माझं हे म्हणणं केवळ राशिभविष्यापुरतं मर्यादित नसून एकूणच भविष्य जाणून घेण्याच्या इच्छेबद्दल आहे. तुम्हा तुमचं भविष्य जाणून घ्यायच्या भानगडीत पडूच नये. भविष्य ही जाणून घ्यायची गोष्ट नसून घडवण्याची गोष्ट आहे. म्हणजे तुमचं भविष्य तुम्हीच घडवायचं आहे. कोणतेही ग्रहगोल तुमचे भविष्य घडवू शकत नाहीत आणि बिघडवूही शकत नाहीत.
Category: ज्योतिष शास्त्र
साडेसातीपासून मुक्तीचा सोपा उपाय!
साडेसाती या प्रकारावर विश्वास असणारे लोक आपल्या आयुष्यातील अक्षरश: साडेसात वर्षे वाया घालवतात. या काळात ते आत्मविश्वास हरवतात, खचतात. मग तथाकथित साडेसाती संपल्यावर देखील ते परत उभारी घेत नाहीत.
ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का? छत्रपती शाहू महाराज आणि ज्योतिषी
महावीर सांगलीकर Numerologist, GraphologistPhone Number 8149128895 ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का?ज्योतिषशास्त्र म्हणजे काय?ग्रहांचा मानवी जीवनावर कांही परिणाम होतो का?ज्योतिषशास्त्रीय भाकिते खरी ठरतात का?छत्रपती शाहू महाराज आणि ज्योतिषी ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे का? ज्योतिषशास्त्रानुसार केलेली भाकिते खरी ठरतात का? आणि ग्रहांचा मानवी जीवनावर कांही परिणाम होतो का? याविषयी जगभरात अगदी विद्यापीठीय स्तरावर संशोधन झाले आहे.…
ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र
खगोलशास्त्र (Astronomy) आणि ज्योतिषशास्त्र (Astrology) या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण खगोलशास्त्र आणि जोतिषशास्त्राची बहुतांश ज्योतिषी आणि सर्वसामान्य लोक खूप गल्लत करत असतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्राला विज्ञान मानणारे लोक खगोलशास्त्रीय घटनांचा आधार घेत ज्योतिषशास्त्र हे कसे अचूक आहे हे सांगत असतात.
Vastudosh: वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?
खरं म्हणजे ज्या वास्तूमध्ये आपण राहतो, त्या वास्तूने आपल्याला आश्रय दिलेला असतो. ती वास्तू आपल्याला ऊन-वारा-पाऊस आणि इतर अनेक गोष्टींपासून संरक्षण देते. मग ती वास्तू म्हणजे झोपडी असो की बंगला असो. अशा त्या वास्तूमध्ये दोष शोधणे म्हणजे त्या वास्तूशी प्रतारणा करणे होय. हे म्हणजे आपल्यावर उपकार करणाऱ्या त्या वास्तूबद्दल कृतज्ञ राहण्याऐवजी कृतघ्न होणे आहे.
बाळाचे नाव…. नावरस नाव म्हणजे काय?
नावरस नाव आणि प्रत्यक्षातले नाव हे वेगवेगळे असते. किंबहुना नावरस नाव प्रत्यक्ष नाव म्हणून वापरू नये असे सांगितले जाते. त्यामुळे बाळाचे व्यवहारातले नाव ठेवताना त्या नावाचे राशीनुसार पहिले अक्षर काय असावे याचा विचार अजिबात करू नये.