बाळाचे नाव…. नावरस नाव म्हणजे काय?

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist
Phone Number 8149128895

नावरस नाव म्हणजे काय

बाळाचे नावरस नाव म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडतो. या लेखात मी या प्रश्नाचे विस्ताराने उत्तर दिले आहे.

बाळाचे नाव ठेवताना तुमचा ज्योतिषी अथवा पंडित/पुरोहित तुम्हाला एखादे विशिष्ट अक्षर सुचवतो, आणि त्या अक्षराने सुरु होणारे नाव ठेवायला सांगतो. ही अक्षरे त्या बाळाच्या राशीला अनुसरून असतात. अशा नावाला नावरस नाव असे म्हणतात.

खरं म्हणजे असं नाव हे त्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून जन्मरास आणि जन्मनक्षत्र ओळखता यावे यासाठी ठेवले जाते. म्हणजे ही एक सोय आहे, तीही पंडित-पुरोहितांची आणि ज्योतिष्यांची. त्यामुळे त्या नावाचा इतर असा कसलाही फायदा नाही.

नावरस नाव आणि प्रत्यक्षातले नाव हे वेगवेगळे असते. किंबहुना नावरस नाव प्रत्यक्ष नाव म्हणून वापरू नये असं सांगितले जाते. त्यामुळे बाळाचे व्यवहारातले नाव ठेवताना त्या नावाचे राशीनुसार पहिले अक्षर काय असावे याचा विचार अजिबात करू नये.

अंकशास्त्रानुसार बाळाचे नाव

न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) नुसार बाळाचे नाव ठेवताना राशीचा विचार केला जात नाही. तिथे नावाचे पहिले अक्षर काय आहे, याचा विचार करण्याची गरज नसते, तर त्या नावातील अक्षरांची अंकातील किंमत काय आहे, आणि ती त्या बाळाच्या जन्मांकाशी सुसंगत आहे का हे पाहिले जाते. नावरस नाव आणि अंकशास्त्र यांचा कांहीही संबंध नाही.

ऍडव्हान्सड न्यूमरॉलॉजीमध्ये सुसंगतेपेक्षा त्या नावातील अक्षरांची अंकातील किंमत, पूर्ण नावातील अक्षरांची अंकातील किंमत आणि नाव व आडनावातील नावातील अक्षरांची अंकातील किंमत यांचा विचार केला जातो. मिळणाऱ्या या विविध अंकांचे व्हायब्रेशन्स काय आहेत याला महत्व दिले जाते.

न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) नुसार ठेवले जाणारे नाव हे व्यवहारात उपयोगासाठी असते, म्हणजे बोलावण्यासाठी, शाळेत घालताना, कागदपत्रांवर वगैरे. याउलट नावरस नावाचा असा व्यावहारिक उपयोग केला जात नाही. त्यामुळे बहुतेक लोकांना आपले नावरस नाव काय आहे हे माहीत नसते.

नावाच्या संदर्भात माझे इतरही अनेक लेख आहेत. ते तुम्ही विषय वाचावेत. त्यातील काही लेखांच्या लिंक्स या पेजवर पुढे दिल्या आहेत.

हेही वाचा:

बाळासाठी अंकशास्त्रानुसार लकी नावाचे कांही निकष

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव

नावात काय आहे? नावात बरंच कांही आहे!

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

TheyWon ऑनलाईन मराठी मॅगझीन

Views: 41
Please follow and like us:
Pin Share