महावीर सांगलीकर
Senior Numerologist, Graphologist
Phone Number 8149703595
Numerology doubts Marathi
अंकशास्त्राविषयी अनेकांच्या मनात अनेक शंका-कुशंका आहेत.
कोणत्याही विषयाविषयी शंका व कुशंका येण्याचे मुख्य कारण त्या विषयासंबंधी अज्ञान आणि चुकीची गृहीतके हे असते. उदाहरणार्थ, डार्विनचा उत्क्रान्तीचा सिद्धांत अनेकांना पटत नाही, कारण डार्विनचा उत्क्रांतीचा नेमका सिद्धांत काय आहे हे जाणून न घेता चुकीचे गृहीत धरून अनेक लोक चुकीचा निष्कर्ष काढत असतात.
शंका किंवा कुशंका येणे हे सगळ्याच विषयांच्या बाबतीत घडते. शंका येणे चुकीचेही नाही, कारण शंकेचे निरसन झाल्याने तो विषय कळायला मदत होते. पण कुशंका घेणाऱ्या लोकांचा उद्देश विषय समजून घेणे हा नसतोच. केवळ तो विषय त्यांना पटत नाही किंवा आवडत नाही म्हणून ते कुशंका उपस्थित करतात. ज्या विषयातलं कळत नाही त्यावर कुशंका घेण्याचा प्रकार जास्त घडतो.
कित्येकदा असं घडतं की एखादा विषय शिकवणारे लोकच मुळात आपल्या अर्धवट ज्ञानावर आधारित मते मांडत असतात. त्यामुळं त्या विषयीची चुकीची माहिती समाजात पसरते. असो.
इथे आपण अंकशास्त्राविषयी घेतल्या जाणाऱ्या मुख्य शंकांचे निरसन करू.
शंका: एकाच दिवशी अनेकांचा जन्म होतो. त्या सगळ्यांची जन्मतारीखही एकच असते. मग अंकशास्त्राप्रमाणे सगळ्यांचे भविष्य एकच असायला पाहिजे.
उत्तर: पहिली गोष्ट म्हणजे अंकशास्त्राचा उद्देश्य आणि उपयोग भविष्य सांगणे हा नसून त्या-त्या व्यक्तीच्या गुणदोषांचे, स्वभावाचे आणि क्षमतांचे वाचन करणे हा आहे. त्यामुळे ‘मग अंकशास्त्राप्रमाणे सगळ्यांचे भविष्य एकच असायला पाहिजे’ हा मुद्दाच चुकीचा ठरतो.
आता एकाच दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव सारखाच असतो का? या प्रश्नाचे उत्तर ‘तो साधारणपणे सारखा असतो, त्या व्यक्तींच्या स्वभावात, वागण्यात आणि प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीत साम्य असते’ असे आहे. हे अनेकांना पटणार नाही, पण जे लोक अंकशास्त्राचा अभ्यास किंवा प्रॅक्टिस करतात, त्यांना या गोष्टीचा अनुभव येत असतो.
दोन व्यक्तींची पूर्ण जन्मतारीख सारखी असेल तर त्यांचे गुणदोष मोठ्या प्रमाणात सारखे असतात. त्यांचे नाव वेगेवेगळे असले तरी जर नामांक एकच असेल तर दोन्ही व्यक्तींचे स्वभाव, गुण, दोष, क्षमता हे जवळपास सारखेच असतात. इतकेच नाही तर जन्मतारखा आणि नावे वेगवेगळी असली पण जन्मांक, भाग्यांक, नामांक सारखेच असतील तर त्या व्यक्तीही स्वभाव, क्षमता, गुणदोषांच्या दृष्टीने सारख्याच असतात.
आता त्या दोन समान व्यक्तींचे गुणदोष, क्षमता, स्वभाव सारखे असले तरी ती व्यक्ति त्यांचा कसा उपयोग करून घेणार हे त्या-त्या व्यक्तीवर अवलंबून असते.
अंकशास्त्र त्या व्यक्तीच्या क्षमता सांगते, भविष्य नव्हे. शिवाय प्रत्येकाचे भविष्य हे केवळ त्याच्या स्वत:च्या गुण-दोषांवर अवलंबून नसते तर त्यामागे इतरही अनेक घटक असतात, जसे त्या व्यक्तीवर झालेले संस्कार, तिला मिळणारी संधी, सभोवतालचे वातावरण, जोडीदाराचा स्वभाव व गुणदोष वगैरे.
Numerology Doubts Marathi
इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की एखाद्या माणसाचे वाचन करताना त्याची फक्त जन्मतारीखच लक्षात घेतली जात नाही, तर त्याचे नावही लक्षात घेतले जाते. नावाचाही एक अंक असतो, त्याला नामांक म्हणतात. प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीचे वाचन म्हणजे त्याची जन्मतारीख (जन्मांक), संपूर्ण जन्म तारीख (भाग्यांक) आणि पूर्ण नाव (नामांक), नावातील स्वरानुसार येणारा अंक (सोल अर्ज नंबर), व्यंजनानुसार येणारा अंक (पर्सनॅलिटी नंबर) यांचे वाचन असते. या पाच अंकांना कोअर नंबर्स म्हणतात.
