अंकशास्त्र मास्टर नंबर्स : Numerology

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Numerologist & Graphologist
Cell Phone Number 8149128895

अंकशास्त्र मास्टर नंबर्स

अंकशास्त्रात 11, 22, 33 या नंबर्सना मास्टर नंबर्स या नावाने ओळखले जाते. हे तीनही नंबर्स 1 ते 9 यापैकी कोणत्याही अंकापेक्षा जास्त क्षमता दाखवतात.

तुमची जन्मतारीख 11 किंवा 22 असेल (Day Number), किंवा तुमची जन्मतारीख आणि जन्ममहिना यातील अंकांची बेरीज 11 किंवा 22 येत असेल (Attitude Number) , किंवा तुमच्या पूर्ण जन्मतारखेची बेरीज 11, 22 किंवा 33 येत असेल (Life Path Number), तर तुमच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये डेट नंबर्समध्ये संबंधित मास्टर नंबर आहे.

मास्टर नंबर्सची पुढील उदाहरणे पहा

  • जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 11 किंवा 22 आहे.
  • 9 फेब्रुवारी म्हणजे 09.02 या तारखेतील अंकांची बेरीज 11 आहे. (9+2=11). (Attitude Number)
  • 15 मे म्हणजे 15.5 या तारखेतील अंकांची बेरीज 11 आहे. (1+5+5=11.) (Attitude Number)
  • 2 जानेवारी 1990 म्हणजे 02.01.1990. या तारखेतील अंकांची बेरीज 22 आहे. (2+1+1+9+9=22). (Life Path Number)
  • 2 मार्च 1970 म्हणजे 02.01.1990. या तारखेतील अंकांची बेरीज 22 आहे. (2+3+1+7+0=22). (Life Path Number)
  • 3 फेब्रुवारी 1999 म्हणजे 03.02.1999 या तारखेतील अंकांची बेरीज 33 आहे. (3+2+1+9+9+9 =33). (Life Path Number)

जन्मतारखेशिवाय तुमच्या नावातही मास्टर नंबर असू शकतो. (नामांक). नावातील मास्टर नंबर्स एक्स्प्रेशन नंबर, सोल अर्ज नंबर उर्फ हार्ट’स डिझायर नंबर आणि पर्सनॅलिटी नंबरच्या रूपात असतो.

त्याचप्रमाणे वर्षांक, मासांक, फर्स्ट नेम नंबर, लास्ट नेम नंबर यातही मास्टर नंबर येऊ शकतो. पण असे नंबर्स कोअर नंबर्सएवढे महत्वाचे नसतात.

Numerology: मास्टर नंबर्स 1 ते 9 या इतर अंकापेक्षा संबंधित व्यक्तीमध्ये जास्त क्षमता असल्याचे दाखवतात. याचे कारण म्हणजे मास्टर नंबर्समध्ये दोन वेगवेगळ्या अंकांचे गुणधर्म असतात. जसे, 11 या अंकामध्ये एक या अंकाचे गुणधर्म तर असतातच, पण त्यात 1+1=2 या अंकाचे गुणधर्मही असतात. त्याचप्रमाणे 22 या मास्टर नंबरमध्ये 2 आणि 4 या अंकाचे तर 33 मास्टर नंबर्समध्ये 3 आणि 6 या अंकाचे गुणधर्म असतात. मास्टर नंबर्समध्ये दोन वेळा आलेल्या अंकाचे गुणदोष वाढीव प्रमाणात असतात.

मास्टर नंबर्सचे गुणधर्म

मास्टर नंबर 11
मृदुभाषिता, आध्यात्मिकता, तत्वज्ञान, संवेदनशीलता, संवादकौशल्य, अभ्यासू आणि संशोधक वृत्ती, पुढाकार, नेतृत्वगुण

मास्टर नंबर 22
धाडसी वृत्ती, सुधारक वृत्ती, कंस्ट्रक्टिव्ह काम, विचारांची स्पष्टता, बदल घडवण्याची क्षमता, जुनी सिस्टीम मोडण्याची वृत्ती, बंडखोरपणा, मुत्सद्दीपणा, संवादकौशल्य. 22 हा मास्टर नंबर 11 व 33 या मास्टर नंबर्सपेक्षा शक्तिशाली असतो.

मास्टर नंबर 33
आनंदी आणि उत्साही वृत्ती, विनोदबुद्धी, मनोरंजन, संवेदनशीलता, कुटुंबवत्सलता, सौहार्द, सुबत्ता वगैरे.

पण बरेच लोक त्यांच्याकडे एखादा मास्टर नंबर असला तरी त्यांच्यात असणाऱ्या संबंधित क्षमतांचा विकास आणि उपयोग करत नाहीत. असे लोक स्वतःला, स्वत:च्या क्षमतांना ओळखू शकलेले नसतात. तुमच्याकडे क्षमता असणे आणि तुम्ही तुमच्या क्षमता वापरणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुमच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये कोअर नंबर्समध्येएखादा मास्टर नंबर असल्यास तुम्ही तुमच्या संबंधित क्षमता ओळखल्या पाहिजेत आणि त्या क्षमतांचा विकास आणि वापर केला पाहिजे. असे केल्यास तुमच्या हातून मोठे कार्य होऊ शकेल आणि तुम्ही एक असे केल्यास एक अतियशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्ती व्हाल, तुमच्या हातून मोठे कार्य होऊ शकेल.

एखाद्याच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये कोअर नंबर्समध्ये एखादा मास्टर नंबर असणे ही कांही फार दुर्मिळ गोष्ट नव्हे. पण क्वचित लोकांच्या चार्टमध्ये 2 अथवा 3 मास्टर नंबर्स असतात. ही गोष्ट दुर्मिळ असते. असे लोक म्हणजे असीम क्षमतांची खानच असते!

मास्टर नंबर्स असणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती

ज्या व्यक्तीच्या कोअर नंबर्समध्ये एखादा किंवा एकाहून जास्त मास्टर नंबर्स आहेत, त्या व्यक्तीमध्ये आपल्या क्षेत्रात खूप मोठे आणि आश्चर्यजनक कार्य करण्याची क्षमता असते. याचे एक मोठे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा (Life Path Number) 22 होता. अशीच आणखी उदाहरणे म्हणजे छत्रपती राजाराम महाराज (भाग्यांक 22), जॉर्ज वॉशिंग्टन (जन्मांक 22), रामकृष्ण परमहंस (भाग्यांक 11) , स्वामी विवेकानंद (भाग्यांक 22), राजाराम मोहन रॉय (जन्मांक 22), महात्मा फुले (जन्मांक 11), छ. संभाजी महाराज (भाग्यांक 11), कर्मवीर भाऊराव पाटील (जन्मांक 22) , ओशो (जन्मांक 11) , अल्बर्ट आइनस्टाईन (भाग्यांक 33) , थॉमस अल्वा एडिसन (जन्मांक 11) , व्ही शांताराम (ऍटिट्यूड नंबर 11, भाग्यांक 22), अमिताभ बच्चन (जन्मांक 11) , दिलीपकुमार (जन्मांक 11), आमिर खान (भाग्यांक 11), अजित डोवाल (भाग्यांक 22), वॉरन बफेट (ऍटिट्यूड नंबर 11), बिल गेट्स (ऍटिट्यूड नंबर 11), सलमान खान (भाग्यांक 33), वगैरे. ही लिस्ट आणखी वाढवता येईल, पण इथे वानगीदाखल एवढेच पुरे आहे.

हेही वाचा ….

Number 28: औद्योगिक यशाचा नंबर

जॉब करावा की व्यवसाय?

Numerology: कोअर नंबर्स

नंबर कम्पॅटिबिलिटी

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 98
Please follow and like us:
Pin Share

2 thoughts on “अंकशास्त्र मास्टर नंबर्स : Numerology

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *