अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26
Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist
Phone Number 8149703595

अंकशास्त्र | जन्मांक म्हणजे काय?

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो, त्यामुळे जन्मांकाचे गुणदोष कमी-जास्त होऊ शकतात. जन्मांक म्हणजे सर्व काही नव्हे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. या लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. एखाद्या व्यक्तीचे सम्यक विश्लेषण करण्यासाठी आणि परफेक्ट लकी नंबर्स, लकी करिअर्स निवडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या पूर्ण न्यूमरॉलॉजी चार्टचा विचार करायला लागतो).

कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 8 असतो. 8 हा अंक सत्ता, धन आणि संपत्ती यांच्याशी संबंधीत आहे.

8 हा अंक कांही लोकांनी अतिशय बदनाम केला आहे. ज्योतिषांनी या अंकाचा संबंध शनि या ग्रहाशी जोडला आहे आणि शनीचे सगळे दुर्गुण या अंकाच्या माथी थोपले आहेत. चालडियन अंकशास्त्राची प्रॅक्टिस करणाऱ्या न्यूमरॉलॉजिस्टांनीदेखील (जे जास्त करून ज्योतिषी असतात) या अंकाचा संबंध शनिशी जोडून हा अंक बदनाम केला आहे.

पण प्रत्यक्षात कोणत्याही अंकाचा कोणत्याही ग्रहाशी संबंध नसतो, आणि कोणत्याही अंकावर कोणत्याही ग्रहाचा प्रभाव नसतो.

तुमचा जन्मांक 8 असेल आणि कोणी तुम्हाला सांगत असेल की 8 हा अंक वाईट आहे, तर अजिबात घाबरू नका. नेहमी लक्षात ठेवा की कोणताही अंक चांगला किंवा वाईट नसतो, आणि प्रत्येक अंकात कांही गुण तर कांही दोष असतात.

तुम्ही तुमच्या क्षमता ओळखा, त्यानुसार स्वतःचा विकास करा. एक दिवस असा येईल की 8 अंकाला वाईट ठरवणारे लोक मागे पडतील आणि तुम्ही पुढे जाल! (वाचा: Numerology: 8 हा अंक अनलकी नाही… )

जन्मांक 8 चे प्रमुख गुण

ज्यांचा जन्मांक 8 आहे अशा व्यक्तींकडे व्यवस्थापन, ऍडमिनिस्ट्रेशन, फंड मॅनेजमेंट या गोष्टींची उपजत क्षमता असते. त्याचबरोबर या व्यक्तींकडे धन कमावण्याची आणि संपत्ती निर्माण करण्याची मोठी क्षमता असते. याशिवाय त्यांच्याकडे आपल्या क्षेत्रात सत्ता मिळवण्याचीही क्षमता असते. त्यांच्याकडे या क्षमता उघड किंवा सुप्त अवस्थेत असतात.

या व्यक्ती सहसा रॉयल राहणीमान असणाऱ्या असतात.

यांच्यामध्ये करुणाभाव असतो, आणि एखाद्या मानवतावादी कामात आपले आयुष्य झोकून द्यायची क्षमताही असते. (विशेषतः जन्मतारीख 26 असेल तर. उदा. मदर तेरेसा, बाबा आमटे, प्रकाश आमटे वगैरे).

ज्या व्यक्तिंच्याबद्दल यांना आपुलकी असते, त्यांना या व्यक्ति बोलून दाखवत नाहीत, तर त्यांच्यासाठी कांहीतरी करून दाखवतात.

या व्यक्ति सावधचित्त असतात, समोरच्या व्यक्तीला जज करण्यात पटाईत असतात आणि समोरील व्यक्ति वाईट भावनेची असेल तर यांना ते लगेच कळते. हे गुण जन्मांक 8 असणा-या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात.

जन्मांक 8 चे प्रमुख दोष

हा जन्मांक असणाऱ्या लोकांना येणाऱ्या समस्या या बहुतेक वेळा त्यांनी स्वत: ओढावून घेतलेल्या असतात. सतत तणावाखाली रहाणे, छोटाश्या कारणाने नाराज होणे, झटपट निर्णय न घेणे, कामे पुढे ढकलणे, एकलकोंडेपणा, अतिरिक्त ठामपणा, इतरांशी फारसा संवाद न साधणे, आपल्या भावना व्यक्त न करता येणे हे 8 हा जन्मांक असणाऱ्यांचे कांही ठळक दोष.

जन्मांक 8 च्या व्यक्तिंच्या बाबतीत नातेसंबंधात समस्या निर्माण होणे (कौटुंबिक विवाद, घटस्फोट इत्यादी) ही गोष्ट लक्षणीय प्रमाणात दिसून येते.

यांचे लहानपण बहुधा खडतर गेलेले असते आणि यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट उशीरा घडत असते.

त्यांना घरून फारसे कांही मिळत नाही आणि ते जे कांही करतात ते स्वत:च्या हिम्मतीवर करतात. आयुष्याच्या उत्तरार्धात या व्यक्ति खूप यशस्वी झाल्याचे दिसते.

8 हा अंक परस्परविरोधी गुणदोष असणारा आहे. म्हणजे हा जन्मांक असणाऱ्या व्यक्तीमध्ये अतिशय यशस्वी होण्याची अथवा अतिशय अयशस्वी होण्याची क्षमता असते. त्याचप्रमाणे ते प्रत्यक्ष जीवनात ते एकतर हिरो नाहीतर झिरो होतात.

जन्मांक 8 साठी लकी नंबर्स

लकी नंबर्स
8 व एक अंकी बेरीज 8 येणारे अंक (पण जन्मांक 8 असणाऱ्या व्यक्तीने 8 हा लकी नंबर असला तरी तो टाळावा, कारण या अंकामुळे त्या व्यक्तीचे दोष वाढू शकतात. त्या ऐवजी त्या व्यक्तीने आपल्या कोअर नंबर्समध्ये 6, 4, 2 या पैकी एखादा नंबर असेल तर तो आपला लकी नंबर म्हणून वापरावा).

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
2, 4, 6, 8

विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
3, 5, 7, 9

जन्मांक 8 साठी लकी करिअर्स

रियल इस्टेट, मॅनेजमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन, फंड मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट, राजकारण

जन्मांक 8 असणाऱ्या कांही प्रसिद्ध व्यक्ति

जन्मांक 8 असणाऱ्या कांही प्रसिद्ध व्यक्ति:  आशा भोसले: अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26
आशा भोसले

जन्मांक 8 असणाऱ्या कांही प्रसिद्ध व्यक्ति: मदर तेरेसा, आशा भोसले, बाबा आमटे, प्रकाश आमटे, मन मोहन सिंग, नरेंद्र मोदी, स्टीफन हॉकिंग, मनेका गांधी, एम. जी. रामचंद्रन

हेही वाचा ….

जन्मतारीख 26 आणि वैवाहिक जीवन

अंकशास्त्र: जन्मांक 9 जन्मतारीख 9, 18, 27

अंकशास्त्र: जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31

अंकशास्त्र: जन्मांक 7 जन्मतारीख 7, 16, 25

साडेसातीपासून मुक्तीचा सोपा उपाय!

Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

Views: 1,317
Please follow and like us:
Pin Share

2 thoughts on “अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email