Numerology: लकी मोबाईल फोन नंबर

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist, Graphologist
Mobile Phone: 8149128895

महत्वाची सूचना: लकी मोबाईल फोन नंबर ही काही सर्वात महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला कोणत्याही समस्या नसतील तर लकी मोबाईल फोन नंबरचा उपयोग तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळवण्यासाठी होईल. पण तुम्हाला काही समस्या असतील तर केवळ लकी मोबाईल फोन नंबर वापरल्याने त्या समस्या सुटणार नाहीत. समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला काही (पण सोपे-सुटसुटीत) उपाय करावे लागतील.

(अंकशास्त्रानुसार तुमचा लकी मोबाईल फोन नंबर निवडण्यासाठी मी ही प्राथमिक माहिती दिली आहे. या संदर्भातील वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा).

न्यूमरॉलॉजीमध्ये लकी नंबर्सना फार महत्व आहे. तुमच्या लकी नंबर्समुळे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, तुमचे नकारात्मक विचार दूर होतात, तुमच्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित होतात, तुम्हाला येणारे अडथळे कमी होतात आणि तुमची कामे पटापट होऊ लागतात. यामागे तुमच्या लकी नंबर्समुळे तुम्हाला मिळणारे व्हायब्रेशन्स आणि सायकॉलॉजी या दोन्ही गोष्टी काम करतात.

तुमचा जन्मांक, ऍटिट्यूड नंबर आणि भाग्यांक हे तुमचे लकी नंबर्स असतात. (अर्थात याला कांही अपवादही असतात).

तुमचा फोन नंबर, तुमच्या गाडीचा नंबर, घर, ऑफीस यांचा नंबर हा तुमचा लकी नंबर असेल तर तुम्हाला त्याचा मोठा फायदा होतो. तुमच्या जन्मांक, ऍटिट्यूड नंबर किंवा भाग्यांकानुसार योग्य लकी मोबाईल फोन नंबर घेतल्यास त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो.

लकी मोबाईल फोन नंबर कसा निवडावा?

मोबाईल फोनचा नंबर 10 अंकी असतो. त्यातील शेवटचे सहा अंकच तुमच्याशी संबधीत असतात. त्या आधीचे अंक एरिया कोड, ऑपरेटर कोड वगैरे असतात. त्यामुळे अंकशास्त्रानुसार मोबाईल फोन नंबर घेताना आधी शेवटच्या सहा अंकाचा विचार केला पाहिजे. त्यानंतर पूर्ण दहा अंकांचाही विचार केला पाहिजे. शेवटच्या सहा अंकाची एक अंकी बेरीज तुमच्या जन्मांक, ऍटिट्यूड नंबर किंवा भाग्यांकाएवढी असली आणि पूर्ण दहा अंकांची एक अंकी बेरीजही तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांकाएवढी असली तर तो नंबर तुमच्यासाठी लकी नंबर ठरतो. (अर्थात हा लेख भारतातील मोबाईल फोन नंबर्सला अनुसरून लिहिला आहे. त्यामुळे वरील नियम इतर देशांमध्ये बदलू शकतो).

लकी मोबाईल फोन नंबर उदाहरण

उदाहरणार्थ, तुमची जन्मतारीख 15 जानेवारी 1992 आहे असे समजू. या तारखेनुसार तुमचा जन्मांक 6 (15=1+5=6), ऍटिट्यूड नंबर 7 (15 जानेवारी = 15.01 =1+5+0+1) तर भाग्यांक 1 आहे. (15.01.1992 = 1+5+0+1+1+9+9+2 =28=2+8 =10=1+0=1).

आता तुमच्यासाठी योग्य नंबर शेवटचे असे सहा अंक असतील की ज्यांची एक अंकी बेरीज 6, 7 किंवा 1 येते, आणि पूर्ण दहा अंकांची एक अंकी बेरीजही 6, 7 किंवा 1 येते.

इथे तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे की शेवटचे सहा अंक आणि पूर्ण दहा अंक लोकांसाठी लक्षात ठेवण्याजोगे असावेत.

वरील जन्मांक 6, ऍटिट्यूड 7 किंवा भाग्यांक 1 नुसार योग्य आणि लक्षात ठेवण्यास सोपे नंबर्स (शेवटचे सहा अंक) पुढील प्रमाणे आहेत:

जन्मांक 6 नुसार
345678
252627
313233
343536
123450
012345
912345
123459
246246
ऍटिट्यूड नंबर 7 नुसार
345679
934567
भाग्यांक 1 नुसार

991234

15 जानेवारी 1992 या जन्मतारखेच्या बाबतीत वर दिलेले नंबर्स हे परफेक्ट लकी नंबर्स आहेत. याशिवायही इतर अनेक परफेक्ट लकी नंबर्स आहेत, पण ते सगळे इथे देता येणे शक्य नाही.

असे परफेक्ट लकी नंबर्स मिळणे ही कठीण गोष्ट असते, किंवा अशा नंबर्ससाठी मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे वरीलपैकी एखादा नंबर न मिळाल्यास ज्या नंबरच्या शेवटच्या सहा अंकांची एक अंकी बेरीज 6, 7 किंवा 1 येते आणि पूर्ण दहा अंकांची बेरीजही 6, 7 किंवा 1 येते असा दुसरा एखादा नंबर घ्यावा.

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

कांही महत्वाच्या सूचना:

वर दिलेले उदाहरण हे 15 जानेवारी 1992 या जन्मतारखेच्या बाबतीत आहे. तुम्ही तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा जन्मांक व भाग्यांक शोधावा, आणि त्यानुसार योग्य तो नंबर निवडावा.

लकी मोबाईल फोन नंबर शोधण्याची ही जनरल पद्धत आहे. पण याला कांही अपवादही असतात. उदाहरणार्थ, एखाद्याचा जन्मांक आणि भाग्यांक समान असेल, किंवा एखाद्याच्या चार्टमध्ये एखाद्या नंबरचे रिपीटिशन झालेले असेल, एखाद्याचा जन्मांक किंवा भाग्यांक 8 असेल तर त्याचा लकी नंबर शोधण्यासाठी कांही वेगळे नियम लावावे लागतात. तसेच व्यावसायिक वापरासाठी मोबाईल फोन नंबर निवडताना आणखी कांही वेगळ्या निकषांचा विचार करावा लागतो.

मोबाईल फोन, गाड्या, घर, ऑफीस, प्लॉट, जागा यांच्यासाठी लकी नंबर निवडताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. या विषयी तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तर मला सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत फोन करावा.

हेही वाचा ……

Numerology: नंबर कम्पॅटिबिलिटी

लकी नंबर 8

Numerology: लकी वेहिकल नंबर 1008

Vastudosh: वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 373
Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *