अंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे!

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist & Graphologist
Phone: 8149128895


अनेक लोक, इतकेच नव्हे तर मराठीतून न्यूमरॉलॉजी शिकवणाऱ्या कांही संस्था देखील न्यूमरॉलॉजी या शब्दाचं मराठी भाषांतर संख्याशास्त्र असं चुकीचं करतात. खरं म्हणजे न्यूमरॉलॉजी या शब्दाचं मराठी भाषांतर अंकशास्त्र असंच होतं. मराठीत शिक्षण क्षेत्र, मिडिया वगैरे सगळीकड संख्याशास्त्र हा शब्द स्टॅटिस्टिक या इंग्रजी शब्दासाठी वापरला जातो. त्यामुळं संख्याशास्त्र हा शब्द स्टॅटिस्टिक या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द आहे, न्यूमरॉलॉजी या शब्दाचा नव्हे.

अंकशास्त्र आणि संख्याशास्त्र यातील फरक

अंकशास्त्र (Numerology) आणि संख्याशास्त्र (Statistics) यात नेमका काय फरक आहे ते पाहुया.

संख्याशास्त्र ही गणिताची एक शाखा असून या शास्त्राचा उपयोग मोठी आकडेवारी गोळा करून तिचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. हा अभ्यास अर्थशास्त्र, जनगणना, प्राणिगणना, वैज्ञानिक संशोधन, स्टॉक मार्केट इत्यादी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात केला जातो.

संख्याशास्त्र ही गणिताची एक शाखा असून या शास्त्राचा उपयोग मोठी आकडेवारी गोळा करून तिचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. हा अभ्यास अर्थशास्त्र, जनगणना, प्राणिगणना, वैज्ञानिक संशोधन, स्टॉक मार्केट इत्यादी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात केला जातो

याउलट अंकशास्त्र हे एखाद्या व्यक्तिची जन्मतारीख आणि नाव यावरून त्या व्यक्तिचे व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आणि त्यानुसार त्या व्यक्तीला मार्गदर्शन करण्यासाठी केला जातो. यासाठी त्या व्यक्तीच्या जन्मतारखेचा अभ्यास केला जातो. जन्मतारीख ही संख्या नसून अंक आहेत ही गोष्टही आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून तर जन्मांक, भाग्यांक हे शब्द वापरले जातात. जन्मसंख्या, भाग्यसंख्या असे शब्द अंकशास्त्राला संख्याशास्त्र म्हणणारेही वापरत नसतात.

यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की अंकशास्त्र आणि संख्याशास्त्र हे दोन्ही विषय पूर्णपणे वेगवेगळे आहेत.

विषय समजण्यासाठी प्रतिशब्द टाळा….

इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द वापरताना कित्येक ठिकाणी चुकीचे शब्दच वापरले जातात. त्यामुळे त्यांचा नेमका अर्थ स्पष्ट होत नाही. कित्येकदा असे शब्द अतिशय बोजड आणि कृत्रिम असतात. शिवाय हे शब्द अस्सल मराठीही नसतात, ते तर संस्कृत शब्द असतात.

असे बोजड आणि कृत्रिम शब्द वापरण्यापेक्षा मूळ इंग्रजी शब्द वापरणे विषय स्पष्ट होण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. टेबलाला आपण टेबलच म्हणतो, क्रिकेटला क्रिकेटचं म्हणतो, पेनाला पेनच म्हणतो. असे हजारो इंग्रजी शब्द मराठीत आहेत. त्यामुळे तथाकथित प्रतिशब्द वापरण्यापासून आपण दूर राहिले पाहिजे.

अंकशास्त्रावरील इतर काही लेख ….

अंकशास्त्र | जन्मांक म्हणजे काय?

जॉब करावा की व्यवसाय?

लकी मोबाईल फोन नंबर

8 हा अंक अनलकी नाही…

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 42
Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *