अंकशास्त्र | कार्मिक डेब्ट नंबर्स

कार्मिक डेब्ट नंबर्स | Numerology Karmic Debt Numbers Marathi
Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist
Phone Number 8149703595

अंकशास्त्रात 13, 14, 16 व 19 हे नंबर्स कार्मिक डेब्ट नंबर्स म्हणून ओळखले जातात. ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 13, 14, 16, 19 यांपैकी एक आहे, किंवा ज्यांची जन्मतारीख आणि जन्म महीना यातील अंकांची बेरीज (D+D+M+M) , अथवा ज्यांच्या पूर्ण जन्मतारखेतील अंकांची बेरीज (D+D+M+M +Y+Y+Y+Y) वरीलपैकी एखादी येते, त्यांच्या डेट न्यूमरॉलजी चार्टमध्ये तो कार्मिक डेब्ट नंबर आहे असे ओळखावे.

त्याचप्रमाणे व्यक्तीच्या नावानुसार येणाऱ्या चार्टमध्येही (Name Numerology Chart) एखादा कार्मिक डेब्ट नंबर असू शकतो.

ज्यांच्या न्यूमरॉलजी चार्टमध्ये एखादा कार्मिक डेब्ट नंबर असतो त्या व्यक्तीमध्ये कांही विशिष्ट स्वभावदोष ठळकपणे दिसून येतात. हे स्वभावदोष चार्टमध्ये कोणता कार्मिक डेब्ट नंबर आहे त्यानुसार असतात. कार्मिक डेब्ट या शब्दांचा मराठी अर्थ ‘पूर्वकर्मांचे कर्ज’ असा करता येईल.

संबधित व्यक्तिने पूर्वायुष्यात केलेल्या आणि वर्तमानकाळात करीत असलेल्या चुकीच्या कृत्यांचे गंभीर परिणाम त्या व्यक्तीला दीर्घकाळ (आणि स्वभाव न बदलल्यास आयुष्यभर) भोगावे लागतात. पण इथे तुम्ही हेही लक्षात घेतले पाहिजे की एखाद्या व्यक्तीच्या कोअर न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये एखादा कार्मिक डेब्ट असला तरी इतर कोअर नंबर्स काय आहेत यावरही त्यानुसार त्या व्यक्तीच्या स्वभावदोषांची तीव्रता कमीअधिक असू शकते.

प्रत्येक अंकाचे गुण आणि दोष असतात. एखाद्या व्यक्तीच्या चार्टमध्ये एखादा कार्मिक डेब्ट नंबर असेल, पण त्याने आपल्या दोषांना नियंत्रित केले असेल तर त्या व्यक्तीमध्ये संबंधित नंबरचे दोष कमी प्रमाणात आढळून येतील.

कार्मिक डेब्ट नंबर्स, गुण आणि स्वभावदोष

ज्यांच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये एखादा कार्मिक डेबीट नंबर असतो, त्या व्यक्तीमध्ये पुढील गुणदोष आढळून येतात:

कार्मिक डेब्ट नंबर 13

गुण: गणित व टेक्नॉलॉजी या विषयांत पारंगत, तर्कनिष्ठ विचार, निरीक्षण आणि विश्लेषणाची मोठी क्षमता, गूढ विद्यांशी संबंधित क्षमता, तपशीलवार आणि सखोल माहिती गोळा करण्याची क्षमता, वक्तशीरपणा

स्वभावदोष: फटकळ आणि आक्रमक स्वभाव, दुसऱ्यांना दोष देण्याची प्रवृत्ति, बेजबाबदार वागणे, जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ति, आळशीपणा, संयमाचा अभाव, हट्टी, दुराग्रही व वर्चस्ववादी स्वभाव, संवादकौशल्य नसणे.

या व्यक्तींच्यामुळे इतरांना, विशेषतः जवळच्या लोकांना मोठा मानसिक त्रास होण्याची शक्यता असते.

कार्मिक डेब्ट नंबर 14

गुण: उच्च बुद्धिमत्ता, अनेक विषयांत पारंगत, संभाषण व संवाद कौशल्य, मुक्त विचार करण्याची क्षमता, स्वातंत्र्यप्रियता, नवी गोष्टी त्वरित स्वीकारण्याची आत्मसात करण्याची क्षमता, भाषाप्रभुत्व.

स्वभावदोष: चंगळवादी स्वभाव, भोगवाद, बुद्धिमत्तेचा दुरुपयोग, स्वातंत्र्याचा दुरुपयोग, द्वेषभावना, व्यसनाधीनता, अनैतिकता.

या व्यक्ती आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक न रहाण्याची शक्यता असते.

कार्मिक डेब्ट नंबर 16

गुण: अंतर्मुख स्वभाव, निरीक्षण व विश्लेषण करण्याची अदभूत क्षमता, गुप्तता बाळगण्याची क्षमता, अमूर्त विचार करण्याची क्षमता, अंतर्ज्ञानी, आत्मपरीक्षण करण्याची क्षमता.

स्वभावदोष: स्वकेंद्रित वागणे, इतरांशी भावनिक संबंध जोडण्यात अपयश, इतरांच्यापासून अलिप्त रहाण्याची प्रवृत्ती, फॅमिली ओरिएंटेड नसणे, सामाजिक कार्यात फारसा रस नसणे.

या व्यक्तींना इतरांमुळे त्रास होण्याची शक्यता असते.

कार्मिक डेब्ट नंबर 19

गुण: नेतृत्व करण्याची क्षमता, संघटनकौशल्य, स्वावलंबन, व्यवस्थापन कौशल्य, लढाऊ वृत्ती, भौतिक यश मिळवण्याची मोठी क्षमता, शोधक वृत्ती, नाविन्याची आवड.

स्वभावदोष: आक्रमक स्वभाव, हुकूमशाही प्रवृत्ती, स्वार्थी वृत्ती, वर्चस्ववादी स्वभाव, इतरांचा वापर करून त्यांना दूर सारण्याची प्रवृत्ती, सेल्फ सेंटरड स्वभाव.

या व्यक्ती आपल्या सत्तेचा, पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करण्याची शक्यता असते. तसेच या व्यक्तींच्यामुळे इतरांना, विशेषतः जवळच्या लोकांना मोठा मानसिक त्रास होण्याची शक्यता असते.

हेही वाचा……

Numerology: 8 हा अंक अनलकी नाही…

तुमच्या सहीचं रहस्य | Graphology

Vastudosh: वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

साडेसातीपासून मुक्तीचा सोपा उपाय!

Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 138
Please follow and like us:
Pin Share

One thought on “अंकशास्त्र | कार्मिक डेब्ट नंबर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *