Fake Numerologists
काही दिवसांपूर्वी मला एका महिलेचा फोन आला होता. तिच्या मुलाची जन्मतारीख 17 होती. त्या महिलेचा एक नातेवाईक न्यूमरॉलॉजीची प्रॅक्टिस करतो. तो तिला नेहमी सांगत असे की 17 ही तारीख वाईट असते. सतरा म्हणजे खतरा, तुझ्या मुलाचं कांही खरं नाही वगैरे. मुलाच्या भविष्याच्या चिंतेनं ती महिला खचून गेली होती. अशातच तिनं माझे न्यूमरॉलॉजीवरचे लेख वाचले आणि मला फोन केला.
तिनं मला तिचा न्यूमरॉलॉजिस्ट नातेवाईक काय म्हणत असतो ते सांगितलं, आणि तिच्या मुलाचं पुढं कसं होणार हे विचारलं.
मी म्हणालो, ‘तुम्हाला तुमच्या मुलाचं भलं व्हावं असं वाटत असेल तर सगळ्यात आधी तुमच्या त्या नातेवाईकाचं ऐकणं बंद करा. इथून पुढं त्याच्याशी या विषयावर कांही बोलायचं नाही, त्याला कांही विचारायचं नाही.’
ती म्हणाली, ‘मी त्याला विचारत नसते, पण तोच आम्हाला सारखे फोन करून तेच तेच सांगत असतो.’
‘म्हणजे नक्कीच त्या माणसाच्या जीवनात कांहीतरी मोठे प्रॉब्लेम असणार! आता तो तुमचा नातेवाईक आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम्स माहीत असणार!’
‘हो, तो विक्षिप्त माणूस आहे, त्याचे त्याच्या बायकोशी आणि मुलांशी पटत नाही’,
‘आणि?’
‘तो लोकांशी सारखा भांडत असतो’
‘असे लोक स्वतः पीडित असतात, स्वतःच्या समस्या त्यांना सोडवता येत नाहीत, दुसऱ्यांना सतत कांहीतरी निगेटिव्ह सांगत बसतात! कमाल आहे, तुम्ही अशा माणसाचं ऐकून घेत असता? एक काम करा, इथून पुढे त्या माणसाचा फोन आला तर तो घेऊ नका, तरीही त्यानं फोन करणं सुरूच ठेवलं तर त्याला ब्लॉक करा. अशा लोकांना दूर ठेवण्यातच तुमचं हित आहे.’
Fake Numerologist
त्या महिलेनं माझं ऐकलं आणि त्या सो कॉल्ड न्यूमरॉलॉजिस्टसशी संबंध तोडून टाकले. नंतर तिनं मला फोन करून ‘तुमच्यामुळं माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झालं’ असं सांगितलं.
नुकताच तिचा तो मुलगा SSC मध्ये डिस्टिंक्शनमध्ये पास झाला. त्याला कसल्याही समस्या नाहीत. पण त्या महिलेने त्या नातेवाईक न्यूमरॉलॉजिस्टच्या त्या मुलाविषयी निगेटिव्ह गोष्टींवर विश्वास ठेवला असता तर निश्चितच त्या मुलामध्ये स्वभावदोष निर्माण झाले असते आणि त्याला मोठया समस्या आल्या असत्या.
Fake Numerologists
अशीच दुसरी एक घटना. एका महिलेच्या मुलाचे नाव शुभम असे होते. एक न्यूमरॉलॉजिस्टने तिला शुभम हे नाव अशुभ आहे असे सांगितले! वर तो असेही म्हणाला की तुम्ही हे नाव लवकरात लवकर बदला, नाहीतर या मुलाला पुढे मोठ्या समस्या निर्माण होतील. मी तुम्हाला दोन-तीन चांगली नावे सुचवतो, माझी फी फक्त सात हजार रुपये आहे वगैरे! ही महिला त्या न्यूमरॉलॉजिस्टचा सल्ला ऐकणार होती, तेही चक्क सात हजार रुपये देऊन!
पण योगायोगाने या महिलेने त्याच दिवशी सोशल मीडियात माझा एक लेख वाचला आणि मला फोन केला व वरील घटना सांगितली.
मी विचारलं, ‘तुम्ही कुठून बोलताय?’
‘पुण्यातून…’
‘पुण्यात कुठं?’
‘शनिवार पेठ’
‘शनिवार पेठ? मी आत्ता शनिवार पेठेतच आहे. तुमचं घर नेमकं कुठं आहे?’
तिनं घर नंबर आणि बिल्डिंगचं नाव सांगितलं. मला खूप आश्चर्य वाटलं, कारण त्यावेळी मी नेमका त्याच बिल्डिंगजवळ उभा होतो, माझ्या एका मित्राला भेटण्यासाठी.
‘आलोच’ असे म्हणत मी फोन कट केला सरळ त्या महिलेच्या घरी जाऊन धडकलो. घरात ती महिला, तिचा नवरा, सासू आणि एक गोंडस बाळ होते. तिथं मी त्या महिलेचं, तिच्या नवऱ्याचं आणि सासूचं चांगलंच ब्रेन वॉशिंग केलं. शुभम हे नाव अशुभ कसे काय असू शकेल? तो न्यूमरॉलॉजिस्ट म्हणाला म्हणून तुम्हाला कसं काय पटलं वगैरे. हे नाव बदलायची गरज नाही हे त्यांना निक्षून सांगितले, आणि निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहायचा सल्ला दिला.
वरील दोन घटना सांगायचं उद्देश म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह कांहीतरी सांगून भीती घालण्याचे काम करणाऱ्या Fake Numerologists तुम्ही नेहमी सावध राहिले पाहिजे, मग ते कितीही नावाजलेले न्यूमरॉलॉजिस्टस असोत. त्यातच तुमचे हित आहे. निगेटिव्ह गोष्टी सांगण्यामागे त्यांचा उद्देश तुम्हाला भीती घालून पैसे उकळणे हा असतो, किंवा ते स्वतः पीडित असतात आणि त्यातून ते निगेटिव्ह बोलत असतात. शिवाय या लोकांचे न्यूमरॉलॉजीचे ज्ञान अर्धवट असते, त्यामुळे ते प्रत्येक अंकाच्या पॉझिटिव्ह बाजूंऐवजी निगेटिव्ह बाजूंना महत्व देतात. त्यामुळे ‘नीम हकीम खतरे में जान’ ही म्हण नेहमी ध्यानात ठेवावी.
कोणत्याही न्यूमरॉलॉजिस्टकडून सल्ला घेण्यापूर्वी पुढील गोष्टी चेक करा:
तो पॉझिटिव्ह माणूस आहे का?
तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलून तो भीती घालतो का?
तो अनुभवी आहे का? त्याचा किती वर्षांचा अनुभव आहे?
उपाय म्हणून तो तुमचे नाव करप्ट करायला लावतो का?
उपाय म्हणून तो तुम्हाला महागडे खडे-अंगठ्या वगैरे घ्यायला लावतो का? कर्मकांड, पूजा असल्या गोष्टींमध्ये तुम्हाला गुंतवतो का?
Mahaveer Sanglikar
Numerologist, Graphologist & Face Reader
Phone Number 8149128895
हेही वाचा:
वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?
नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!
साडेसातीपासून मुक्तीचा सोपा उपाय!
ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
6 thoughts on “Fake Numerologists | अशा न्यूमरॉलॉजिस्टस पासून सावध रहा!”