लग्नानंतर नाव बदलताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist, Graphologist
Phone Number 91 8149703595

लग्नानंतर नाव बदलताय? मग त्याआधी हा लेख अवश्य वाचा!

आजच्या आधुनिक युगात लग्नानंतर कांही मुली आपलं मूळ नावच कायम ठेवतात, पण बऱ्याच जणींची नावं सासरच्या लोकांकडून, विशेषतः नवऱ्याकडून बदललं जातं.

या नाव बदलण्यात वेगवेगळे प्रकार आहेत. एक म्हणजे तिचं आधीचं नाव (First Name), वडिलांचं नाव आणि आडनाव या जागी तिचं नवीन नाव, पतीचं नाव आणि पतीचं आडनाव येतं. कांही ठिकाणी तिचं आधीचं नाव कायम ठेवलं जातं, पण त्यापुढं पतीचं नाव आणि आडनाव लिहिलं जातं. कांही स्त्रिया आपलं आधीचं नाव आणि आडनाव यापुढं पतीचं आडनाव लावतात. तर क्वचित कांही स्त्रिया आपलं आणि पतीचं आडनाव टाळून आपलं नाव आणि पतीचं नाव एवढंच वापरतात.

लग्नानंतर नाव न बदलण्याचे फायदे

खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव बदलणं म्हणजे तिची मूळ ओळख पुसून टाकणं. ही कांही चांगली गोष्ट नाही. माझं स्पष्ट मत आहे की लग्नानंतर मुलींनी आपलं नाव बदलू नये, मूळ नावच कायम ठेवावं. फारतर मूळ आडनावाच्या बरोबर पतीचं आडनाव लावावं.

मूळ पूर्ण नाव तसंच ठेवण्याचा एक मोठा व्यावहारिक फायदा म्हणजे तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंटस आहे तसेच वापरता येतील (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट वगैरे). शिवाय बँक अकाऊंट, डिमॅट अकाऊंट इथंही कांही बदल करावा लागणार नाही. तसेच नाव बदलण्यासाठी करावे लागणारे सगळे सोपस्कार टळतील.

सध्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे एखाद्या मुलीने लग्नानंतर नाव बदलले आणि जर तिचा घटस्फोट झाला तर तिला तिच्या पतीचे नाव आणि आडनाव यानुसार जगावे लागते, किंवा आपले मूळ नाव वापरण्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया कराव्या लागतात. या दोन्ही गोष्टी तापदायकच असतात.

लग्नानंतर नाव बदलताय? नाव बदलायचेच असल्यास ……

पण तरीही नाव बदलायचंच असल्यास आपलं First Name अजिबात बदलू नये. ते कायम ठेऊन त्यापुढं वडिलांचं नाव-आडनाव या ऐवजी पतीचे नाव आणि आडनाव लावावं. मुलीनं आपलं मूळ नाव बदलू नये याचं मुख्य कारण म्हणजे ते नाव ठेवताना तिला तिची आई, आज्या, आत्या, मावश्या, काक्या आणि जवळच्या अनेक नातेवाईकांचे आशीर्वाद लाभलेले असतात.

शिवाय तिला त्या नावानं अनेकांनी लाखो वेळा संबोधलेलं असतं. त्यामुळं त्या मुलीला त्या नावाचे व्हायब्रेशन्स मिळालेले असतात. त्या नावाचं एक वलय तिच्याभोवती तयार झालेलं असतं. लग्नानंतर नाव बदलणं म्हणजे आपल्या मूळ नावाची ही एनर्जी नष्ट करण्याचा प्रकार आहे.

लग्नानंतर नाव बदलायचं असेल तर नेम न्यूमरॉलॉजीचाही विचार करावा. म्हणजे नवीन पूर्ण नावाचा नामांक, हार्ट’स डिझायर अर्ज नंबर आणि पर्सनॅलिटी नंबर किती येतो ते बघावं आणि हे नंबर्स पतीच्या पूर्ण नावानुसार येणाऱ्या नंबर्सशी सुसंगत आहेत का हेही बघावं. अर्थात पतीचा जन्मांक आणि भाग्यांक आपल्या जन्मांक आणि भाग्यांक यांच्याशी सुसंगत आहेत याची लग्न ठरवण्यापूर्वीच खात्री करून घ्यावी. जर जन्मांक– भाग्यांक सुसंगत नसेल तर अशा मुलाशी लग्न न करणेच योग्य ठरेल.

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

हेही वाचा

नावात काय आहे? नावात बरंच कांही आहे!

बाळासाठी अंकशास्त्रानुसार लकी नावाचे कांही निकष

बाळाचे नाव…. नावरस नाव म्हणजे काय?

गौरी आणि फेस रीडर (मराठी लघुकथा)

TheyWon ऑनलाईन मराठी मॅगझीन

Views: 393
Please follow and like us:
Pin Share