अंकशास्त्र आणि मनोरंजन | अंक 3 आणि 5

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist
Phone Number 8149128895

अंकशास्त्र आणि मनोरंजन

विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट जन्मांक अथवा भाग्यांक अथवा एटीट्यूड नंबर असणारे लोक जास्त प्रमाणात दिसतात. उदाहरणार्थ टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, गणित वगैरे क्षेत्रांमध्ये 4 या अंकाशी संबंधित लोकांचे प्रमाण इतर अंकांशी संबंधित लोकांपेक्षा जास्त दिसते.

अभिनय, गायन, संगीत, परफॉर्मिंग आर्ट, लेखन, सिनेमा, नाटके, मनोरंजन या क्षेत्रांमध्ये 3 व 5 यापैकी एखादा जन्मांक अथवा भाग्यांक अथवा एटीट्यूड नंबर असणारे लोक मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यातील अनेकांच्या बाबतीत हे दोन्ही नंबर दिसतात, किंवा यातील एखादा नंबर रिपीट झालेला दिसतो.

जन्मांक, ऍटिट्यूड नंबर, भाग्यांक काय आहे?

हा लेख पुढे वाचण्या आधी तुम्ही जन्मांक, ऍटिट्यूड नंबर भाग्यांक म्हणजे काय हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल.

जन्मांक (Birth Number) म्हणजे महिन्याच्या ज्या तारखेला जन्म झाला त्या तारखेतील अंकांची बेरीज (उदा. 21 तारखेस जन्म झालेल्या व्यक्तीचा जन्मांक 3 असतो), ऍटिट्यूड नंबर म्हणजे जन्मदिवस आणि जन्ममहिना यांची बेरीज. (D+D+M+M), तर भाग्यांक (Life Path Number) म्हणजे पूर्ण तारखेतील अंकांची बेरीज (D+D+M+M+Y+Y+Y+Y).

न्यूमरॉलॉजीमध्ये अंक 3 आणि 5

अंक 3 आणि 5 हे दोन्ही अंक व्यक्त होण्याशी संबधीत आहेत. या दोन्ही अंकांचे बरेचसे गुणदोष समान आहेत.

ज्यांचा जन्मांक/भाग्यांक किंवा ऍटिट्यूड नंबर 3 किंवा 5 आहे, अशा बहुतांश लोकांना अभिनय, संगीत, गायन, नृत्य, वादन, लेखन अशा गोष्टींची उपजत आवड असते. अशा लोकांमध्ये मनोरंजन क्षेत्रात यशस्वी होण्याची मोठी क्षमता असते. इथे ही गोष्ट लक्षात घ्यावी की 3 आणि 5 दोन अंकांशिवाय इतर अंक असणाऱ्या व्यक्ति देखील संबधीत क्षेत्रात दिसून येतात, पण त्यांची संख्या वरील दोन अंकांच्या मानाने खूप कमी आहे

या लेखात मी वानगीदाखल सिनेक्षेत्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींची नावे आणि जन्मांक/ ऍटिट्यूड नंबर/भाग्यांक देत आहे. इथे दिलेल्या नावांची यादी आणि त्यांचे जन्मांक/ ऍटिट्यूड नंबर/भाग्यांक पाहिल्यावर ज्यांना अंकशास्त्राविषयी शंका/कुशंका असतात ते लोक विचार करायला प्रवृत्त होतील. हा लेख म्हणजे अंकशास्त्र स्टॅटिस्टिकली किती खरे आहे यावर मी करत असलेल्या संशोधनाचा छोटासा भाग आहे.

हा लेख अंकशास्त्राच्या अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल.

अंकशास्त्र आणि मनोरंजन

अंकशास्त्र आणि मनोरंजन: 3 आणि 5 या अंकांशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती

जन्मांक/ ऍटिट्यूड नंबर/भाग्यांक 3 अथवा 5 असणारे काही अभिनेते आणि अभिनेत्र्या: (नावांच्या पुढे कंसात त्या-त्या व्यक्तीची जन्मतारीख दिली आहे).

पृथ्वीराज कपूर: जन्मांक 3 भाग्यांक 3 ऍटिट्यूड नंबर 5 (3.11.1906)
राज कपूर: जन्मांक 5 (14.12)
देव आनंद: भाग्यांक 5 (26.9.1923)
प्राण: जन्मांक 3 ऍटिट्यूड नंबर 5 (12.02)
मधुबाला: जन्मांक 5 भाग्यांक 5 (14.02.1933)
जय ललिता: भाग्यांक 3 (24.2.1948)
प्रेम चोपडा: जन्मांक 5 भाग्यांक 5 ऍटिट्यूड नंबर 5 (23.9.1935)
शशी कपूर: भाग्यांक 33 ऍटिट्यूड नंबर 3 (18.3.1938)
शम्मी कपूर: जन्मांक 3 (21 ऑक्टोबर)
राजेश खन्ना: भाग्यांक 3 ऍटिट्यूड नंबर 5 (29.12.1942)
वहिदा रहमान: जन्मांक 3 ऍटिट्यूड नंबर 5 (3.02.1938)
मुमताज: भाग्यांक 5 (31.07.1947)
आशा पारेख: ऍटिट्यूड नंबर 3 (2.10.1942)

