महावीर सांगलीकर
Senior Numerologist & Graphologist
Phone Number 8149703595
24 या अंकाला कालगणना आणि धर्म या दोन्ही ठिकाणी महत्व दिले गेले आहे. दिवसाचे 24 तास, वर्षाचे 24 पंधरवडे, 24 तीर्थंकर, 24 बुद्ध, 24 अवतार, अशोक चक्रातील 24 आरे ही त्याची कांही उदाहरणे.
सोन्याची शुद्धता कॅरटमध्ये मोजली जाते. 24 कॅरटचे सोने 100 टक्के शुद्ध असते.
अंक 24 आणि न्यूमरॉलॉजी
खरं म्हणजे कोणताही अंक पूर्ण चांगला किंवा पूर्ण वाईट नसतो. प्रत्येक अंकाचे कांही गुण आणि कांही दोष असतात. कांही अंकात गुणांचे प्रमाण जास्त असते तर कांही अंकात दोषांचे. इथे 24 या अंकाचे गुणदोष म्हणजे ज्याचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 24 तारखेस झाला आहे, किंवा ज्याच्या जन्मतारखेतील सर्व अंकांची बेरीज 24 येते अशा व्यक्तीमध्ये असणारे गुणदोष हे लक्षात ठेवावे.
24 या अंकात इतर अंकांच्या मानाने दोषांचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे या अंकाला एक चांगला अंक म्हणता येईल. इथे 24 या अंकाचे गुणदोष म्हणजे ज्याचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 24 तारखेस झाला आहे, किंवा ज्याच्या जन्मतारखेतील सर्व अंकांची बेरीज 24 येते अशा व्यक्तीमध्ये असणारे गुणदोष हे लक्षात ठेवावे.
24 या अंकातील घटक अंक 2 आणि 4 हे आहेत. या घटक अंकाची बेरीज 6 येते. (2+4 = 6). त्यामुळे 24 या अंकात 6, 2 आणि 4 या तीनही अंकांचे गुणदोष असतात. हे गुणदोष पुढीलप्रमाणे आहेत:
6: शांती, सहयोग, कुटुंबवत्सलता, जबाबदारी, सुबत्ता, सौन्दर्य दृष्टी
2: व्यवहारकुशलता, मृदुभाषिता, संभाषणकौशल्य, मुत्सद्धीपणा, सेल्समनशिप, सौंदर्यदृष्टी, चंचलता, मुडी स्वभाव
4: तर्कनिष्ठ आणि चिकित्सक बुद्धी, योजनाबद्धता, स्पष्टवक्तेपणा, कामातील सातत्य, हार्डवर्क
विशेष म्हणजे 6, 2 आणि 4 हे अंक एकमेकांशी अतिशय सुसंगत (Highly compatible) आहेत.
अर्थात 24 या अंकात वरील तिन्ही अंकाचे गुणदोष सारख्या प्रमाणात नसतात, तर या अंकावर 6 या अंकाचा प्रभाव सगळ्यात जास्त, त्या खालोखाल 2 या अंकांचा प्रभाव आणि त्यानंतर 4 या अंकाचा प्रभाव असतो.
कोणत्याही महिन्याच्या 24 तारखेस जन्मलेली व्यक्ती कुटुंबवत्सल, प्रेमळ, जबाबदार, सर्वांना सांभाळून घेणारी, शांतीप्रिय, संवादकौशल्य असणारी, हार्डवर्किंग असते. त्याचप्रमाणे ती व्यक्ती आपल्या जीवनात अतिशय यशस्वी असते. त्या व्यक्तीचे हे गुण तिच्या चार्टमध्ये कोअर नंबर्समध्ये असलेल्या इतर अंकांनुसार कमी-जास्त होऊ शकतात.
24 हा शांती, सुसंवाद आणि सुबत्ता यांचा अंक आहे. शांत स्वभाव आणि सुसंवाद यामुळे 24 ही जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तींकडे सुबत्ता असणे हे ओघानेच आले. अर्थातच या गोष्टीला कांही लोक अपवाद असू शकतात, पण त्यांचे प्रमाण फार कमी आहे.
+
श्रीमंत लोक आणि अंक 24
जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत 24 तारखेला जन्मलेल्या (Birth Number 24) अथवा ज्यांच्या पूर्ण जन्मतारखेतील अंकांची बेरीज 24 (Life Path Number 24) आहे अशा व्यक्तींची संख्या Probability च्या नियमाप्रमाणे जेवढी असायला पाहिजे त्यापेक्षा खूप जास्त आहे. उदा. जगातील सर्वात श्रीमंत पहिल्या 40 व्यक्तींमध्ये पुढील 10 व्यक्तींची जन्मतारीख 24 आहे अथवा त्यांचा लाईफ पाथ नंबर 24 आहे:
जन्मतारीख 24
गौतम अदानी, अझीम प्रेमजी, अनिल आगरवाल, स्टिव्ह जॉब्स, स्टीव्ह बामेर, फिल नाईट, डिएटर श्वार्ट्झ, वांग झियांग लिन
लाईफ पाथ नंबर 24
जेफ बेझोस, वॉरन बुफे
24 तारखेस जन्मलेल्या इतर कांही प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे सचिन तेंडुलकर, सेठ लालचंद हिराचंद, सुभाष घई, तलत महमूद, संजय लीला भन्साळी, इम्रान हाश्मी, राजा परांजपे, राजदीप सरदेसाई, डॉ. कांतीलाल संचेती, आर. के. लक्ष्मण, सलीम खान, अमोल पालेकर वगैरे.
ज्या घरात भांडणे, कलह, अशांतता असते, परस्पर सामंजस्य नसते, तिथे 24 हा अंक घरातील सर्वांना येता जाता दिसत राहील अशा ठिकाणी लावला, तर त्याचा जादूसारखा उपयोग होऊ शकतो. हा अंक निळ्या किंवा हिरव्या रंगात असावा. हा अंक मोबाईल स्क्रीनवर ठेवला तरी त्याचा उपयोग होईल. (पण हा अंक सगळ्यांना सारखाच परिणाम देणार नाही. विशेषकरून जन्मांक किंवा भाग्यांक 2, 4, 6, 8, 9 असणाऱ्या लोकांना याचा चांगलाच फायदा होईल, तर जन्मांक/भाग्यांक 1, 5, 7 असणाऱ्या लोकांना हा अंक त्रासदायक ठरू शकतो. तुम्ही नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे की कोणताही अंक सरसकट सर्वांना लकी नसतो).
तुमची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 24 असेल किंवा तुमचा लाईफ पाथ नंबर 24 असेल तर तुमच्यात एक अतिशय यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती होण्याची मोठी क्षमता आहे. या संदर्भात तुम्हाला कांही मार्गदर्शन हवे असेल तर माझ्याशी अवश्य संपर्क साधावा.
+
हेही वाचा:
अंकशास्त्र: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24
Number 28: औद्योगिक यशाचा नंबर
Numerology: जॉब करावा की व्यवसाय?
Vastudosh: वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?
Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप
TheyWon Marathi
मराठी लघुकथा, लेख आणि कविता
One thought on “Number 24: शांती, सुसंवाद आणि सुबत्ता यांचा अंक”