महावीर सांगलीकर
Numerologist, Graphologist
Phone Number 8149128895
कोणता जन्मांक चांगला?
कांही लोक विचारतात की अंकशास्त्रानुसार कोणता जन्मांक चांगला असतो? कोणता जन्मांक वाईट असतो? याचं उत्तर म्हणजे कोणताही जन्मांक पूर्णपणे चांगला, किंवा पूर्णपणे वाईट नसतो. प्रत्येक जन्मांकाचे कांही चांगले गुण असतात, तर कांही वाईट गुण असतात. प्रत्येक जन्मांकाचे काही विशिष्ट गुण, क्षमता व काही विशिष्ट अवगुण असतात. प्रत्येक जन्मांक हा युनिक (त्याच्यासारखा तोच) असतो. त्यामुळे एखाद्या जन्मांकाला चांगला जन्मांक किंवा वाईट जन्मांक म्हणता येत नाही.
उदाहरण म्हणून आपण 1 हा जन्मांक घेऊ. या जन्मांकाच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास, पुढाकार घेणे, नेतृत्व, टीम लीडरशिप, ठामपणा, व्यवस्थापन हे गुण असतात. दुसरीकडे त्यांच्यामध्ये तर हुकुमशाही वृत्ती, हेकेखोरपणा, बॉसिंग, सूडबुद्धी हे दुर्गुण असू शकतात. आता 1 हा अंक ज्या व्यक्तीचा जन्मांक आहे ती व्यक्ती उत्तम नेता, व्यवस्थापक, बॉस वगैरे बनू शकते, किंवा मग एक हुकुमशहा देखील होऊ शकते. 1 या जन्मांकाच्या बाबतीत असं म्हंटलं गेलंय की Number 1 person is either a perfect hero or a perfect villain!
दुसरं उदाहरण म्हणजे जन्मांक 8. हा जन्मांक असणाऱ्या व्यक्तींना प्रचंड धन आणि संपत्ती मिळू शकते, सत्ता मिळू शकते, पण त्याच बरोबर यांना नातेसंबधातल्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच हे लोक Either Hero or Zero या प्रकारात मोडतात. म्हणजे एकतर ते प्रचंड यशस्वी बनतील, नाहीतर त्यांना मोठ्या अपयशाचा सामना करावा लागेल.
कोणता जन्मांक चांगला?
जन्मांक म्हणजे सर्व काही नव्हे!
सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ जन्मांकावर विसंबून तुम्ही एखाद्या व्यक्तीचे नीट विश्लेषण करू शकत नाही. जन्मांकाबरोबरच ऍटिट्यूड नंबर आणि भाग्यांक यांचाही विचार करायचा असतो. त्याचप्रमाणे तुमचा नामांक काय आहे, तुमचा हार्ट’स डिझायर नंबर काय आहे, पर्सनॅलिटी नंबर काय आहे, तुमच्या पूर्ण चार्टमध्ये कोणत्या अंकाचं रिपिटीशन झालंय, कोणता अंक गायब आहे या सगळ्यांचा विचार करणं महत्वाचं असतं. म्हणजे तुमच्याकडे केवळ जन्मांक हाच अंक असत नाही, तर 6 अतिमहत्त्वाचे अंक असतात. (या संदर्भातील अधिक माहितीसाठी अंकशास्त्र: कोअर नंबर्स हा लेख वाचावा).
केवळ एखाद्या जन्मांकाच्या गुण किंवा दुर्गुणावरून संबधीत व्यक्ती कशी असेल किंवा कशी होईल हे ठरवता येत नाही. केवळ जन्मांकावर आधारीत रीडिंग केलं तर ते चुकीचं ठरण्याची ठरतं.
तुमच्या जन्मांकाच्या पॉझिटिव्ह बाजूवर फोकस करा!
यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की अमुक जन्मांक चांगला किंवा वाईट असतो असं म्हणता येणार नाही. त्यामुळं तुम्हाला जर तुमचा जन्मांक वाईट आहे असं कोणी सांगितलं असेल तर ते चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या जन्मांकाला वाईट मानलं, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.
तुमचा जन्मांक कोणताही असो, तुम्ही नेहमी तुमच्या जन्मांकाच्या पॉझिटिव्ह बाजूवर फोकस केले पाहिजे, तुमच्या जन्मांकानुसार तुमच्यात असलेल्या क्षमतांचा विकास केला पाहिजे आणि तुमच्या अवगुणांना आळा घातला पाहिजे.
चाल्डियन न्यूमरॉलॉजीमध्ये अंकांच्या निगेटिव्ह बाजूवर जास्त भर दिला जातो. त्यामुळे चाल्डियन न्यूमरॉलॉजीची प्रॅक्टिस करणारे एखादा जन्मांक वाईट आहे असं सहजपणे सांगतात. यामागे क्लाएंटला भीती घालून त्याच्याकडून पैसे काढणे हेच मुख्य कारण असते. याशिवाय अंकशास्त्राविषयी अज्ञान आणि विकृत मानसिकता ही देखील कारणे असतात.
एखाद्या ज्योतिषानं किंवा न्यूमरॉलॉजिस्टनं तुम्हाला जर असं सांगितलं की तुमचा जन्मांक वाईट आहे, तर त्याचे तुमच्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळं अंकांच्या निगेटिव्ह बाजूवर अवास्तव भर देणाऱ्या न्यूमरॉलॉजिस्टस आणि ज्योतिषांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. (Fake Numerologists | अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!)
महत्वाचं म्हणजे तुम्ही अंकशास्त्राचा अभ्यास करत असाल तर तुम्ही चाल्डियन न्यूमरॉलॉजीपासून दूरच राहिलं पाहिजे. त्यापेक्षा अंकांच्या पॉझिटिव्ह बाजूला महत्व देणाऱ्या आणि सायंटिफिक अशा पायथॅगोरियन न्यूमरॉलॉजीचा(च) अभ्यास केला पाहिजे.
कोणता जन्मांक चांगला?
हेही वाचा:
Name Correction – नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!
बाळाचे नाव…. नावरस नाव म्हणजे काय?
Numerology: लकी वेहिकल नंबर 1008
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi
TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)
4 thoughts on “अंकशास्त्र: कोणता जन्मांक चांगला?”