काळा रंग: काळ्या रंगाचं आकर्षण

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist, Graphologist
Phone Number 91 8149128895

अपवाद वगळता जगात बहुतेक संस्कृतींमध्ये काळा रंग हा अशुभ, वाईट मानला गेला आहे. काळ्या रंगाचा संबंध अंधार, गूढ विद्या, दुःख, क्रोध, भीती, मृत्यू यांच्याशी आहे. अगदी अंधश्रद्धा निर्मुलनवाले, पुरोगामी लोकही निषेधासाठी काळ्या रंगाच्या फिती वापरतात, यातच काय ते आले. काळे मन, काळी जादू, काळा पैसा, काळा दिवस असे शब्दप्रयोग काळ्या रंगाविषयी तिरस्कार किंवा भीती यातूनच तयार झालेत.

वास्तविक पाहता काळा हा रंगच नाही. एकीकडे पांढऱ्या रंगाची फोड केली तर त्यात सात वेगवेगळे रंग असल्याचे दिसते. आपल्याला ज्या वस्तू पांढऱ्या दिसतात, त्या वस्तूवरून सगळेच रंग परावर्तित होतात. याउलट आपल्याला ज्या वस्तू काळ्या दिसतात, त्यावर पडणारा सारा प्रकाश शोषून घेतला जातात, तिथून कोणताही रंग परावर्तित होत नाही. काळा रंग म्हणजे वास्तवात कोणत्याही रंगाचा अभाव होय.

रंग आणि मानसिकता

रंगांचा आणि मानसिकतेचा जवळचा संबंध आहे. एखाद्या व्यक्तीला कोणता रंग आवडतो, अथवा कोणकोणते रंग आवडतात यावरून त्या व्यक्तीची मानसिकता कशा प्रकारची आहे हे कळू शकते.

काळा रंग आवडणाऱ्या लोकांचे मन डिस्टर्ब झालेले असू शकते. हा रंग भीतीशी संबंधित आहे.

गुलाबी रंग आवडणारे लोक रोमँटिक असतात. लाल रंगाची आवड ही वासना, प्रेम, धोका, राग यांच्याशी संबंधित आहे, तर हिरव्या रंगाची आवड रंग ही सुबत्ता, धन आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे.

पिवळ्या रंगाची आवड ही क्षमता, सुख यांच्याशी तर निळ्या रंगाची आवड ही सुसंस्कृतपणा, कौशल्य, उच्च दर्जा, विश्वासार्हता यांच्याशी संबंधित आहे. (इथे निळा म्हणजे जाम्भळा नव्हे ही गोष्ट लक्षात घ्यावी).

कलर सायकॉलॉजीमध्ये जगभर जे संशोधन झाले आहे, त्यानुसार काळा रंग आवडणाऱ्या लोकांची टक्केवारी तशी कमीच आहे. केवळ 9 टक्के पुरुषांना आणि 6 टक्के स्त्रियांना काळा रंग आवडतो.

स्त्रियांना आणि पुरुषांना सर्वात जास्त आवडणारा रंग म्हणजे निळा (आणि त्याच्या इतर शेड्स). स्त्रियांना निळ्या खालोखाल परपल आणि त्यानंतर हिरवा रंग आवडतो, तर पुरुषांना निळ्या खालोखाल हिरवा रंग आवडतो.

कलर सायकॉलॉजीचा उपयोग कार्पोरेट लेव्हलला केला जातो. जाहिरातीमधील अक्षरांचे रंग, प्रोडक्ट्सचा रंग, पॅकिंगचा रंग यात कलर सायकॉलॉजीनुसार योग्य ते रंग निवडले जातात.

काळा रंग : केस स्टडी

माझा एक क्लाएंट होता. तो नेहमीच्या संपर्काताला होता. त्याला नेहमी या ना त्या प्रकारच्या समस्या येत रहात असत. माझ्या लक्षात आलं की त्याच्या समस्यांचं एक मोठं कारण त्याला असलेलं काळ्या रंगाचं आकर्षण हे होतं. काळ्या रंगाची मोटर सायकल, काळा शर्ट, काळा टी. शर्ट, काळे घड्याळ.

मी त्याला काळ्या रंगाच्या वस्तू वापरू नकोस असा सल्ला दिला होता. पण त्यानं माझा हा सल्ला पाळला नाही. सांगितलेलं कळतंय पण वळत नाही अशी त्याची अवस्था होती. शेवटी मी त्याला सल्ले द्यायचं बंद केलं.

पुढं मला कळलं की त्याची एक गर्ल फ्रेंड होती, तिला काळा रंग आवडत असे. ती सांगत असे म्हणूनच हा काळ्या रंगाच्या वस्तू वापरत असे. थोडक्यात म्हणजे तिला काळा रंग आवडतो म्हणून यालाही काळा रंग आवडत असे.

मला यातले धोके जाणवत होते म्हणून मी त्याला पुन्हा एकदा काळ्या रंगाबाबत सावध केलं. अर्थातच त्यानं माझा सल्ला पुन्हा एकदा टाळला. पुढे त्याच्यावरची संकटे वाढतच गेली, इतकी की त्याची नोकरी गेली आणि त्याच्या कांही उद्योगांमुळे त्याची बदनामीही झाली. पुढे असे कळले की त्याच्या गर्लफ्रेंडलाही मोठे प्रॉब्लेम्स झाले.

ठेच लागल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही, सल्लेही ऐकत नाही हेच खरे! त्या क्लाएंटने काळ्या वस्तू वापरायचे पूर्ण बंद केले. त्याने त्याची काळी मोटारसायकल विकून टाकली. त्याने त्याच्या गर्ल फ्रेंडलाही डच्चू दिला. त्यानंतर कांही दिवसात त्याला दुसरीकडे एक चांगली नोकरी मिळाली. आता त्याची गाडी रुळावर आली आहे.

काळा रंग

(असे असले तरी काळा रंग कांही सर्वांसाठीच वाईट ठरत नाही. परंतु हा रंग टाळणे, विशेषतः काळे कपडे, वहाने, व इतर मोठ्या आकाराच्या वस्तू तुमच्या फायद्याचे ठरेल).

हेही वाचा!

Numerology: जॉब करावा की व्यवसाय?

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

महिलांची मानसिकता, स्वभाव आणि समस्या

लग्नानंतर नाव बदलताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 284
Please follow and like us:
Pin Share

2 thoughts on “काळा रंग: काळ्या रंगाचं आकर्षण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow by Email