महावीर सांगलीकर
Numerologist, Graphologist
Phone Number 8149128895
अंकशास्त्रात प्रत्येक व्यक्तीचे एकूण 6 कोअर नंबर्स असतात. त्यातील 3 कोअर नंबर्स हे जन्मतारखेवरून काढलेले असतात, तर इतर 3 कोअर नंबर्स हे त्या व्यक्तीच्या पूर्ण नावावरून काढलेले असतात. (कोअर नंबर्सविषयी अधिक माहिती Numerology: कोअर नंबर्स इथे वाचा).
जन्मतारखेतून निघणारे 3 कोअर नंबर्स म्हणजे जन्मांक, ऍटिट्यूड नंबर आणि भाग्यांक. यातील जन्मांक म्हणजे एखादी व्यक्ति महिन्याच्या ज्या तारखेस जन्मली तिच्यापासून मिळणारा अंक.
जन्मांक कसा काढावा?
व्यक्तिची जी जन्मतारीख असते ती जर एक अंकी असेल, म्हणजे 1 ते 9 दरम्यानची असेल तर ती तारीख हाच त्या व्यक्तीचा जन्मांक असतो. जर ती तारीख दोन अंकी असेल, म्हणजे 10 ते 31 या तारखांमधील असेल तर त्या तारखेतील अंकांची बेरीज करून तिला एक अंकी बनवले जाते व तो अंक म्हणजे त्या व्यक्तीचा जन्मांक असतो.
उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख 1 असेल तर तुमचा जन्माक 1 असतो, तसेच जर तुमची जन्मतारीख 10 असेल तर या तारखेतील अंकांची बेरीज 1+0=1 येते, म्हणून तेंव्हाही तुमचा जन्मांक 1 असतो. हाच प्रकार तुमचा जन्म 19 किंवा 28 तारखेस झाला असेल तर होतो. (19=1+9=10=1+0=1, तसेच 28=2+8=10=1+0=1).
जन्मांक 1 ते 9 या दरम्यानचे असले तरी एखाद्या व्यक्तीचे रिडींग आणि विश्लेषण करताना दोन अंकी तारखेचाही विचार केला जातो. उदा. 4, 13, 22, 31 या तारखांना जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 4 असला आणि त्यांच्यात जन्मांक 4 चे समान गुणदोष असले तरी यातील 13, 22, 31 या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचे कांही वेगळे गुणदोष असतात.
जन्मांकाविषयी आणखी काही….
जन्मांक हा केवळ तारखेवर अवलंबून असतो, ती व्यक्ति कोणत्या महिन्यात अथवा कोणत्या वर्षी जन्मली याचा जन्मांकाशी संबंध येत नाही.
जन्मांकाला इंग्रजीमध्ये Birth Number या नावाने ओळखले जाते, तर हिंदीमध्ये जन्मांकाला मूलांक हा शब्द वापरला जातो.
जन्मांकामुळे त्या व्यक्तीचा स्वभाव, वागणे, विचार करण्याची पद्दत, गुणदोष वगैरे अनेक गोष्टी कळतात. तसेच त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात कोणत्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात हे कळू शकते.
बहुतांश न्यूमरॉलॉजिस्ट केवळ जन्मांकाचा विचार करतात, पण जन्मांक म्हणजे सर्व कांही नव्हे. जन्मांकापेक्षा ऍटिट्यूड नंबर आणि भाग्यांक हे जास्त महत्वाचे असतात.
जन्मतारीख आणि जन्मांक
जन्मतारीख | जन्मांक |
1, 10, 19, 28 | 1 |
2, 11, 20, 29 | 2 |
3, 12, 21, 30 | 3 |
4, 13, 22, 31 | 4 |
5, 14, 23 | 5 |
6, 15, 24 | 6 |
7, 16, 25 | 7 |
8, 17, 26 | 8 |
9, 18, 27 | 9 |
हेही वाचा …
अंकशास्त्र: कोणता जन्मांक चांगला?
Numerology: नंबर कम्पॅटिबिलिटी
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi
TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)
One thought on “अंकशास्त्र | जन्मांक म्हणजे काय?”