अंकशास्त्र आणि मनोरंजन: 3 आणि 5 या अंकांशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती

दिलीप कुमार: ऍटिट्यूड नंबर 5 (11.12)
अशोक कुमार: ऍटिट्यूड नंबर 5 (13. 10)
सुनील दत्त: ऍटिट्यूड नंबर 3 (6.6)
राजेंद्र कुमार: भाग्यांक 3 (2.7.1029)
संजय खान: जन्मांक 3 (03.01)
सायरा बानो: जन्मांक 5 (23.08)
शबाना आझमी: भाग्यांक 33 (18.9.1950)
झीनत अमान: ऍटिट्यूड नंबर 3 (19.11)
दिव्या भारती भाग्यांक 3 (15.02.1974)

अमिताभ बच्चन: ऍटिट्यूड नंबर 3 (11.10)
हेमा मालिनी: भाग्यांक 3 (16.10.1948)
ललिता पवार: भाग्यांक 3 (18.04.1916)
रजनीकांत: जन्मांक 3 भाग्यांक 3 (12.12.1950)
अमजद खान: जन्मांक 3 (12.11)
अनिल कपूर: भाग्यांक 3 (24.12.1956)
ऋशी कपूर: भाग्यांक 3: (4.9.1952)
NT रामाराव: भाग्यांक 5 (28.5.1923)
रणबीर कपूर: भाग्यांक 3 (28.9.1982)
आमीर खान: जन्मांक 5 भाग्यांक 33 (14.03.1965)
जेनेलिया डिसोझा: जन्मांक 5 (5 ऑगस्ट)

करीना कपूर: जन्मांक 3 भाग्यांक 3 ऍटिट्यूड नंबर 3 (3.9.1980)
राणी मुखर्जी: जन्मांक 3 (21 मार्च)
ऐश्वर्या राय: भाग्यांक 5 ऍटिट्यूड नंबर 3 (1.11.1973)
काजोल: जन्मांक 5 (5 ऑगस्ट)
अनुष्का शर्मा: भाग्यांक 5 (1.5.1988)
सलमान खान: भाग्यांक 33 ऍटिट्यूड नंबर 3 (27.12.1965)
जॉन अब्राहम: भाग्यांक 3 (17.12.1972)
अक्षय कुमार: भाग्यांक 5 (9.9.1967)
नसरुद्दिन शाह: भाग्यांक 5 (20.7.1949)
सनी देओल: भाग्यांक 5 (19.10.1956)
अनुपम खेर: भाग्यांक 3 (7.3.1955)

अंकशास्त्र आणि मनोरंजन: 3 आणि 5 या अंकांशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती

अभिषेक बच्चन: जन्मांक 5 भाग्यांक 3 (05.02.1976)
दीपिका पदुकोन: जन्मांक 5 भाग्यांक 3 (05.01.1986)
हृतिक रोशन: भाग्यांक 5 (10.01.1974)
मोहनलाल: जन्मांक 3 (21.05.1960)
ममुटी: भाग्यांक 5 (07.09.1951)
राणा दग्गुबती: जन्मांक 5 भाग्यांक 3 (14.12.1984)
प्रभास: जन्मांक 5 भाग्यांक 5 (23.10.1979)
आयुष्मान खुराना: जन्मांक 5 ऍटिट्यूड नंबर 5 (14.09.1984)

सैफ अली खान: भाग्यांक 5 (16.08.1970)
राधिका आपटे: भाग्यांक 5 (07.09.1985)
जॅॅक्वेलीन फर्नांडीस: भाग्यांक 33 (11.08.1985)
इरफान खान: भाग्यांक 3 (07.01.1966)
सुशांत सिंग राजपूत: जन्मांक 3 (21 जानेवारी)
कंगना रानौत: जन्मांक 5 भाग्यांक 33 (23.3. 1987)
सोनू सूद जन्मांक 3 भाग्यांक 3 (30. 7. 1973)

भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी झाला होता. त्यांचा जन्मांक 3 आहे तर भाग्यांक 5 आहे!

तुमचा जन्मांक किंवा भाग्यांक किंवा ऍटिट्यूड नंबर 3 किंवा 5 यापैकी एक असेल तर आणि तुम्हाला अभिनय, गायन, संगीत, वादन वगैरे गोष्टींची आवड असेल तर तुम्हाला या क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. जर तुमच्या मुलाचा अथवा मुलीचा जन्मांक, ऍटिट्यूड अथवा भाग्यांक वरीलपैकी एक असेल तर पालक या नात्याने तुम्ही त्याच्या/तिच्या मनोरंजन क्षेत्राशी संबंधित कलागुणांना वाव द्यायला पाहिजे.

अंकशास्त्र आणि मनोरंजन

अंकशास्त्राशी संबंधित इतर लेख

तुमच्या सहीचं रहस्य | Graphology

नावात काय आहे? नावात बरंच कांही आहे!

वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

माझे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/numerology.marathi/

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

TheyWon Online Marathi Magazine (प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता)

Views: 91
Please follow and like us:
Pin Share

4 thoughts on “अंकशास्त्र आणि मनोरंजन | अंक 3 आणि 5

  1. खूपच उपयुक्त माहिती या लेखात दिलेली आहे.अतिशय सुंदर लेख.आवडला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *