Numerology: 13 हा नंबर अनलकी आहे का?

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist
Cell Phone Number 8149128895

13 हा नंबर अनलकी व अशुभ आहे का?

13 हा अंक युरोप आणि अमेरिकेत अनलकी व अशुभ मानला जातो. इतका की तिथे अनेक ठिकाणी घराला 13 नंबर द्यायचे टाळले जाते, अनेक हॉटेलमध्ये 13 नंबरची रूम नसते. लोक 13 तारखेला लग्न करायचे टाळतात. इतकेच नाही तर अनेक लोक बसमध्ये किंवा थिएटरमध्ये 13 नंबरच्या सीटवर बसायचे टाळतात!

चीनमध्येही प्राचीन काळापासून हा अंक अशुभ मानला गेला आहे.

13 तारखेला घडलेल्या अनेक दुर्घटना किंवा 13 या नंबरशी संबधीत घडलेल्या दुर्घटना यामुळे या अंकाविषयी लोकांच्या मनातील भितीमध्ये भरच पडली.

अमेरिकेने चंद्रावर जाण्यासाठी अपोलो ही मोहीम आखली. त्यातले अपोलो 11 हे यान चंद्रावर उतरणारे पहिले यान होते. त्यानंतर कांही महिन्यात अपोलो 12 हे यानही चंद्रावर यशस्वीपणे उतरले. पण नेमके अपोलो 13 या यानाच्या ऑक्सिजनच्या टाकीला गळती लागली आणि हे यान अपयशी ठरले. विशेष म्हणजे हे यान नुसतेच अपोलो 13 नव्हते, तर ते दुपारी 13 वाजून 13 मिनिटांनी सोडण्यात आले होते. या घटनेमुळे अमेरिकेत आणि इतर ठिकाणी 13 या अंकाला आणखीनच अशुभ मानण्यात येऊ लागले.

रोमन साम्राज्यात 13 या अंकाला मृत्यू आणि विनाश यांचा अंक मानले जाई. युरोपात काळ्या जादूची प्रॅक्टिस करणारे लोक 13 या अंकाला दुष्ट शक्ती आणि दुर्दैव यांचा अंक मानतात.

13 हा अंक विशेष करून ख्रिस्ती जगतात अनलकी मानला जातो, पण तो कांही ‘युनिवर्सल अनलकी’ नंबर नव्हे. इतर अनेक संस्कृतींमध्ये हा अंक लकी किंवा शुभ मानला गेला आहे. उदाहरणार्थ, तिबेटमध्ये हा अंक शुभ मनाला गेला आहे. चीन आणि जपानमधील बौद्ध संस्कृतीमध्ये 13 या अंकाला महत्व आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये 13 नंबर अनलकी आहे का?

आपल्या इथे भारतात हिंदू धर्मात त्रयोदशीला फार महत्व आहे.

  • त्रयोदशी हे प्रत्येक चांद्रमासाच्या तेराव्या दिवशी येते. या दिवशी धार्मिक हिंदू प्रदोष व्रत पाळतात. महाशिवरात्र ही देखील त्रयोदशीला असते.
  • भगवान महावीरांचा जन्म त्रयोदशीला झाला होता.
  • भारतात दिवाळीच्या सणात धनत्रयोदशीला महत्व असते.
  • हिंदू धर्मात मरणोत्तर संस्कारविधींमध्ये तेराव्या दिवसाला महत्व असते.

असे असले तरी भारतात दोन मोठ्या वाईट घटना 13 तारखेस घडल्या आहेत. त्या म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड (13 एप्रिल 1919) आणि भारतीय संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला (13 डिसेंबर 2001 ).

अंकशास्त्रात 13 हा नंबर अनलकी आहे का?

आता आपण अंकशास्त्राच्या दृष्टीने 13 या अंकाचा विचार करू. आपण नीट विचार केला तर असे दिसून येईल की कोणताही अंक युनिव्हर्सली लकी किंवा अनलकी नसतो. एखादा अंक एखाद्याला लकी तर दुसऱ्याला अनलकी असू शकतो. हे त्या नंबरच्या कम्पॅटिबिलिटीवर ठरते. उदाहरणार्थ तुमचा जन्म 13 तारखेस झाला असेल तर 13 हा अंक तुम्हाला लकी ठरेल कारण तो तुमच्या जन्मतारखेशी पूर्णपणे कम्पॅटिबल आहे. पण हाच अंक 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्म झालेल्या लोकांना लकी ठरणार नाही, कारण या तारखांशी 13 हा अंक कम्पॅटिबल नाही.

13 या अंकात चार या अंकाचे सर्व गुणदोष असतात, शिवाय चार या अंकापेक्षा वेगळेपण म्हणजे 13 या अंकात अनेक गूढ शक्ती असतात. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 13 तारखेस झाला आहे, किंवा ज्यांच्या पूर्ण जन्मतारखेची बेरीज 13 येते अशा व्यक्तिंकडे कांही विशेष शक्ती असू शकतात. यात पुढे होणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळणे, मनाने दूर अंतरावर संदेश पाठवणे किंवा मिळवणे, मोहिनी घालणे अशा गोष्टींचा समावेश होतो. त्यांना हिप्नोटिझम, रेकी, जादू, स्पिरिच्युअल हीलिंग, टेलेपथी, माइंड रीडिंग या व त्यासारख्या विषयांमध्ये मास्टरी मिळू शकते.

13 अंकाशी संबंधित व्यक्ति गणित आणि टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये पारंगत असतात. या व्यक्ति हुशार आणि चाणाक्ष असतात आणि त्यांच्याकडे विलक्षण तर्कबुद्धी असते. पण त्यांच्या भावना तर्कबुद्धीवर मात करू शकतात.

अंकशास्त्रात 13 हा नंबर अनलकी आहे का?

एखाद्याची जन्मतारीख 13 आहे, किंवा पूर्ण जन्मतारखेची बेरीज 13 आहे आणि त्या व्यक्तीच्या चार्टमध्ये 3, 8, 9 हे अंक आले असतील (म्हणजे उदा. जन्मतारीख 13 आहे आणि ऍटिट्यूड नंबर किंवा भाग्यांक 3, 8 अथवा 9 आहे) तर त्या व्यक्तीला वागणुकीच्या समस्या निर्माण होण्याची मोठी शक्यता असते. मी अशा अनेक व्यक्ती पाहिल्या आहेत.

अंकशास्त्रात 13 हा अंक चार ‘कार्मिक डेब्ट्स’ अंकांपैकी एक अंक आहे. एखाद्या व्यक्तीच्या चार्टमध्ये कार्मिक डेब्ट्स अंक असेल तर त्या व्यक्तीला पूर्वायुष्यात अथवा पूर्व जन्मात केलेल्या चुकांचे फळ भोगावे लागते. (कार्मिक डेब्ट्स अंकांबद्दल मी वेगळा लेख लिहित आहे). 13 अंक संबधित व्यक्तीला इतरांसाठी (विशेषतः कुटुंबीय, जोडीदार यांच्यासाठी) त्रासदायक बनवू शकतो.

तुमच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 13 हा अंक असेल तर घाबरून जायचं कारण नाही. या अंकाचे चांगले गुण तुम्ही स्वत:च्या आणि समाजाच्या भल्यासाठी वापरायला पाहिजेत आणि वाईट गुणांपासून दूर राहिले पाहिजे.

हेही वाचा …..

काळ्या रंगाचं आकर्षण

लकी नंबर 8

लकी वेहिकल नंबर 1008

अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 94
Please follow and like us:
Pin Share

3 thoughts on “Numerology: 13 हा नंबर अनलकी आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *