ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का? छत्रपती शाहू महाराज आणि ज्योतिषी

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist
Phone Number 8149128895

ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का?
ज्योतिषशास्त्र म्हणजे काय?
ग्रहांचा मानवी जीवनावर कांही परिणाम होतो का?
ज्योतिषशास्त्रीय भाकिते खरी ठरतात का?
छत्रपती शाहू महाराज आणि ज्योतिषी

ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का?

ज्योतिषशास्त्रानुसार केलेली भाकिते खरी ठरतात का? आणि ग्रहांचा मानवी जीवनावर कांही परिणाम होतो का? याविषयी जगभरात अगदी विद्यापीठीय स्तरावर संशोधन झाले आहे. या संशोधनात अनेक संशोधकांनी, प्रख्यात खगोलशास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. अगदी पुणे विद्यापीठाच्या आयुकामध्येही यावर संशोधन झाले. हे संशोधन प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या देखरेखीखाली झाले.

या सगळ्या संशोधनासाठी लाखो व्यक्तींच्या कुंडल्या तपासल्या गेल्या. या सगळ्या संशोधांनातून निघालेला निष्कर्ष एकच, तो म्हणजे ग्रहांचा मानवी जीवनावर कसलाही बरावाईट परिणाम होत नसतो, आणि ज्योतिषीय भाकिते खरी ठरत नसतात.

ज्योतिषशास्त्रीय भाकिते खरी ठरतात का?

ज्योतिषशास्त्रीय भाकिते खरी ठरतात की नाही हे तुम्ही स्वतः तपासून पाहू शकता. लहानपणी तुमची कुंडली बनवली गेली असेल, आणि तिच्यात तुमची विशिष्ट अशी (मोघम नव्हे) भाकिते दिली गेली असतील तर ती तपासून पहा. ती खरी ठरली काय?

ज्योतिषशास्त्रीय भाकिते खरी ठरतात की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही दुसरे एक निरीक्षण सहज करू शकता. ते म्हणजे मीडियात (टी.व्ही, पेपर वगैरे) प्रसिद्ध होणाऱ्या एखाद्या खेळाच्या अथवा निवडणुकीच्या निकालाची भाकिते आपल्या डायरीत लिहून ठेवा, आणि पुढे काय निकाल लागतो ते पहा! तुम्हाला असे दिसेल की त्या भाकितांचाच निकाल लागला!

ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का?

ज्योतिषशास्त्रीय भाकितांचे दुष्परिणाम

ज्योतिषशास्त्रीय भाकितांपासून दूर रहाणेच तुमच्या हिताचे आहे, कारण अशा भाकितांवर अवलंबून राहण्याने अथवा विश्वास ठेवण्याने तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. ज्योतिषशास्त्रीय भाकिते तुम्हाला अंधश्रद्ध आणि कर्तृत्वहीन बनवतात, त्यांच्यामुळे तुमच्यामध्ये कामे पुढं ढकलण्याची प्रवृत्ती येते, (Procrastination), तुम्हाला मिळणाऱ्या अनेक महत्वाच्या संध्या तुम्ही गमावता, तुम्ही तुमचा आत्मविश्वास हरवता, तुमचं मन कमकुवत बनतं, आणि तुम्ही एक दैववादी व्यक्ती बनता.

मी अशा कित्येक व्यक्ती पाहिल्या आहेत, जे साडेसातीचा काळ आहे म्हणून या काळात कसलेच नवीन काम सुरु करत नाहीत, आणि अक्षरशः डिप्रेशनमध्ये जगतात. पुढे साडेसात वर्षानंतरही ते कसलेच नवीन काम सुरु करत नाहीत, कारण काही ना करण्याची सवय त्यांना जडलेली असते. अशा तऱ्हेने त्यांचे पुढचे सगळेच आयुष्य काही न करण्यात जाते!

तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अनेक ज्योतिषांच्या जीवनात मोठ्या समस्या असतात, त्या येतील हे त्यांनाही आधी कळलेले नसते, आणि ते स्वत:च्याच समस्या ज्योतिषशास्त्रीय उपायांनी सोडवू शकत नाहीत. यातूनच तुम्ही काय तो बोध घ्यावा!

छत्रपती शाहू महाराज आणि ज्योतिषी

कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा ज्योतिषी आणि ज्योतिष शास्त्रावर अजिबात विश्वास नव्हता. या संदर्भातील एका घटनेचा इथे उल्लेख करणे आवश्यक वाटते:

शाहू महाराजांनी ज्योतिषाबाबत काय भूमिका घेतली, याबाबतची आठवण भाई माधवराव बागल यांनी त्यांच्या ग्रंथात नोंदवलेली आहे. राजर्षी शाहू महाराजांना भेटण्यासाठी एकदा एक ज्योतिषी आला. त्याला महाराजांनी दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तो ज्योतिषी बाहेर गेल्यावर शाहू महाराजांनी म्हैसकर नावाच्या फौजदाराला बोलावून त्या ज्योतिषाला दुसऱ्या दिवशी भेटायला येण्यापूर्वी अटक करून त्याला कैदेत ठेवण्यास सांगितले. शाहू महाराजांच्या सल्ल्याप्रमाणे फौजदाराने ज्योतिषाला अटकेत ठेवले.

दुसऱ्या दिवशी ज्योतिषाला घेऊन फौजदार सोनतळी कॅम्पवर शाहू महाराजांकडे गेले. तेव्हा ज्योतिषी रडत रडत महाराजांना म्हणाला, “काही एक गुन्हा केला नसताना मला निष्कारण अटक केली आहे. आपण न्याय दिला पाहिजे.” तेव्हा शाहू महाराज त्या ज्योतिषाला म्हणाले, ‘तुम्ही तर मला भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशीच येतो म्हणाला होता. तुम्हाला अटक होणार आहे, हे माहिती असते, तर तशी कबुली कशी दिली ? तुम्हाला हे अटकेचे भविष्य समजायला हवे होते.’ हे सगळे ऐकून ज्योतिषी हिरमुसला. (श्रीमंत कोकाटे यांच्या ‘राजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन’ या लेखातून साभार).

ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का?

संबंधित इतर लेख

ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र

13 हा नंबर अनलकी आहे का?

वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 154
Please follow and like us:
Pin Share

2 thoughts on “ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का? छत्रपती शाहू महाराज आणि ज्योतिषी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *