महावीर सांगलीकर
Numerologist, Graphologist
Phone Number 8149128895
ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र
भारतातील आणि भारताबाहेरील जनमानसावर ज्योतिषशास्त्राचा मोठा प्रभाव आहे. जगभरातील करोडो लोक जोतिषशास्त्राचा वेळोवेळी आधार घेत असतात. हे अगदी मुलाच्या जन्मापासून चाललेलं असत. ज्योतिष्याकडून मुलाची कुंडली काढून घेणे, विविध रितीरिवाजांच्या कार्यक्रमाचे, धार्मिक कार्यक्रमाचे मुहूर्त काढणे, लग्न जुळवण्यासाठी मुला-मुलींच्या कुंडल्या पहाणे, आयुष्यात येणाऱ्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी ज्योतिष्याकडून सल्ला घेणे, आपले भविष्य जाणून घेणे, अशा अनेक गोष्टी समाजात मोठ्या प्रमाणात चालू आहेत.
ज्योतिषशास्त्राची प्रॅक्टिस करणारे लोक या शास्त्राला ‘सायन्स’ किंवा ‘विज्ञान’ म्हणतात. पण ज्योतिषशास्त्र विज्ञानाच्या कसोटीवर टिकते का? आणि मुख्य म्हणजे ज्योतिषशास्त्राचा आपलं भविष्य घडवण्यासाठी खरंच कांही उपयोग होतो का? ज्योतिषशास्त्राच्या सहाय्याने समस्या सुटतात का? या लेखामध्ये मी या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात उहापोह केला आहे.
ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र यात काय फरक आहे?
खगोलशास्त्र (Astronomy) आणि ज्योतिषशास्त्र (Astrology) या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण खगोलशास्त्र आणि जोतिषशास्त्राची बहुतांश ज्योतिषी आणि सर्वसामान्य लोक खूप गल्लत करत असतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्राला विज्ञान मानणारे लोक खगोलशास्त्रीय घटनांचा आधार घेत ज्योतिषशास्त्र हे कसे अचूक आहे हे सांगत असतात. उदा. कोणत्याही दिवशी चंद्र किंवा सूर्य किती वाजून किती मिनिट आणि सेकंदांनी उगवणार आहे, सूर्यास्त किंवा चंद्रास्त कधी होणार आहे, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण नेमके किती वाजता लागणार आहे, ते कुठल्या भागात कधी दिसणार आहे, कोणता ग्रह कोणत्या नक्षत्रात कधी प्रवेश करणार आहे वगैरे. पण या गोष्टी खगोलशास्त्रात मोडतात, या सगळ्या गोष्टी मानवाने गेली हजारो वर्षे केलेल्या निरीक्षणातून, प्रगत गणितामधून माहीत झालेल्या आहेत.
ज्योतिषशास्त्रात खगोलशास्त्राचा आधार घेऊन व्यक्तीची जन्मवेळ आणि जन्मठिकाण, त्यावेळची ग्रहस्थिती यानुसार कुंडली मांडली जाते, आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या काळात काय बरेवाईट घडेल याचे भाकीत केले जाते. मग त्यानुसार त्या व्यक्तीला उपाय सुचवले जातात. अशा भाकितांना खगोल शास्त्रात कसलेही स्थान नाही.
गेल्या कांही शतकात खगोलशास्त्राने मोठी भरारी घेतली आहे. वेगवेगळ्या खगोलशास्त्रज्ञांनी पूर्वीच्या खगोलशास्त्रीय संकल्पना धुडकावून लावत नव्या संकल्पना मांडल्या आणि सिद्धही केल्या. उदा. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते, वेगवेगळे ग्रहदेखील पृथ्वीभोवती फिरत नसून ते सूर्याभोवती फिरत असतात, आपल्या डोळ्यांना न दिसणारे कांही ग्रह आहेत, पृथ्वी हा एक ग्रह आहे, चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे, आपल्या सूर्यमालेतील अनेक ग्रहांभोवतीही त्यांचे-त्यांचे उपग्रह फिरत असतात, आपल्या सूर्यमालेतील ग्रह म्हणजे पृथ्वीसारख्याच जड (भौतिक) वस्तू आहेत, त्यांना स्वतःचे गुरुत्वाकर्षण आहे, वगैरे.
पण आजही ज्योतिषी मात्र मात्र चंद्र, सूर्य आणि आपल्या सूर्यमालेतील ग्रहांविषयी त्यांच्या कालबाह्य संकल्पनांना चिकटून आहेत. प्राचीन ज्योतिषीय ग्रंथांमध्ये जे कांही लिहिले आहे ते सर्वकांही पूर्णसत्य आहे असं ते मानतात. त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे भारतीय ज्योतिषशास्त्रात ग्रहांना देवता किंवा ज्योति असे मानले गेले आहे, ज्योतिषशास्त्रातील ग्रह म्हणजे अवाढव्य आकाराच्या भौतिक वस्तू नव्हेत!
वैदिक ज्योतिषशास्त्रातील ग्रह!
विशेष म्हणजे ग्रीकांच्या ज्योतिषशास्त्रातदेखील ग्रहांना देवता मानले गेले आहे! त्यापैकी एक देवता म्हणजे गुरु ग्रह!
संबंधित इतर लेख
ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का? छत्रपती शाहू महाराज आणि ज्योतिषी
वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?
नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!
अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi
TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)
2 thoughts on “ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र”