महावीर सांगलीकर
Senior Numerologist, Graphologist
Phone Number 8149128895,8149703595
1 जून वाढदिवस
शालेय दाखल्यांत ‘1 जून’ – एक ऐतिहासिक प्रथा
पूर्वीच्या काळात, विशेषतः ग्रामीण भागात किंवा अशा घरांमध्ये जिथे मुलांच्या जन्माच्या नोंदी व्यवस्थित ठेवण्याची सवय नसे, तिथे शाळेत मुलांना घालताना त्यांच्या जन्मतारखेबद्दल नेमकी माहिती नसायची. अशा वेळी, शालेय दाखल्यात जन्मतारीख भरताना शिक्षक किंवा लिपिक सरसकटपणे “1 जून” ही तारीख लिहून टाकत. ही एक प्रकारे व्यवहार्य सोय होती. त्यामुळे वर्षानुवर्षे अशा शैक्षणिक पद्धतीमुळे लाखो लोकांची सरकारी कागदपत्रांवरील जन्मतारीख 1 जून झाली. आजही अनेक लोक अशा प्रकारे “1 जून जन्म” म्हणून ओळखले जातात.
आजच्या काळात ही प्रथा सरकारने बंद केली आहे. मुलांचे जन्म प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे आता अधिकृत नोंदी अधिक अचूक झाल्या आहेत. पण 70, 80 आणि 90 च्या दशकात जन्मलेल्या पिढीत 1 जून ही ‘सामान्य’ वाढदिवसाची तारीख बनली होती. या सगळ्या पार्श्वभूमीमुळे, 1 जून हा दिवस ‘सर्वाधिक वाढदिवस असलेला दिवस’ ठरतो.

जन्मतारीख खोटी असली तरी परिणाम खरे!
आपली जन्मतारीख प्रत्यक्षात 1 जून नसेल, पण तुम्ही ती कागदोपत्री वापरत असाल, किंवा प्रत्येक वर्षी त्या दिवशी वाढदिवस साजरा करत असाल, तर त्या तारखेचा तुम्हाला मानसिक, सामाजिक आणि वैचारिक परिणाम होतो. कारण मेंदू आणि वर्तन या गोष्टी बाह्य संकेतांवरही आधार घेत असतात. त्यामुळे तुमच्यावर 1 आणि 7 या अंकांचे गुणदोष लागू होतात.
1 आणि 7 या अंकाचे गुणदोष
1 जून या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 1 असतो तर ऍटिट्यूड नंबर 7 असतो. (जन्मांक आणि ऍटिट्यूड नंबर यांच्याविषयी अधिक माहिती पुढील लिंकवर वाचावी: कोअर नंबर्स )
1 आणि 7 या अंकांचे स्वभावगुण व वैशिष्ट्ये
ज्यांचा जन्मांक 1 असतो, त्यांच्यात पुढाकार घेण्याची, इतरांना मार्गदर्शन करण्याची, आणि नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असते. ते धाडसी, आत्मविश्वासी आणि निर्णयक्षम असतात. नियोजन, व्यवस्थापन आणि कृती करण्याची ताकद त्यांच्यात असते.
गुणदोष: स्वावलंबन, प्रेरणादायक व्यक्तिमत्व, धाडस, पुढाकार घेणे, अहंकार, हुकूमशाही वृत्ती, मतलबी वागणूक, दुसऱ्यांना कमी लेखणे
ऍटिट्यूड नंबर 7 असल्यामुळे या व्यक्तींमध्ये चिंतनशीलता, गूढ विषयांबद्दल रस, तत्त्वज्ञान, आत्मपरीक्षण आणि गहन अभ्यास यांचं विशेष स्थान असतं. ते सामान्यतः थोडे अबोल, गंभीर आणि सतत विचार करत असतात. यांना एकटं राहणं आणि स्वतःच्या विश्वात रमणं आवडतं.
गुणदोष: मननशीलता, निरीक्षणशक्ती, आध्यात्मिकता, ज्ञानाची भूक, स्वतःच्या भावविश्वात हरवून जाणे, अलिप्तपणा, संशय आणि एकलकोंडेपणा.
व्यावसायिक आणि करिअर संधी
1 जूनला जन्मलेल्यांची अंकांची संगती अशी असते की त्यांच्यात नेतृत्व आणि अभ्यास दोन्हीची क्षमता असते. त्यामुळे हे लोक विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात:
शासन, प्रशासन आणि राजकारण
ते उत्तम नेते, राजकारणी किंवा सामाजिक कार्यकर्ते होऊ शकतात. लोकांना संघटित करण्याची आणि धोरणं ठरवण्याची त्यांची ताकद त्यांना वरच्या पातळीवर घेऊन जाते.
व्यवसाय आणि मॅनेजमेंट
त्यांच्यात व्यवसायात धोरणशुद्ध निर्णय घेण्याची क्षमता असते. विशेषतः रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स यामध्ये त्यांना चांगलं यश मिळू शकतं.
शिक्षण आणि संशोधन
ऍटिट्यूड नंबर त्यांच्यात अभ्यासू वृत्ती असते. त्यामुळे ते शिक्षक, प्राध्यापक, तज्ज्ञ सल्लागार किंवा संशोधक होऊ शकतात.
गुप्तचर, पोलीस व संरक्षण सेवा
त्यांची निरीक्षणशक्ती आणि काटेकोर बुद्धिमत्ता यांचा उपयोग पोलीस, इंटेलिजन्स अधिकारी, डिटेक्टिव्ह, किंवा लष्करी उच्चाधिकारी म्हणून करता येतो.
1 जूनला जन्मलेले काही प्रसिद्ध लोक
खालील व्यक्ती 1 जून रोजी जन्मलेली असून काहींची जन्मतारीख प्रत्यक्ष जन्माची नसून, फक्त शालेय दाखल्यात नमूद केलेली आहे. तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्या तारखेचा प्रभाव जाणवतो:
सत्येंद्र नाथ टागोर – समाजसुधारक
सुरेश खोपडे – IPS अधिकारी, समाजसेवक
नर्गिस – प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री
राजू शेट्टी – राजकारणी व शेतकरी संघटनेचे नेते
इस्माईल दरबार – संगीतकार
पदमसिंह पाटील – राजकीय क्षेत्रातील व्यक्ती
आनंदराव अडसूळ – माजी खासदार
लक्ष्मण माने – लेखक, सामाजिक कार्यकर्ते
हरी नरके – संशोधक, विचारवंत
श्रीकांत चौगुले – लेखक
आर माधवन – अभिनेता
दिनेश कार्तिक – क्रिकेटर
करनम मल्लेश्वरी – वेट लिफ्टर
1 जून वाढदिवस
हेही वाचा:
जन्मांक 1: जन्मतारीख 1, 10, 19, 28
न्यूमरॉलॉजी: तुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
Baby Names | अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……
अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi
TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)
खूप छान माहीती