Numerology: 8 हा अंक अनलकी नाही…

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist & Graphologist
Phone Number 8149128895

8 हा अंक अनलकी नाही…

कांही न्यूमरॉलॉजिस्ट आणि न्यूमरॉलॉजीचा आधार घेणारे ज्योतिषी 8 हा अंक वाईट, अशुभ आणि अनलकी असल्याचे सांगत असतात. एक प्रसिद्ध ज्योतिषी-कम-न्यूमरॉलॉजिस्ट बाई तर असं सांगत असते की ‘मी सिनेमा बघायला गेले आणि 8, 17 किंवा 26 नंबरची सीट मिळाली तर मी त्या सीटवर बसत नाही, बसमध्येही या नंबरच्या सीटवर बसत नाही.’

View Post

8 हा अंक चाल्डियन न्यूमरॉलॉजिस्ट आणि ज्योतिषांनी अतिशय बदनाम केला आहे. या लोकांनी 8 या अंकाचा संबंध शनि या ग्रहांशी जोडला आहे आणि शनीचे सगळे दुर्गुण या अंकाच्या माथी थोपले आहेत. त्यामुळे ८ या अंकाविषयी समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत.

चाल्डियन न्यूमरॉलॉजिस्ट आणि ज्योतिषी ज्यांचा जन्म 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, अशांना भिती घालण्याचे उद्योग करत असतात. अर्थातच यामागे अज्ञान किंवा भीती घालून पैसे उकळणे हेच कारण असू शकते.

लकी नंबर 8

पण तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्यक्षात कोणत्याही अंकाचा कोणत्याही ग्रहाशी कसलाच संबंध नसतो, आणि कोणत्याही अंकावर कोणत्याही ग्रहाचा कोणताही प्रभाव नसतो. तसेच न्यूमरॉलॉजी आणि ज्योतिषशास्त्राचा काडीमात्रही संबंध नाही, पण न्यूमरॉलॉजीची प्रॅक्टिस करणारे ज्योतिषी असा संबंध ओढून-ताणून जोडत असतात.

वास्तविक पहाता कोणत्याही अंकाच्या दोन बाजू असतात, एक चांगली बाजू आणि एक वाईट बाजू. त्यानुसार ८ या अंकाच्याही चांगल्या बाजू आहेत, आणि वाईट बाजूही आहेत.

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेस झाला असेल, किंवा तुमचा ऍटिट्यूड नंबर किंवा भाग्यांक 8 असेल तर तुमची चांगली बाजू म्हणजे तुमच्याकडे प्रचंड पैसे मिळवण्याची, संपत्ती निर्माण करण्याची आणि आपल्या कामाच्या क्षेत्रात अधिकार आणि सत्ता संपादन करण्याची मोठी क्षमता आहे. तसेच तुमच्याकडे व्यवस्थापनाची आणि पैशांचं नियोजन करण्याचीही मोठी क्षमता आहे.

याउलट तुमची निगेटिव्ह बाजू म्हणजे कांही स्वभावदोष आणि नातेसंबंधात येणारी कटुता आणि तणाव. तुमच्यामध्ये हे सगळे गुणदोष सुप्त अथवा उघड अवस्थेत असतात. यातील कोणत्या गोष्टींना तुम्ही महत्व देतात त्यावर बरंच कांही अवलंबून असतं .

पण तुम्ही जर 8 या अंकाला वाईट समजत असाल तर त्याचा तुमच्यावर मानसशास्त्रीय कारणाने वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सर्वात अगोदर 8 हा अंक अनलकी नाही हे तुमच्या मनात पक्के बिंबवावे.

लकी नंबर 8

ज्यांचा जन्म 8, 17 किंवा 26 या तारखेस झाला आणि ज्यांनी मोठे यश मिळवले, ज्यांनी महान काम केले असे हजारो लोक जगाच्या पाठीवर होऊन गेले आहेत. त्यातील कांही उल्लेखनीय नावे म्हणजे मदर तेरेसा, ईश्वर चंद्र विद्यासागर, बाबा आमटे, प्रकाश आमटे, मनमोहन सिंग, एडवर्ड जेन्नर, स्टीफन हॉकिंग, जॉर्ज बर्नार्ड शॉ, बेंजॅमिन फ्रँकलिन, व्हिक्टर ह्यूगो, रॉबर्ट कियोसाकी, आशा भोसले, मौशुमी चॅटर्जी, सुनीता विल्यम्स, लुईज हे, जॉन अब्राहम वगैरे.

तेंव्हा तुमचा जन्म 8, 17, किंवा 26 तारखेस झाला असेल, किंवा तुमचा ऍटिट्यूड नंबर किंवा भाग्यांक असेल, तर तुमच्याकडेही तुमच्या आयुष्यात खूप मोठे यश मिळवण्याची आणि एखादे महान काम करण्याची मोठी क्षमता आहे हे लक्षात ठेवावे. यासंदर्भात तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही मला 8149128895 या नंबरवर 11 AM ते 6 PM या वेळेत फोन करू शकता.

हेही वाचा:

अंकशास्त्र आणि मनोरंजन | अंक 3 आणि 5

Fake Numerologists | अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!

Vastudosh: वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

Name Correction – नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 382
Please follow and like us:
Pin Share