अंकशास्त्र: जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

अंकशास्त्र जन्मांक 3
Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist & Graphologist
Cell Phone 8149703595

जन्मांक म्हणजे काय याची माहिती पुढील लिंकवर वाचावी: अंकशास्त्र | जन्मांक म्हणजे काय?

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 3 असतो.

न्यूमरॉलॉजीमध्ये या अंकाला ‘एंटरटेनर नंबर’ म्हणून ओळखले जाते. मनोरंजन क्षेत्रात या जन्मांकाचे लोक मोठ्या प्रमाणावर दिसतात.

आनंदी आणि उत्साही स्वभाव हे यांचे एक मोठे वैशिष्ठय.

यांच्याकडे संवादकौशल्य असते. त्याचप्रमाणे हजरजबाबीपणाही असतो. आपले विचार आणि मते स्पष्टपणे व्यक्त करण्याची हातोटी त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा इतरांवर मोठा प्रभाव पडत असतो.

हे लोक ‘मोस्ट फ्रेंडली’ असतात. यांच्या मैत्रीपूर्ण वागण्यामुळे, प्रभावी बोलण्यामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे यांचा मित्रपरिवार आणि लोकसंग्रह वाढत जातो.

या व्यक्ति एकावेळी अनेक योजना राबवण्याच्या भानगडीत पडतात, त्यामुळे त्यांची अवस्था ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी होण्याची शक्यता असते.

त्यांचा खर्चिक स्वभाव आणि आर्थिक निरक्षरता यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

रोमँटिक वागणे हे यांचे आणखी एक वैशिष्ठय. यांचा प्रेमविवाह होण्याची शक्यता असते.

यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि आकर्षण शक्तीमुळे भिन्नलिंगी व्यक्ती यांच्याकडे सहजपणे आकर्षित होतात. यातून यांची लव्ह अफेअर्स होण्याची, विवाहबाह्य संबंध निर्माण होण्याची शक्यता असते. विशेषतः यांच्या इतर कोअर नंबर्समध्ये आणखी एखादा 3 हा अंक असेल, किंवा 2 अथवा 5 हा अंक असेल तर.

यांना नाही म्हणायची सवय नसते. त्यामुळे ते आश्वासने देऊन बसतात, पण प्रत्यक्षात ती पुरी करत नाहीत/ करू शकत नाहीत.

यातील कित्येकांना कामापेक्षा गप्पा-गोष्टींचे वेड असते, त्यामुळे त्यांच्या आयुष्यातला बराच वेळ वाया जायची शक्यता असते.

जन्मांक 3 साठी लकी नंबर्स

लकी नंबर्स
3 हा अंक व ज्यातील अंकांची बेरीज 3 येते असे नंबर्स (उदा. 345= 3+4+5= 12=1+2=3, म्हणून 345 हा त्यांच्यासाठी एक लकी नंबर आहे)

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
3, 6, 9
विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
4, 7, 8

जन्मांक 3 साठी लकी करिअर्स

मनोरंजन क्षेत्राशी संबंधित करिअर्स जन्मांक 3 असलेल्या व्यक्तींसाठी लकी असतात. उदा. अभिनय, गायन, संगीत दिग्दर्शन, नृत्य, वादन वगैरे.

जन्मांक 3 असणाऱ्या कांही प्रसिद्ध व्यक्ति

स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन, जोसेफ स्टालिन, सर विन्स्टन चर्चिल, डार्विन, हेनरी फोर्ड, होमी भाभा, विक्रम साराभाई, रजनीकांत, शरद पवार, टॉम क्रूज

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो, त्यामुळे जन्मांकाचे गुणदोष कमी-जास्त होऊ शकतात. या लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. परफेक्ट लकी नंबर्स, लकी करिअर्स निवडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या पूर्ण न्यूमरॉलॉजी चार्टचा विचार करायला लागतो).

हेही वाचा …..

अंकशास्त्र: कोणता जन्मांक चांगला?

अंकशास्त्र: जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29

अंकशास्त्र: जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31

Numerology: जॉब करावा की व्यवसाय?

साडेसातीपासून मुक्तीचा सोपा उपाय!

Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Views: 401
Please follow and like us:
Pin Share