याशिवाय इतर अनेक सपोर्टिव्ह नंबर्स असतात, उदा. फर्स्ट नेम नंबर, इयर नंबर, मंथ नंबर, लास्ट नेम नंबर वगैरे. अशा सपोर्टिव्ह नंबर्सची संख्या वीसपेक्षा जास्त आहे. जन्मांक व भाग्यांक यांचे कॉम्बिनेशन्स 81 आहेत, तर 5 कोअर नंबर्सच्या कॉम्बिनेशन्सची संख्या 5900049 आहे. (कोअर नंबर्सविषयी अधिक माहिती अंकशास्त्र: कोअर नंबर्स येथे वाचा)
तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, परिचित यांच्यात समान जन्मांक असणाऱ्या दोन व्यक्ति सापडल्या तर त्यांचा बारकाईने अभ्यास करा. तुम्हाला त्यांच्या वागण्यात, स्वभावात असणाऱ्या साम्याचा अनुभव येईल.
सर्व कोअर नंबर्स समान असणाऱ्या दोन व्यक्ती सापडणे तसे अवघडच. पण जन्मांक व भाग्यांक समान असणारे कांही क्लाएंट्स मी पाहिले आहेत. माझे असे निरीक्षण आहे की त्यांच्या गुण-अवगुणांबरोबरच समस्या देखील एकाच प्रकारच्या होत्या!
शंका: अंकशास्त्र हे सायन्स आहे का?
उत्तर: सामान्यपणे विज्ञानवादी लोक भौतिक शास्त्र म्हणजेच सायन्स असं मानतात आणि भौतिकशास्त्राचे सगळे नियम इतर शास्त्रांना लावायला जातात. पण भौतिक शास्त्राचे सगळे नियम जीवशास्त्र, वनस्पती शास्त्र, मानस शास्त्र इत्यादींना लागू होत नाहीत. विज्ञानाच्या प्रत्येक शाखेच्या स्वत:च्या अशा कांही कन्सेप्ट असतात. अंकशास्त्राच्याही वेगळ्या अशा कन्सेप्ट आहेत, आणि त्या नंबर व्हायब्रेशन थेअरीवर आधारित आहेत. त्यामुळे अंकशास्त्र हे सायन्सच आहे. स्टॅटिस्टिकली ते सिद्धही करता येते.
उदाहरणार्थ, समान तारखांना जन्मलेल्या लोकांच्या स्वभावात मूलभूत समानता दिसून येते आणि विशिष्ठ तारखांचे लोक विशिष्ट क्षेत्रात जास्त प्रमाणावर दिसतात. उदा. मनोरंजनक क्षेत्रात 3 आणि 5 या अंकांचे लोक इतरांपेक्षा जास्त संख्येने दिसतात. (या विषयावरील लेख वाचा: अंकशास्त्र आणि मनोरंजन | अंक 3 आणि 5 ). त्याचप्रमाणे जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये 28 व 24 या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींची संख्या प्रमाणापेक्षा खूपच जास्त आहे. असे स्टॅटिस्टिक पाहून अंकशास्त्राची सत्यता पडताळता येते.
अंकशास्त्राविषयी कांही कुशंका ……
कांही लोक कुशंका विचारतात, त्यामागे कसलेही लॉजिक नसते आणि कॉमन सेन्सही नसतो, किंवा मग कुशंकेमागचा त्यांचा उद्देश वेगळा असतो.. अशी एक कुशंका म्हणजे ‘शून्य हा सगळ्यात महत्वाचा अंक आहे, पण अंकशास्त्रात शून्याला स्थान नाही….. ‘
याचे उत्तर असे आहे: जर शून्य ही तारीख अस्तित्वात असती, शून्य तारखेला जन्मलेले लोक अस्तित्वात असते, तर अंकशास्त्राने शून्याचा विचार केला असता. पण शून्य तारीख अस्तित्वात नाही, मग अंकशास्त्रात शून्य या अंकाचा विचार होईलच कसा? (कॉमन सेन्स). तसेच A ते Z या अक्षरांच्या अंकातील किमतींमध्येही एकाही अक्षराची किंमत शून्य नाही. मग शून्य या अंकाचा विचार कशाला केला जाईल?
अंकशास्त्राविषयी समज गैरसमज …….
अंकशास्त्राविषयी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे अनेक लोक त्याला ज्योतिषशास्त्राची शाखा समजतात. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या इथं अंकशास्त्राची प्रॅक्टिस करणारे बहुतांश लोक हे ज्योतिषी आहेत. पण प्रत्यक्षात अंकशास्त्राचा ज्योतिषशास्त्राशी आणि ग्रहगोलांशी कसलाच संबंध नाही. ज्योतिषांनी आपल्या सोयीसाठी ओढून ताणून तसा संबंध जोडला आहे, पण त्यामागे कसलेही लॉजिक नाही. या विषयावरील माझा Numerology is not Astrology and Numbers are not influenced by Planets हा लेख वाचावा.
Numerology doubts Marathi
हेही वाचा ……
अंकशास्त्र: तुमचे लकी नंबर्स, लकी तारखा, लकी कलर्स, लकी फ्रेंड्स (रिपोर्ट)
साडेसातीपासून मुक्तीचा सोपा उपाय!
काळा रंग: काळ्या रंगाचं आकर्षण
Numerology: 8 हा अंक अनलकी नाही…
Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप
TheyWon Marathi
मराठी लघुकथा, लेख आणि कविता