अंकशास्त्र: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

अंकशास्त्र: जन्मांक 5, जन्मतारीख 5, 14, 23
Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist
Phone Number 8149703595

अंकशास्त्र | जन्मांक म्हणजे काय?

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो, त्यामुळे जन्मांकाचे गुणदोष कमी-जास्त होऊ शकतात. जन्मांक म्हणजे सर्व काही नव्हे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. या लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. एखाद्या व्यक्तीचे सम्यक विश्लेषण करण्यासाठी आणि परफेक्ट लकी नंबर्स, लकी करिअर्स निवडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या पूर्ण न्यूमरॉलॉजी चार्टचा विचार करायला लागतो).

कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो.

जन्मांक 5 चे गुण

या लोकांची वैशिष्ठ्ये म्हणजे हे लोक जिनिअस, मल्टिटॅलेंटेड, खोलवर विचार करणारे, उत्तम वक्ते, झटपट विचार करणारे आणि झटपट निर्णय घेणारे, इतरांना प्रेरणा देणारे आणि मदत करणारे असतात. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य असते. या व्यक्ति सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात.

हे लोक कला आणि सौन्दर्याची आवड असणारे, रोमांटिक आणि प्रेमळ असतात पण प्रसंगी हे लोक कठोर बनू शकतात.

त्यांच्यापैकी बहुतेकांच्याकडे उत्तम लेखन कौशल्यही असते. वक्तृत्व आणि लेखन या दोन्ही गोष्टी असल्यामुळे त्याचा त्यांना मोठा फायदा होतो.

हा जन्मांक असणा-या व्यक्ति सहजपणे नवे मित्र मिळवतात. समाजाच्या सर्व थरात त्यांना भरपूर मित्र असतात. इतरांशी संवाद साधणे आणि आपला लोकसंग्रह वाढवणे त्यांना चांगले जमते.

स्वतंत्र जीवन, स्वातंत्र्य हा त्यांचा स्थायीभाव असतो. त्यामुळे कुणाच्या हाताखाली काम करणे त्यांना शक्य नसते. त्यामुळे या व्यक्तींनी नोकरीपेक्षा व्यवसाय करणे सोयीस्कर ठरते. यांचा भरपूर प्रवास होतो. संशोधन, मिडिया, साहित्य, संगीत, अभिनय, व्यापार उद्योग यात हे लोक जास्त दिसतात.

या व्यक्ति पारंपारिक मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने, जोखीम घेवून आपल्या बुद्धीच्या जोरावर भरपूर पैसे कमावतात.

हे समाजात मिसळणारे लोक असतात. सामाजिक क्षेत्रात या व्यक्ती लोकप्रिय होतात. त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे त्यांना सगळीकडे आदर मिळतो.

हे लोक एखाद्या ध्येयाने पछाडलेले असतात. त्याचप्रमाणे यांच्यातील कांही लोक समाजसुधारणा, सामाजिक चळवळी या क्षेत्रात काम करताना दिसतात. कांही लोक द्वेषाचे राजकारण करतात.

यांचा बहुधा प्रेम विवाह होत असतो.

मल्टिटॅलेन्टेड असल्याने, विविध विषयांमध्ये रस असल्याने हे लोक एकावेळी अनेक प्रकारच्या गोष्टी करत असल्याचे दिसते. ‘चेंज’ हा त्यांचा स्थायीभाव असल्याने एखाद्या गोष्टीवर जास्त काळ टिकून राहणे त्यांना जमत नाही.

कोणत्याही एका ठिकाणी, एका व्यवसायात स्थिर रहाण्याचा त्यांचा स्वभाव नसतो. निरनिराळ्या गोष्टी अजमावून पहाणे हा त्यांचा स्वभावधर्म असतो.

जन्मांक 5 चे दोष

जन्मांक 5 असणाऱ्या व्यक्तिंकडे वरील गुण असले तरी त्यांच्याकडे अनेक दोषही असतात.
त्यांच्या स्वभाव मूडी असतो व ते बऱ्याचदा बेचैन किंवा उत्तेजित होतात. यांच्या मनासारखे न झाल्यास, अपयश आले तर निराश होऊन व्यसनाधीन होऊ शकतात. अशा परिस्थितीत या व्यक्ती अविचारी बनून चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते. त्यांना मोठे डिप्रेशन येऊ शकते व त्यातून ते व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात. विशेषकरून ज्यांचा जन्म 14 तारखेस झालेला असतो ते लोक व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता असते. जन्मांक 14/5 असणारे माझे कित्येक परिचित असे आहेत की जे चेन स्मोकर आहेत, किंवा ते दारू जास्त प्रमाणात पितात.

यांची अनेक अफेअर्स होऊ शकतात, तसेच यांच्या रिलेशनशिप्स तुटू शकतात.

रुटीन कामांचा यांना कंटाळा येऊ शकतो, त्यामुळे कामे अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती यांच्यात येऊ शकते.

यांच्यात बंडखोरपणा आणि विद्रोही वृत्ती येऊ शकते.

यांना झटपट पैसे कमावण्याचा मोह होऊ शकतो.

जन्मांक 5 साठी लकी नंबर्स

लकी नंबर्स:
5 हा अंक व आणि ज्या नंबरमधील अंकांची बेरीज 5 येते असे नंबर्स. (उदा. 2345= 2+3+4+5= 14 = 1+4=5, म्हणून 2345 हा त्यांच्यासाठी एक लकी नंबर आहे).

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
1, 5, 7

विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
2, 4, 6, 8

जन्मांक 5 साठी लकी करिअर्स

बौद्धिक कामांशी संबंधित करिअर्स (विज्ञान, संशोधन, शिक्षण क्षेत्र, मीडिया इत्यादी), मनोरंजन क्षेत्र (अभिनय, गायन, संगीत दिग्दर्शन, लेखन इत्यादी)

जन्मांक 5 असणाऱ्या कांही प्रसिद्ध व्यक्ति

अंकशास्त्र अल्बर्ट आईन्स्टाईन जन्मांक 5

जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, विल्यम शेक्सपिअर, अल्बर्ट आईन्स्टाईन, बाळासाहेब ठाकरे.

हेही वाचा …..

अंकशास्त्र: जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13,22,31

अंकशास्त्र: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24

अंकशास्त्र: कोणता जन्मांक चांगला?

Numerology: जॉब करावा की व्यवसाय?

ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का? छत्रपती शाहू महाराज आणि ज्योतिषी

Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Views: 257
Please follow and like us:
Pin Share

2 thoughts on “अंकशास्त्र: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *