महावीर सांगलीकर
Senior Numerologist & Graphologist
Mobile Phone Number: 8149128895
जन्मतारीख 26 आणि वैवाहिक जीवन
माझ्या आजपर्यंतच्या अनुभवावरून अनुभवावरून कांही ठराविक तारखांना जन्मलेल्या व्यक्तींना वैवाहिक समस्या असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते असे दिसून येते. अशा तारखांमध्ये 26 ही तारीख विशेष विचार करण्यासारखी आहे.
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 26 तारखेस झाला असेल त्यांच्याकडे प्रचंड धन आणि संपत्ती मिळण्याची, आणि आपल्या कामाच्या क्षेत्रात अधिकार आणि सत्ता मिळवण्याची प्रचंड क्षमता असते. या लोकांच्याकडे व्यवस्थापन कौशल्य असते, आणि हे लोक शिस्तप्रिय असतात. पण दुसरीकडे या लोकांना नातेसंबधात मोठ्यासमस्या निर्माण होण्याची खूप शक्यता असते.
जन्मतारीख 26 आणि वैवाहिक जीवन
ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 26 असेल, किंवा ज्यांचा भाग्यांक 26/8 असेल, (म्हणजे ज्यांच्या पूर्ण जन्मतारखेतील अंकांची बेरीज 26 येत असेल), त्यांच्या बाबतीत पुढीलपैकी एखादी गोष्ट घडलेली दिसते:
- त्यांच्यापैकी अनेकांचे लग्न वेळेवर होत नाही, उशीर लागतो.
- त्यांच्यापैकी कांही व्यक्ति लग्न करत नाहीत. लग्न न करण्याचे कारण करण्याची इच्छा नसणे हेच जास्त प्रमाणात दिसून येते. अशा व्यक्तींनी स्वत:ला समाजसेवेला अथवा धार्मिक कामाला वाहून घेतलेले दिसते.
- त्यांच्यापैकी अनेक व्यक्ति लग्न करतात, पण त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी पटत नाही.
- त्यातील कांही जोडप्यांचे घटस्फोट होतात. कांहीजण घटस्फोट न घेता वेगळे रहात असतात.
- ज्यांच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 26 बरोबरच 7, 9 किंवा 11 यापैकी एखादा अंक आलेला असतो, त्या व्यक्ती आध्यात्मिक प्रवृत्तीच्या असतात, त्यांना संसारात फारसा रस नसतो.
26 या अंकाशी संबधीत व्यक्तीच्या जीवनात वर दिलेल्या सगळ्याच गोष्टी घडतील असे नाही, पण त्यापैकी एखादी अथवा एकापेक्षा जास्त गोष्टी घडण्याची दाट शक्यता असते.
असे असले तरी 26 तारखेला जन्मलेल्या किंवा भाग्यांक/नामांक 26 असलेल्या कांही अपवादात्मक व्यक्तींचे सुखी संसार पहायला मिळतात. अशा व्यक्तींच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये समान अथवा सुसंगत जन्मांक, ऍटिट्यूड नंबर व भाग्यांक असतात.
तुमची जन्मतारीख 26 असेल किंवा तुमच्या पूर्ण जन्मतारखेची बेरीज 26 असेल तर तुम्ही काळजी करायचं कारण नाही. तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही अंकशास्त्रानुसार सुसंगत असा जोडीदार निवडला तर तुम्हाला समस्या येणार नाहीत. तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या ऍटिट्यूडमध्ये आणि वागण्यात थोडा बदल केला तर तुमच्या वैवाहिक जीवनातल्या समस्या दूर होतील. याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्याशी या लेखाच्या सुरवातीला दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.
हेही वाचा …..
Fake Numerologists | अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!
Vastudosh: वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi
TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)
2 thoughts on “जन्मतारीख 26 आणि वैवाहिक जीवन”