महिलांची मानसिकता, स्वभाव आणि समस्या | Women Issues

Please follow and like us:
Pin Share

महावीर सांगलीकर

Senior Numerologist, Graphologist
Phone Number 91 8149128895

महिलांची मानसिकता, स्वभाव आणि समस्या

अंकशास्त्राची प्रॅक्टिस सुरू केल्यापासून मी अनेक महिलांच्या समस्या सोडवल्या. त्या समस्या सोडवताना मला महिलांच्या मानसिकतेचं जवळून दर्शन झालं. माझं निरीक्षण आहे की बहुतेक महिला या पॉझिटीव्ह मनाच्या असतात. महिलांना येणाऱ्या समस्या या प्रामुख्यानं पुरुषांच्यामुळं येत असतात. हे पुरुष म्हणजे पती, भाऊ, बॉयफ्रेंड, पिता, कलिग्स वगैरे. शिवाय समाजातील पुरुषी वृत्तीमुळंही महिलांना भयंकर त्रास होत असतो.

महिलांना इतर महिलांच्यामुळंही समस्या निर्माण होत असतात. महिलांना त्रासदायक ठरणाऱ्या महिला म्हणजे प्रामुख्यानं सासू, सून, नणंद, बहीण आणि बऱ्याच ठिकाणी तर चक्क आई! महिलांना महिलांच्यामुळं होणाऱ्या त्रासाची मोठी कारणं म्हणजे जनरेशन गॅप आणि त्रास देणाऱ्या महिलेचं रिकामटेकडं किंवा जेलस असणं.

महिलांची मानसिकता

मला येणारा आणखी एक अनुभव म्हणजे बऱ्याच महिलांना त्यांच्या समस्या दूर करण्यापेक्षा त्या कुणालातरी सांगण्यात जास्त रस असतो. आपलं मन कोणा विश्वासू व्यक्तिकडं मोकळं करावं, त्या व्यक्तीनं ते लक्षपूर्वक ऐकून घ्यावं एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. मन मोकळं केलं, थोडंसं रडलं की त्यांना खूप बरं वाटतं आणि मग त्यांना त्यांच्या समस्या सुटल्या असंच वाटतं.

महिलांचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे अनेक महिलांना कपडे लत्ते, दाग दागिने, मेक अप, धन-संपत्ती, घरखरेदी यांचं प्रचंड आकर्षण असतं. असे असले तरी अगदी अनेक सुशिक्षित गृहिणी महिलाही ‘आर्थिक साक्षर’ नसतात. त्यामुळे फावल्या वेळात स्वत: पैसे कमावण्याच्या बाबतीत, गुंतवणुकीच्या बाबतीत त्या उदासीन असतात. आर्थिक परावलंबन ही अनेक महिलांची मोठी समस्या आहे. या विषयावर एक वेगळा लेख लिहायला हवा. असो.

महिलांना इतर काही महिलांविषयी असणारी जेलसी ही एक मोठीच समस्या आहे. जेलस महिलांमध्ये स्वतः विषयी न्यूनगंड तयार होत असतो, त्या आत्मविश्वास हरवतात. यातून त्यांच्या समस्या आणखीन वाढायला लागतात.

अनेक महिलांचं आयुष्य स्वयंपाक करणे, धुणी-भांडी, मुलं सांभाळणं व्रतवैकल्यं, धर्म, पूजा-अर्चा यातच जात असतं. काही महिला तर सारखं सारखं फरशा धुण्याचं काम करत असतात!

महिलांना धर्माविषयी, व्रत-वैकल्यांविषयी असणाऱ्या अवाजवी आकर्षणावर ओशोंचं ‘पतिव्रता नारी’ हे प्रवचन प्रत्येक महिलेनं ऐकायलाच हवं. हे प्रवचन यु ट्यूबवर उपलब्ध आहे.

महिलांची मानसिकता: काही चांगल्या गोष्टी

मला असा अनुभव आहे की महिलांना मोटिव्हेट करणं, पॉझीटीव्ह बनवणं पुरुषांच्या तुलनेत खूप सोपं असतं. त्यांना हिप्नॉटाईझ करण हेही पुरुषांच्या तुलनेत खूपच सोपं असतं. (अर्थात स्त्री असो की पुरुष, त्यांचा हिप्नॉटाईझ करणाऱ्यावर विश्वास असेल, आणि इच्छा असेल तरच हिप्नॉटाईझ केलं जाऊ शकतं).

महिला या पुरुषांच्या तुलनेत अधिक जबाबदार, कुटुंबवत्सल, नातेसंबंध जपणाऱ्या, शहाण्या, प्रेमळ आणि हुशार असतात. त्यांच्यात नेमकेपणा असतो.

खरं म्हणजे पुरुष हे केवळ शारीरिक दृष्ट्याच महिलांपेक्षा बलवान आहेत. इतर बाबतीत महिला पुरुषांच्यापेक्षा सरस असतात.

महिला जास्त करून Constructive तर पुरुष हे Destructive Minded असतात. महिला Destructive झाल्या तर त्या स्वत:चंच नुकसान करून घेतील. Destructive पुरुष मात्र स्वतः बरोबरच इतरांचं, समाजाचं मोठं नुकसान करतात.

असं असलं तरी उत्क्रांतीच्या पुढील टप्प्यात आणि विज्ञानामुळं महिला पुरुषांच्या खूप पुढे निघून जातील. तेंव्हा त्यांना पुरुषांची गरजच भासणार नाही. अगदी मुलांना जन्म देण्यासाठी सुद्धा. कारण टेक्नॉलॉजी एवढी पुढं गेलेली असेल कि ज्या महिलेला मूल पाहिजे ते केवळ तिच्याच पेशीपासून जन्माला घालता येईल.

हेही वाचा:

लग्नानंतर नाव बदलताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

तुमच्या बाळासाठी अंकशास्त्रानुसार योग्य नाव सुचवण्यासाठी …..

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

गौरी आणि फेस रीडर (लघुकथा)

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम चॅनेल
https://t.me/numerologymarathi

Numerology in English

ऑनलाईन मराठी मॅगझिन
प्रेरणादायक लेख, कथा आणि कविता

Views: 19
Please follow and like us:
Pin Share

6 thoughts on “महिलांची मानसिकता, स्वभाव आणि समस्या | Women Issues

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *