणे नसला तरी चांगला कम्पॅटिबल असतो. उदाहरणार्थ, 2 हा अंक 4 आणि 6 या अंकांशी चांगलाच कम्पॅटिबल आहे.
याउलट प्रत्येक अंक दुसऱ्या एखाद्या अंकाशी अजिबात कम्पॅटिबल नसतो. उदाहरणार्थ 3 आणि 4 हे अंक एकमेकांशी अजिबात कम्पॅटिबल नाहीत. हे दोन अंक अजिबात कम्पॅटिबल नाहीत याचा अर्थ या दोन अंकांचे गुणदोष फारच विपरीत आहेत.
लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा अंक दुसऱ्या एखाद्या अंकाशी कांही बाबतीत कम्पॅटिबल तर कांही बाबतीत इनकम्पॅटिबल असू शकतो. उदा. 1 आणि 8 हे अंक बिझनेस पार्टनरशिपसाठी कम्पॅटिबल आहेत , पण रिलेशनशिपसाठी इनकम्पॅटिबल आहेत.
नंबर कम्पॅटिबिलिटी आणि इंकम्पॅटिबिलटीचा उपयोग
कम्पॅटिबिलिटी आणि इनकम्पॅटिबिलिटीचा उपयोग एखादी व्यक्ती दुसऱ्याशी सुसंगत आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी, व्यावसायिक भागीदार निवडण्यासाठी, आपल्या व्यवसायात महत्वाच्या पदावर योग्य व्यक्ती नेमण्यासाठी, परफेक्ट वधू अथवा वर निवडण्यासाठी करता येतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या न्यूमरॉलॉजी चार्टमधील कोअर नंबर्सची एकमेकांशी असणारी कम्पॅटिबिलिटी पाहून त्या व्यक्तीविषयी कांही महत्वाचे निष्कर्ष काढता येतात.
केवळ जन्मांकावरून कम्पॅटिबिलिटी अथवा इनकम्पॅटिबिलिटी विचार करणे चुकीचे ठरते. तुम्ही पूर्ण जन्म तारखेतून निघणाऱ्या जन्मांक, ऍटिट्यूड नंबर आणि भाग्यांक या तिन्हींचा विचार केला तरच योग्य उत्तर मिळू शकते.
कम्पॅटिबिलिटी आणि इनकम्पॅटिबिलिटी या विषयाचे अनेक पैलू आहेत. त्यात अतिशय किचकटपणा आहे, तो समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर बेसिक न्यूमरॉलॉजीचा सखोल अभ्यास करावा लागेल. त्यामुळे केवळ कम्पॅटिबिलिटी चार्टवरून कम्पॅटिबिलिटी ठरवणे चुकीचे ठरते.
नंबर कम्पॅटिबिलिटी / इंकम्पॅटिबिलटीचा चार्ट
पुढे दिलेले टेबल हे सर्वसाधारण माहितीसाठी आहे, नंबर कम्पॅटिबिलिटी ठरवण्यासाठी वर दिलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.
नंबर | वेल कम्पॅटिबल नंबर्स | सेमी कम्पॅटिबल नंबर्स | इनकम्पॅटिबल नंबर्स |
1 | 1, 5, 7 | 3, 8, 9 | 2, 4, 6 |
2 | 2, 4, 6, 8 | 3, 9 | 5, 7 |
3 | 3, 6, 9 | 1, 2, 5 | 4, 7, 8 |
4 | 2, 4, 6, 8 | 7 | 1, 3, 5, 9 |
5 | 1, 5, 7 | 3, 9 | 4, 2, 6, 8 |
6 | 2, 3, 4, 6, 8, 9 | – | 1, 5, 7 |
7 | 1, 5, 7 | 4, 9 | 2, 3, 6, 8 |
8 | 2, 4, 6, 8 | 1 | 3, 5, 7, 9 |
9 | 3, 6, 9 | 1, 2, 5, 7 | 4, 8 |
हेही वाचा:
Vastudosh: वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?
Name Correction – नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!
तुमच्या सहीचं रहस्य | Graphology
नावात काय आहे? नावात बरंच कांही आहे! What is in the Name?
Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi
TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)
4 thoughts on “Numerology: नंबर कम्पॅटिबिलिटी”