अंकशास्त्र: जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29

जन्मांक 2, जन्मतारीख 2, 11, 20, 29
Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist, Graphologist
Cell Phone Number 8149703595

जन्मांक म्हणजे काय याची माहिती पुढील लिंकवर वाचावी: अंकशास्त्र | जन्मांक म्हणजे काय?

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो, त्यामुळे जन्मांकाचे गुणदोष कमी-जास्त होऊ शकतात. या लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. परफेक्ट लकी नंबर्स, लकी करिअर्स निवडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या पूर्ण न्यूमरॉलॉजी चार्टचा विचार करायला लागतो).

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो.

या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ठ्ये म्हणजे त्या हसतमुख, मनमिळाऊ आणि मृदुभाषी असतात. त्या बहुधा भांडणतंटे, वादविवाद यापासून दूर रहातात. त्यांना टीका करायला सहसा आवडत नाही. त्यांच्या या उपजत गुणामुळं या व्यक्ति उत्कृष्ट मध्यस्थ, मुत्सद्दी, विक्रेते, सल्लागार, समुपदेशक बनू शकतात. त्याशिवाय या व्यक्तिंच्याकडे उत्कृष्ट सौंदर्यदृष्टी आणि क्रिएटीव्हिटी असते, त्यांना विविध कलांची चांगली जाण असते. या व्यक्ति सहजपणे नवे मित्र बनवतात.

या व्यक्तिंची दुसरी बाजू म्हणजे त्या अतिसंवेदनशील, भावूक आणि मूडी असतात, अगदी छोट्या कारणामुळं त्यांचा मूड ऑफ होवू शकतो, त्यांना नैराश्य येऊ शकते. धरसोडपणा आणि चंचलता हे त्यांचे ठळक दोष आहेत. भिन्नलिंगी व्यक्तिकडे सहजपणे आकर्षित होणे हा त्यांचा आणखीन एक दोष आहे.

रोमँँटिक वागणं हा यांचा एक विशेष गुण आहे. सहसा यांचा प्रेमविवाह होतो. लव्ह अफेअर्स होऊ शकतात.

जन्मांक 2 आणि जन्मांक 3 असणाऱ्या व्यक्तिंच्या बाबतीत अनेक समान गोष्टी दिसतात.

आपल्या मनासारखं न झाल्यास यांना मोठं डिप्रेशन येण्याची शक्यता असते. डिप्रेशनमध्ये आत्महत्या करणारांच्यात जन्मांक 2 च्या व्यक्ती जास्त प्रमाणात दिसतात.

जन्मांक 2 असणाऱ्यांपैकी ज्यांचा जन्म 11 किंवा 29 तारखेस झाला आहे, त्या भाग्यवान म्हणायला पाहिजे, कारण 11 हा एक मास्टर नंबर आहे. 29 या तारखेतल्या अंकाची बेरीजही 11 येते. या व्यक्ति उच्च आध्यात्मिक पातळी असणाऱ्या असतात, किंवा धार्मिक असतात. या तारखांची निगेटिव्ह बाजू म्हणजे त्यांच्यापैकी अनेकजण धर्म, कर्मकांड, पूजाअर्चा याच्या अतिआहारी गेलेले असतात.

जन्मांक 2 असणाऱ्या कांही प्रसिद्ध व्यक्ति

जन्मांक 2 असणाऱ्या कांही प्रसिद्ध व्यक्ति म्हणजे महात्मा गांधी, ओशो, लाल बहादूर शास्त्री, थॉमस अल्वा एडिसन, जॉन एफ. केनेडी, मिखाईल गोर्बाचेव्ह, राजीव गांधी, आंद्रे आगासी, आशा पारेख, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान.

महात्मा गांधी जन्मांक 2
महात्मा गांधी जन्मतारीख 2, जन्मांक 2

जन्मांक 2 साठी लकी नंबर्स

लकी नंबर्स
2 हा अंक व एक अंकी बेरीज 2 येणारे नंबर्स (11, 20, 29……. 101 ….200… 2468 वगैरे. (उदा. 2468= 2+4+6+8= 20=2+0=2, म्हणून 2468 हा त्यांच्यासाठी एक लकी नंबर आहे)).

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
2, 4, 6, 8

विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
1, 5, 7

जन्मांक 2 साठी लकी करिअर्स

सेल्समनशिप, कलेशी संबंधित कामे (डिझायनिंग, कमर्शिअल आर्ट, इंटेरिअर डेकोरेशन, आर्किटेक्चर वगैरे), मध्यस्थीशी संबंधित कामे.

हेही वाचा …..

अंकशास्त्र: जन्मांक 1: जन्मतारीख 1, 10, 19, 28

कोणता जन्मांक चांगला?

अंकशास्त्र: जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

Numerology: जॉब करावा की व्यवसाय?

काळा रंग: काळ्या रंगाचं आकर्षण

Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Views: 208
Please follow and like us:
Pin Share

2 thoughts on “अंकशास्त्र: जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *