नावात बदल करण्याची कायदेशीर प्रक्रिया | Name Change Marathi

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist & Graphologist
Cell Phone 814 912 8895

नावात बदल करण्याची गरज का आणि कधी असते?

अनेकांना कांही कारणाने आपले नाव अथवा आडनाव बदलायचे असते. ते बदलण्यामागील सगळ्यात मोठे कारण म्हणजे बहुतेक मुलींना लग्नानंतर आपले नाव आणि आडनाव बदलावे लागते हे आहे. याशिवाय नाव बदलण्यामागे पुढील कारणेही असतात:

कांही लोकांची वेगवेगळ्या कागदोपत्रावर एकच नाव अनेक प्रकारे लिहिले गेलेले असते. उदा. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर अमितकुमार तर रेशन कार्डवर नुसतेच अमित, एके ठिकाणी वसंत तर दुसरीकडे वसंतराव वगैरे. अशा लोकांना पुढे पासपोर्ट वगैरे मिळवण्यात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे त्यांना सर्व ठिकाणी एकसारखे नाव करून घ्यावे लागते.

कधी-कधी कांही लोकांच्या मूळ कागदपत्रात नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका झालेल्या असतात.

कांही लोक त्यांना आपले नाव किंवा आडनाव आवडत नसते म्हणून ते बदलतात.

अनेक अभिनेते, लेखक, कलाकार, संगीतकार वगैरे लोक आपले मूळ नाव वापरण्याऐवजी एखादे नवीन, आकर्षक असे नाव धारण करतात.

कांही लोक धर्म बदलतात, त्यातील अनेक लोक नव्या धर्माला अनुरुप असे नाव धारण करतात.

क्वचित कांही लोक आपली ओळख पूर्णपणे बदलण्यासाठी आपले नाव पूर्णपणे बदलतात.

लिंगबदल केलेल्या व्यक्तीही आपले नाव बदलतात.

कांही लोक वेगळ्या राज्यात अथवा देशात स्थायिक झाल्यावर तिथल्या संकृतीला अनुरूप असे नाव धारण करतात. उदा. पटेलचे पाटील, किंवा पाटीलचे पटेल, गौडाचे गावडे, हरिशचे हॅरी, बांडेचे बॉण्ड, वगैरे.

अलीकडे न्यूमरॉलॉजिकल (अंकशास्त्रीय) कारणासाठी नाव बदलणे हा प्रकारही सुरु झाला आहे.

नाव बदलल्यानंतर त्याची कायदेशीर नोंद करणे ही गोष्ट अतिशय महत्वाची आणि फायदेशीर असते. अशी नोंद केल्यावर तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅन्क अकाउंट्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना आणि इतर अनेक ठिकाणी तुमच्या नावात बदल करता येतात.

नावात बदल करण्याची कायदेशीर प्रक्रिया

नावात बदल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सोपी आहे, शिवाय यासाठी फारसा खर्चही येत नाही. पण ही प्रक्रिया पूर्ण व्हायला कांही दिवस अथवा महिनेही लागू शकतात.

नाव बदलण्याची साधारण प्रक्रिया अशी असते:

  • ग्रामपंचायत/नगरपालिका/महापालिकेच्या कार्यालयात विहित नमुन्यात आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे.
  • तिथे नोंद झाल्यावर राज्य सरकारच्या अथवा केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये नाव बदलल्याची जाहिरात प्रसिद्ध करणे. अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी तुम्हाला शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते.
  • स्थानिक वर्तमानपत्रात छोटी जाहिरात प्रसिद्ध करणे.

या संपूर्ण प्रक्रियेची तपशीलवार माहिती तुम्हाला तुमच्या स्थानिक इ सेवा केंद्र, नोटरी यांच्याकडे मिळू शकते. शिवाय ही कामे करून देणारे एजंट्सही असतात. तुमच्या परिचितांमध्ये कोणी आपले नाव बदलले असले तर तुम्हाला तुमच्या येथील पूर्ण प्रक्रिया आणि नेमके कोणाकोणाला भेटायचे याची विस्तृत माहिती सहजपणे मिळू शकेल.

नावात बदल करताना घ्यायची काळजी

या संपूर्ण प्रक्रियेत तुम्ही तुमचे नवीन नाव नोंदवताना अर्ज, प्रतिज्ञा पत्र, जाहिराती या सर्व ठिकाणी नावाच्या स्पेलिंगमध्ये कसलीही चूक होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायला पाहिजे.

नावाच्या संदर्भात इतर लेख

नावात काय आहे? नावात बरंच कांही आहे!

लग्नानंतर नाव बदलताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

बाळासाठी अंकशास्त्रानुसार लकी नावाचे कांही निकष

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा! Numerology Consultancy in Marathi

TheyWon ऑनलाईन मराठी मॅगझीन

Views: 26
Please follow and like us:
Pin Share

2 thoughts on “नावात बदल करण्याची कायदेशीर प्रक्रिया | Name Change Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *